कोकणातली भटकंती...
सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता...
पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो...
मिसळपाव