Skip to main content

'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय', वाचावेच असे पुस्तक

लेखक केदार भिडे यांनी गुरुवार, 19/08/2021 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरनामा मध्ये आलेला लेख (लिंक शेवटी) वाचून मला या पुस्तकाचा परिचय झाला. तेव्हाच हे पुस्तक वाचायचे असे माझ्या मनात नोंदवून ठेवले होते. आमच्या गावात विठ्ठलाचे देऊळ आहे आणि तिथे आषाढ महिन्यात उत्सवही असतो. गेले वर्ष आणि या वर्षी कोविड साथीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही आषाढ म्हटले की विठ्ठल हे समीकरण माझ्याच नव्हे तर समस्त मराठी मनात पक्के आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ महिना जवळ आला तसं या पुस्तकाची मला आठवण आली आणि लगेच खरेदी करून वाचूनही काढले. सर्व पुस्तक आतुरतेने वाचून काढले. त्यातील मला आकलन झालेले काही मुद्दे खालील प्रमाणे.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/08/2021 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

निसर्गरम्य तोरणमाळ

लेखक गोरगावलेकर यांनी बुधवार, 18/08/2021 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच काही कामानिमित्त माहेरी फेरी झाली. आम्ही सहा बहिणी व एक भाऊ असा मोठा परिवार आहे. सर्व बहिणी जळगाव जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे मी गावी येणार आहे असे समजले कि बहिणी, भाचे कंपनीची भेटायला येण्याची लगबग सुरु होते. मी तेथे पोहोचायच्या आधीच वाड्यात सर्व मंडळी जमा झालेली असते. एक दिवस सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यात निघून जातो. यावेळी जवळपासच्या एखाद्या पर्यटन स्थळी सहलही करण्याचे ठरले होते. बच्चे कंपनी धरून चांगला पंधरा जणांचा ग्रुप जमला. ठिकाण ठरले चार साडेचार तासांवरील तोरणमाळ. सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण.

दैवाचा रिव्हर्स पंगा(इतरत्र पूर्व प्रकाशित)

लेखक भागो यांनी बुधवार, 18/08/2021 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
दैवाचा रिव्हर्स पंगा विक्रम भालेराव हे “पॉवरकॉन” कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होते. मी अस ऐकले आहे की सॉफ्टवेअर कंपन्यांमधून मॅनेजरला मांजर म्हणतात. पण भालेराव मांजर नसून वाघ होते. ते कायम कुणावरतरी हल्ला करून त्याला फाडून खायच्या मूड मध्ये असत. हे असे का? त्याला अनेक कारणे असावीत. तुम्ही खोदून चौकशी केलीत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे एकमुखाने सांगतील, “सरांचे काय आहे तसे ते स्वभावाने फार चांगले आहेत. ते कुणावर आरडा ओरड करतील त्याचा नेम नाही, पण ते मनात काही ठेवत नाहीत. ऑफिसमधून संध्याकाळी घरी जाताना मन कसे निर्झरासारखे स्वच्छ!

विचार ( हायकू)

लेखक रानरेडा यांनी बुधवार, 18/08/2021 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांच्या चिखलात लोळत होता मनरुपी डुक्कर

सत्य

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 17/08/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते.

नियतीचे वर आणि माणसाची निवड (कथा परिचय : ९)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 17/08/2021 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ६. ती सुंदर? मीही सुंदर ! ७. ‘लॉटरी’.....अरे बापरे ८. तीन मिनिटांची ये-जा ................................... आपणा सर्वांचे लेखमालेच्या नवव्या भागात स्वागत ! इथे एका बोधकथेचा परिचय करून देतोय आणि त्याचे लेखक आहेत मार्क ट्वेन. हे लेखक 19 व्या शतकातील एक नामवंत अमेरिकी साहित्यिक होते.

अभियांत्रिकीचे दिवस-२

लेखक पाटिल यांनी सोमवार, 16/08/2021 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!'' अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.. होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..

स्मरण चांदणे३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 16/08/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
        स्मरण चांदणे 3    गावात  एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी  बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात. देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक. जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत. 'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आ

स्मरण चांदणे३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 16/08/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
        स्मरण चांदणे 3    गावात  एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी  बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात. देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक. जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत. 'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आ