Skip to main content

अप्पे आणि चटणी

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 24/11/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ,एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव,३/४ मिरच्या, ६ लसुण पाकळ्या ,१ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर मीठ चवीप्रमाणे... कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे करायला घ्यावेत.

दुधी भोपळ्याचे रायते

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 24/11/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : किसलेला दुधी भोपळा १ कप, गार दही २ कप( सायीचे असेल तर छान), बारीक चिरलेला कांदा १ मोठा चमचा , बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा चमचा, जीरे पूड १ चमचा, चवीनुसार मीठ, साखर......... कृती : साले काढुन किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या आणि भोपळा थोडावेळ गार करायला ठेवा. तोपर्यंत दही चांगले फेटून घ्या. मग ह्या दह्यामधे सगळे साहित्य टाकून चांगले मिक्स करा. दही गार असल्यामुळे तुम्ही हा रायता लगेच खाऊ शकता किंवा १ तास फीज़ मधे ठेवा. हा गार रायता तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता.

तू तर माझी बायको, शारदा.....

लेखक भानस यांनी मंगळवार, 24/11/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते.

मी आणी पाउस

लेखक प्रभो यांनी सोमवार, 23/11/2009 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली अशाच काही क्षणी येते आठवण तुझी माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श नभासही सार्‍या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं
काव्यरस

बोलताना का सुचेना..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 23/11/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! पायवाटा त्याच त्या की, चालते मी तीच ती तीच माझी पाउले अन त्याच त्या खाणाखुणा.. सांगताना थांबते मी त्या तिथे पुन्हा पुन्हा भासते का नित्य तेथे तीच शब्दऽ वंचना.. घाव ते ही ओळखीचे, खोल गेले नेमके त्याच जखमा आणि सार्‍या ओळखीच्या वेदना.. तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना.. का कुठेही वेगळेसे फासलेले रंग ना ना कुणीही वेगळीशी मांडलेली भावना.. तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..! - प्राजु

काहि नाटके व आठवणी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2009 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
काहि नाटके व आठवणी.. आचार्य.....नावांचे नाटक आचार्य अत्रे यांच्या विरोधात लिहिले गेले आहे अशी कुणकुण लागली होति..नक्कि आठवत नाहि पण पहिला हिंवा दुसराच प्रयोग असेल..भरत नाट्य मंदिरला प्रयोग होता..

लो फॅट पनीर

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 23/11/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील पनीर वाल्या पाककृती पाहून खायचा मोह अनावर झाला तेव्हा मी शेवटी काही लो फॅट पर्याय शोधायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर शेवटी हे लो फॅट पनीर मिळाले. माझ्यासारखे पनीर पाहून नुसतीच लाळ गाळणारे कोणी मिपाकर असल्यास त्यांनाही उपयोगी पडेल म्हणून इथे कृती देतेय. साहित्य १६ कप १% दूध २ कप स्किम मिल्क पावडर १/३ कप व्हाईट व्हिनेगर कृती मोठ्या पातेल्यात दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन गॅस वर गरम करायला ठेवा. उकळी आली की त्यात व्हिनेगर घालून नेहमी सारखे पनीर करा.

सुरक्षा ? ? ?

लेखक विनायक रानडे यांनी सोमवार, 23/11/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे.

होम लोन... मार्गदर्शन हवयं...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 23/11/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण २० लाखापर्यंत होम लोन घ्यायचं असेल तर कोणत्या bank च घ्यावं... ह्या बाबतीत मला फारच कमी माहीती आहे... त्यामुळे मार्गदर्शन करा...