Skip to main content

अजीब दास्ता हैं ये..... शेवट

लेखक भानस यांनी बुधवार, 09/12/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय म्हणेल, " वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " अग अग दिशा, काय करते आहेस? आत्ता त्या सायकलवाल्याला मारले असतेस तू. लक्ष कुठेय तुझे? " निमा ओरडत होती. मागून रेश्मा व दिल्यानेही हटकले. " अरे बापरे! दिशा सांभाळ गं बाई, उगाच कोणा बिचाऱ्यावर गाडी घालू नकोस बरं का. कसला एवढा गहन विचार करते आहेस?

आमची `शोध'(?)पत्रकारिता!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 09/12/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचं बोलणं चोरून ऐकण्याची आणि ते दुसर्‍यापर्यंत विनाविलंब पोहोचवायची आमची सवय तशी फार जुनीच. म्हणजे इतकी जुनी, की, आम्ही बातमीदार होणार असं भविष्य आमच्या पिताश्रींनी खूप लहानपणीच- म्हणजे `आमच्या' लहानपणी- वर्तवलं होतं. आज आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, याचं कारण, पाळण्यातले पाय पाहून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र अलीकडे लोप पावत असताना, असे शास्त्र खरोखरच अस्तित्वात होते, याचा ठोस पुरावा आमच्या रूपानेच आमच्या हाती आहे. बातमीदाराने (पक्षी- रिपोर्टराने) पुरावा हाती असल्याखेरीज बातमी `डिस्क्लोज' करू नये, असं पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं जातं असं म्हणतात.

कधीतरी

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 09/12/2009 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी बेधुंद होऊन बघायचयं कधीतरी बेहोश होऊन बघायचयं बेधुंद बेहोशीत जगणा~यांना अनुभवायचयं कधीतरी पंख पसरुन उडायचयं कधीतरी अंग आक्रसुन पोहायचयं स्वच्छंद राहुन गुलामी अनुभवायचीयं कधीतरी गर्दित हरवायचयं कधीतरी एकांतात स्वतःला शोधायचयं हरवताना स्वतःलाच सापडायचयं कधीतरी जगुन बघायचयं कधीतरी थराराला सामोरं जायचयं मरताना तुझ्या डोळ्यातले माझ्यावर असलेले प्रेम बघायचयं प्रसन्ना जीके.

फोटो रिस्टोरेशन

लेखक विनायक रानडे यांनी बुधवार, 09/12/2009 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
हा ओळख पत्रातला लॅमिनेट केलेला फोटो होता त्याला ए४ पाना एवढा रिस्टोर केला.

बाप्पा आणि मुटके

लेखक गणपा यांनी बुधवार, 09/12/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी.... आजच्या या दुसर्‍या गावठी स्पेशल भागात आपल स्वागत. आपल्याकडे प्रत्येक सणाच अस एक वैशिष्ठ्य असत. आणि सण म्हटला की तो साजरा करताना विविध पक्वांन्न नसतील तर त्या सणांची मजा ती काय!!!!! उदाहरण द्यायचच झाल तर नारळी पौर्णिमा आली की नारळाच्या वड्या, नारळी भात हे ठरलेल. गणपतीला उकडीचे मोदक. होळीला पुरणाची पोळी. गुढी पाडवा म्हटल की जिलेबी, श्रिखंड पुरी आठवते तर कोजागीरीला मसाला दुध...आणि सणांची राणी दिवाळी. तिची तर तर्‍हाच न्यारी. किती किती नी काय काय फराळ.

(सवयीने मंद)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 09/12/2009 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा माझ्या मंदपणाची! टवाळीची साद घालून जाणारे विविध लेखकूंचे एकोळी धागे... काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ काही अस्ताव्यस्त काही सुस्त काही दळण तेच तेच दळणारे फक्त कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ... तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...
काव्यरस

जाता जात नाही 'ती'

लेखक प्रशु यांनी मंगळवार, 08/12/2009 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
जाता जात नाही ती 'जात' दोन दिवसा पुर्वी बाबासाहेबांचा महानिर्वाण दिन झाला. त्या वेळी निरनिराळ्या वर्तमानपत्रात बाबासाहेब, त्यांचे विचार, कार्य, आणि सध्य स्थीती ह्यावर सालाबादप्रमाणे चर्च्या झडल्या. व्रुत्त वाहिन्यांवर वाद विवाद झाले. पण मुळ ह्यातुन संवाद व्हावा हि अपेक्षा धरणे म्हणजे मुर्ख पणा आहे. असो. हे प्रकटन लिहिण्यास कारण की अश्याच एका लेखावर ('बोधिसत्वाची बांडगुळे') आधारीत धाग्यावर मी एक प्रतिक्रिया टाकली. प्रतिक्रिया थोडी अवांतर वाटली असावी म्हणुन त्यावर एका मिपाकरानी मला शालजोडीतले दिले.