Skip to main content

Laptop साठि योग्य Wireless Innternet कुठले

लेखक राजा यांनी बुधवार, 30/09/2009 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
Laptop साठि कोणत्या प्रकारचे Wireless Internet योग्य आहे. क्रूपया जाणकारानि मार्गदर्शन करावे. DELL Inspirion 14 Vista SP1 Home Basic

आत्माराम की जय

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 30/09/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंड्ळी, हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्‍या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही..

उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ

लेखक टारझन यांनी बुधवार, 30/09/2009 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
ढुस्क्लेमर्स : सदर लेखाचा कोणशीही वैयक्तिक संबंध नाही, संबंध वाटल्यास आपण स्वतःला जालिय हुच्चभ्रू म्हणून मिरवायला हरकत नाही. लेख पचायला अंमळ जड आहे , जमालगोटा जवळ ठेवल्यास वाचल्यानंतरचे त्रास टाळू शकता. जालावर फिरताना एक जड लेख वाचनी पडला , सहज विचार केला ... हे लोकं आपल्या घरी सुद्धा असंच बोलत असतील ? तर ? आणि कथा सुचली ! कथा काल्पनिक , पात्र वातावरणातली !!

`बाल'हट्ट

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 30/09/2009 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.'' आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती. मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली.

मायावतींचा असाही दलित उध्‍दार

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 29/09/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दलितांच्‍या नेत्या असल्‍याचा आणि त्यांच्‍या उत्‍थानासाठी झटण्‍याचा दावा करणा-या बसपा सुप्रिमो मायावती सत्तेत आल्‍या. आणि अनेकांना आता सोन्‍याचे दिस येतील असे वाटले. मात्र झाले वेगळेच सत्तेवर आल्‍या-आल्‍या यापूर्वी त्रासदायक ठरलेल्‍या अधिका-यांच्‍या बदल्‍या, चौकशा आणि निलंबने यातच सुरूवातीची वर्षे घालविल्‍यानंतर आता बहन मायावतींनी पार्क उभारणीचे (स्‍वतःचे पुतळे उभारण्‍याचे) महत्‍कार्य हाती घेतले आहे. ते बरेच वादग्रस्‍तही ठरले. अनेक राजकीय पक्षांचा विरोध आणि न्‍यायालयाचा आदेश डावलून ते अजुनही सुरूच आहे. उत्तर प्रदेशचे राजकारण असूयेच्‍या पायावर उभे आहे. ही गोष्‍ट तर सर्वमान्‍यच आहे.

हास आयुष्या

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 29/09/2009 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या ! कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फुलणे दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या ! तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले, जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ? कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ? कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ? दिवे मंदावता येशील माझ्या सोबतीसाठी मला तू एवढा देशील का विश्वास आयुष्या ?

न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार

लेखक अगोचर यांनी मंगळवार, 29/09/2009 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
"न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" हे योगेश्वर कृष्णाचे वाक्य लहानपणापासुन ऐकतो आहे. मिपावरील रसिकांना त्याची अजुन जास्त ओळख आहे का ? ते कोणाच्या कुठल्या रचनेमधे आले आहे ? आंतरजालावरही ते शोधण्याचा प्रयत्न केला. पण सगळीकडे त्याचा सर्वश्रुत वचनासारखाच उपयोग केला आहे. पुलंनी ते अभ्यासक्रमात असण्याचा उल्लेख केला आहे ("करी शस्त्र न धरी चार युक्तीच्या गोष्टी सांगेन" अश्या अन्वयासकट). त्यामुळे कदाचित मागच्या पिढीतील लोकांना कदाचित जास्ती माहिती असेल.

अंगुठे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 29/09/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
अंगुठे आज या "मिसळपावा"वर "मिसळभोक्ते" किती येती | व्रते "एकलव्या"ची जरी घेती, बाण ते स्वैर सोडिती || बरे जरी आजचे द्रोणही, मुळी "अंगठा" न मागती | मात्र हे "मिभो" सर्वत्र, काय "अंगठा"च दाविती || अरे थांबा, नका दावू, "अंगुठे" तुम्ही सर्वत्र | न ते "स्वाक्षरी" बघती, "अंगुठे" काय पाहतील? ||