Skip to main content

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 05/07/2021 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ? मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या पण सरकारी लोक काय करत असतील ? पगार तर चालूच असणार सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ? पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ? रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का बस सेवा बर्यापैंस्की बंद जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ? पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण

अपघात - एका नव्या ट्रकचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/07/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सुरेवारसिंग ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते. घरी किरकोळ किराणा सामान अन मुलीसाठी खाऊ घेवून तो काल दुपारीच लवकर घरी आला होता. रात्री आराम करून तो सकाळी उठला.

लिली

लेखक Bhakti यांनी रविवार, 04/07/2021 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
लिली म्हणजेच लिलीयम ही फुलं असंख्य प्रकारची आहेत.उन्हाळ्यात, पावसाळ्यात फुलणारी फुलं आपल्याकडे आढळतात.कंद (bulb) मातीत लावतात.त्यातील काही प्रकार. १.पावसाळी पांढरी लिली(Rainy White Lily) 1 २.पावसाळी गुलाबी लिली(Rainy Pinky Lily) 2 ३.पावसाळी पिवळी लिली(Rainy Yellow Lily)

~ गोष्ट अक्षतची ~

लेखक पिंगू यांनी रविवार, 04/07/2021 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली.. अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.

२१५ - आता पुढे काय?

लेखक सारिका होगाडे यांनी रविवार, 04/07/2021 11:21 या दिवशी प्रकाशित केले.

२१५ - आता पुढे काय?

यावर्षी कॅनडामध्ये ‘कॅनडा डे’ साजरा करायचा कोणाचाही, इथल्या कुठल्याही लोकांचा, विचार नव्हता, इच्छा नव्हती. काय आहे कॅनडा डे? तर हा दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. राणीने १९८२ मध्ये जेव्हा कॅनडा काबीज (?) केला आणि तिची सत्ता स्थापन केली, त्या दिवसाला कॅनडा डे म्हणतात. म्हणजे आपल्या १५ ऑगस्टच्या अगदी उलट. त्यामुळे कॅनडा डे हा नेटिव्ह लोकांसाठी दुःखाचा, तिरस्काराचा असा दिवस झाला. त्यांनी तो कधीही साजरा केला नाही, अर्थातच! २१५ (अजून एका शाळेत ७५१ अन्मार्कड (अचिन्हन्कित) ग्रेव सापडल्या आहेत. याचा अर्थ मेलेल्याना तसेच पुरले आहे.

आभाची सायकल फेरी

लेखक Bhakti यांनी शनिवार, 03/07/2021 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळच आकाश तांबूस झालं होत.पाखर घराकडे झेपावत असतांना त्यांचे पंख त्या तांबूस आकशात एखाद्या उडणाऱ्या सावलीसारखे भासत होते.इवलाश्या खिडकीतून आभा हे सगळ निरखून पाहत होती.शेवटच गणित सोडवून कधी सायकल घेऊन मस्त चक्कर मारायला जाते इतकी उताविळ ती झाली होती.झाल एकदाच गणित सोडवून स्वत:शीच बोलत आभा पटकन “आई मी येते चक्कर मारून”अस बोलून ती खाली पोहचली सुद्धा.सायकल सुसाट चालवत ती मुख्य रस्त्याला पोहचली.थोड अंतर गेलं कि उजव्या वळणावर वळाली. आता नवीनच ट्रक झाला होता.तशी इथे पूर्वी शेती होती.पण आता मोकळे प्लॉटस पाडून इथे विक्रीसाठी होते.

रेखाटन

लेखक राघव यांनी गुरुवार, 01/07/2021 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्यात अनेकांनी काढलेली चित्रे बघून आपलेही एखादे चित्र टाकण्याचा मोह आवरला नाही. ४-५ वर्षांपूर्वी काढलेले हे एक फास्ट ड्राफ्ट आहे.. कधी पूर्ण केले नाही. बघुयात जमले तर पूर्ण करून लिंकेनच. पण तोवर.. :-) रेखाटन - ऐश्वर्या राय

खडकफूल

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/07/2021 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे घरात काळा समार (मसाला) करायचा झाला तर लहानपणापासून कानावर पडलेलं एक नाव, खडकफूल. खडकफूल हा मसाल्यातल्या पदार्थातला एक घटक आहे. हा पदार्थ मला खूप आवडतो. तो आवडण्याचं कारण त्याच्या रंगामुळं नाही, गंधामुळं नाही, चवीमुळं नाही की त्याच्या आकारामुळंही नाही... संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/07/blog-post.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

२१५

लेखक सारिका होगाडे यांनी गुरुवार, 01/07/2021 06:14 या दिवशी प्रकाशित केले.

२१५

(कृपया मानसिक त्रास होणाऱ्या लोकांनी हा लेख वाचू नये.) आंतरजालावर जी माहिती दिसते ती सगळी खरीच असते असे नाही आणि सर्व सत्य घटनांची माहिती आंतरजालापर्यंत पोहोचतेच असेही नाही. त्यापैकीच हे एक हत्याकांड आहे जे दशकानुदशके लपवून ठेवण्यात आले, घडत गेले, आणि कोणालाही त्याचा पत्ता नाही. स्थानिक लोकांनाही कळायला खूप वेळ लागला पण जेव्हा कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र आज उघडपणे ही बातमी जगासमोर आली आहे आणि आंतरजालावर उपलब्ध आहे. कॅनडावरचा हा डाग मात्र कधीही धुवून निघणार नाही, असे दिसते. आज कॅनडामध्ये २१५ हा काळा आकडा आहे असे म्हणू शकतो.

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 30/06/2021 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.