Skip to main content

प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 28/07/2021 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली. तरीही कालप्रवाहात लाखो ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील. देशाला स्वतंत्रता मिळाली. पण आपले दुर्भाग्य गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच.

मदतकार्यातले पर्यटन - गांधारपाले लेणी.

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 28/07/2021 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुर, वादळ, भूकंप अशा नैसर्गीक आपत्तीच्या प्रसंगी आपण सगळेच मानवधर्माला जागुन यथाशक्ती मदतकार्यात सहभागी होतो त्याप्रमाणे काल दिनांक २६ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड शहर आणि परिसरातील वाड्या, वस्त्यांमधील पुरग्रस्त रहिवाशांना अन्नवाटप करण्यासाठी मित्रांबरोबर जाणे झाले. प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी होऊन ८०० खऱ्याखुऱ्या गरजूंच्या हातात ताजा, गरम गरम मसुर पुलाव मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य व दिसलेला आनंद पाहुन लाभलेले समाधान आणि हे काम करत असताना मधे मिळालेल्या दिड एक तासाच्या फावल्या वेळात अगदी अनपेक्षीतपणे नितांत सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत, गांधारपाले गावाजवळ ई.स.

माझं बेबी सीटिंग ........

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 26/07/2021 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं की आमच्या सुनबाईंनी आम्हा दोघांना बेबी सीटिंगसाठी बोलावले. आमचा नातू, नायल चार महिन्याचा झाला होता व चेहरे, आवाज बऱ्यापैकी ओळखू शकत होता. तसेच बाटलीने दूध देखील प्यायला शिकला होता त्यामुळे आठ तासांसाठी त्याला सांभाळणे फारसे अवघड जाणार नव्हते. आणि तसेही आम्ही आमच्या मुलाला वाढवले होतेच त्यामुळे बेबी सीटिंगचा फर्स्टहँड अनुभव देखील गाठीशी होता. तरी देखील नातवाला तो जागा असताना कशा न कशात गुंतवून ठेवणे गरजेचे होते नाहीतर रडारड व्हायची शक्यताच जास्त होती.

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 26/07/2021 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

समस्यांचे जाळे

लेखक चंद्रकांत यांनी सोमवार, 26/07/2021 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
‘समस्या’ हा असा एक शब्द आहे, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या लहान असतात, मोठ्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. त्यांना टाळायचे, नसतीलच टाळता येत, तर त्यापासून पळायचे विकल्प बहुदा नसतात. समजा असले म्हणून त्यातून काही मुक्तीचा मार्ग गवसतो असंही नाही. म्हणून की काय त्यांच्याभोवती संदेहाची अनेक वर्तुळे कोरलेली असतात.

ती सुंदर? मीही सुंदर ! ( कथा परिचय: ६)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 26/07/2021 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ............................ आतापर्यंत वाचकांच्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे या लेखमालेचे पाच भाग प्रकाशित झालेत. सहावा भाग सादर करताना आनंद होत आहे. या भागासाठी Katherine Mansfield यांच्या कथेची निवड केली आहे. या विदुषी जन्माने न्यूझीलंडच्या.

नवल - पुस्तक परिचय

लेखक पाटिल यांनी रविवार, 25/07/2021 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवल. जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे.. फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते हाती आलं होतं...

बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 24/07/2021 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती. ‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली.

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/07/2021 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत.

सिलींडर ५

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/07/2021 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ५ आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्‍हाड मारून घेतली.आता पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो.