Skip to main content

प्रियजनांसाठी स्पेशल

लेखक गणपा यांनी बुधवार, 14/10/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या लेक आणि तिची आई (सौ) येतायत.. म्हटल त्यांच्या स्वगता साठी काही तरी खास करुया. नेटावर भटकताना एक कृती दिसली. So this is for your loved ones. साहित्यः कुंडीच्या आकाराचे कप. स्ट्रॉ.

बुधवारच्या कविता: २

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 14/10/2009 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आजही आम्ही बुधवार सत्कारणी लावण्यासाठी आलो. पण ४ दिवसाच्या सक्तिच्या उपासामुळे आमची अवस्था काहीशी अशी झाली आहे. सांगा आता काय करायचे? लेखन विपुल आहे, पण पेच हाच आहे हातात लेखणीही, पण दौत आत आहे येईल कुठून उर्मी,जर बार ड्राय आहे आरक्त वारुणीही, फक्त दोन पेग राहे मध्येच येई पोलिस, बाजार बंद होतो राजास सामिषाच्या, मोताद होई अंडे जाई फिरुन तेथे,पण निराळेच थेर मुजर्‍यास नेहमीच्या,आचारबंदी आहे उत्साहपूर्ण बुधवार, येई पुन्हा पुन्हा का? आजच करा हवे ते, उद्या गुरुवार आहे
काव्यरस

विणकाम

लेखक पर्नल नेने मराठे यांनी बुधवार, 14/10/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मैत्रिण हा शब्द कितीसा बरोबर आहे हे माहित नाही. ex boss हा शब्द अगदीच कोरडा वाटेल पण काहितरी नाव मला द्यावेच लागेल म्हणुन मैत्रिणच. तसे माझे न त्यांचे संबंध एका मैत्रिणीसारखेच... माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांच्या, सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत. मग मैत्रिणच म्हणणे जास्त योग्य.

ये ना .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 14/10/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
ये बाहुपाशी हलकेच प्रियवरा राजसा, का असा, दुर तू जाशी? सखया तू येना जवळ लवकरी बघ रे कधीची चांदरात झाली ! मिठीत तुझीया रे स्वर्ग साती नाते अपुले, जणु मीन जळाशी, तु घेना मज कुशीत झडकरी प्रीतीची ज्वाला मनी भडकली ! विझवलेले सख्या दीप कधीचे बहाण्यास तुझ्या.., पडले फशी, धरू नकोस ना राग मजवरी बघ रात्र सारी उडून चालली ! सोड ना आता रुसवा फुकाचा कशास फसवे हे कलह प्रियेशी? पंचप्राण घेवूनी उभी निजकरी ये.. मिलनवेळा निघुन चालली ! विशाल.
काव्यरस

शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 14/10/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोचर शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण दिनांक २९ ऒक्टोबर २००९ रोजी सुरु होत असून दिनांक ६ ऑक्टोबर २०१२ पर्यंत शनी सायन तूळ राशीत वास्तव्य करणार आहे. थोडक्यात सायन तूळ राशीच्या लोकांना साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ज्यांचा चंद्र सायन तूळ राशीत आहे त्यांनाच केवळ साडेसाती असते असे नाही, तर ज्यांच्या पत्रिकेत रवि, लग्न, ख-मध्य आदि सायन तूळ राशीत आहेत त्यांना पण त्यांना पण कमी अधिक प्रमाणात साडेसाती सारखीच फळे मिळू शकतील.

कामशेत - बेडसे लेणी - भातराशी... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 13/10/2009 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाजे, कार्ला, कोंडाणे आणि बेडसे ही सर्व लेणी साधारण 1st cent. B.C. कालखंडातली आहेत. ह्यापैकी फक्त बेडसे लेणी बघायची राहिली होती. एकच दिवस भटकायला मिळणार होता; म्हणून येत्या रवीवारी बेडसे लेणी बघायचं ठरवलं. लेण्यापर्यंत चाललोच आहोत तर त्याच्या मागचा भातराशीचा डॊंगरपण बघुयात असा विचार डोक्यात आला. कामशेतहून टमटमने लेण्यापर्यंत जाता येतं, पण त्यात काय मजा नाही. मग कसं जायचं? विसापुर किल्यापासून एक डोंगररांग कामशेतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आली आहे. ह्याच डोंगररांगेवर बेडसे लेणी आणि भातराशी आहे. लोकलने कामशेतला उतरायचं... डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालतं बेडसे लेणी गाठायची...

हक्क

लेखक सूर्य यांनी मंगळवार, 13/10/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या सकाळी सकाळी उठुन सात वाजता मी मतदान करुन येणार". मी बायकोपाशी जाहीर करुन टाकले. आज इ-मेल आली होती. कंपनी इज कमिटेड टु एनेबलिंग इट्स एम्प्लॉइज टु कास्ट देअर वोट. थँक यु फॉर एक्सरसाईजींग युवर राईट टु वोट. कंपनीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली होती. 'राईट टु वोट', हक्क ..हम्म.. मी मनाशी म्हटले. आपला हक्क आपण बजावलाच पाहीजे. 'परिस्थीती वाईट आहे' असे म्हणुन आपण नेहेमी शिव्या घालत असतो. आपले काम आपण कधी करणार. लेट मी कंप्लीट माय टास्क. त्या विचारातच घरी आलो होतो. बरेच वर्षात सुट्टी असताना घड्याळात सकाळचे सात वाजलेले बघितले नव्हते. आज बघितले. मतदानाला जायचे आहे, मनात घोळत होते.

झुला

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 13/10/2009 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
"पण मेहता, तुम्ही माझा प्रोब्लेमच समजून घेत नाही." गौरव आता चिडून उभा राहीला. "अरे पण सरमळकरभाय, तुम्ही इतका चिडते कशाला ?" चिडलेल्या कस्टमरला कसं हॅंडल करायचं हे मेहतांना चांगलच ज्ञात होतं. त्यांनी त्यांच्या आवाजाची पट्टी बर्फाच्या पाण्यात गुंडाळल्यासारखी थंड राखली होती. "मेहता, दोन दिवसांनी तुमच्यामुळे मी होमलेस होणार आहे आणि तुम्ही मला विचारताय, चिडतो कशाला ? " गौरव दोन्ही हात टेबलावर ठेवून जवळ-जवळ किंचाळलाच त्यांच्यावर. "अरे, पण मी तुमचा प्रोब्लेम सोल्व करते बोल्ला ना. मग टेंशन कशाला घेते ? बसा तुम्ही. ये भद्रेश, एक थंडा सांग सेठसाठी." मेहताने उठून गौरवला बसवत ऑर्डर दिली.