Skip to main content

कोकणातली भटकंती...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 02/02/2010 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता... पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो...

आठवण...(२)

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 02/02/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तुला पाहून तुझा सुगंध माझ्या श्वासात भरून डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या आवाजावर समाधान मानतोय ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा ती शेअर केलेली कॅडबरी बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा' नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा सगळ्याची आठवण येतेय आजही माझ्याकडे आहे तुझा तो पहिला मेसेज आणी पहिल्या शॉपिंगचा शर्ट आज तोच शर्ट घालून ऑफिसला जावे म्हणतोय
काव्यरस

कारे प्रिया दूर जाशी,

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 02/02/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
चिम्ब चिम्ब वाटा, चिम्ब चिम्ब झाडे, आसमंती मन होते, चिम्ब चिम्ब वेडे..... वरुण राजा आज कैसा, धरित्रिला कुरवाळितो सोडुनिया आकाश घरटे, प्रिये कड़े झेपावतो..... कारे प्रिया दूर जाशी, अश्या चिम्ब वेळी, दाट धुक्याचे कोंदण माझे, अंग अंग जाळी......... सागर लहरी

मराठी जुनी पुस्तकं 'डिजीटल ग्रंथालयात'

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 02/02/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल.

हक्क

लेखक नीलांबरी यांनी मंगळवार, 02/02/2010 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.

सध्याचे वाचन - २

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 02/02/2010 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
१. कर्णपिशाच्चं: लेखकः बाळा फोंडके. लेखन प्रकारः डिटेक्टिव्ह रहस्य कथा. बाळूने साफ निराशा केली. कथा अतिशय टुच्च्या आहेत. दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत. पुस्तकाच्या कव्हर वर काळ्या बॅकग्राउंड वर एका कवटीच चित्र आहे. त्याच प्रयोजन आजूनही समजलेल नाही. मला पुस्तक हातात घेतल्यावर लय भारी वाटल होत. पण मी चू*त निघालो. २५० रुपयांना चूना !!! २. आवरण: लेखक: एस. एल. भैरप्पा. (कन्नड- अनुवादित) प्रकारः कादंबरी-वैचारीक, ऐतिहासीक . विस्मरणाने सत्य झाकोळलं जातं. त्याला आवरण म्हणातात. या थीम वर भैरप्पांनी सुंदर कादंबरी रचली आहे. रझिया-पूर्वीची लक्ष्मी. आमिरशी लग्न करते.

आज अचानक...

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक कातरवेळी, मनी दाटती काजळरेषा वाट चालुनि थकली पाऊले चल साजणा अपुल्या देशा गर्भरेशमी यौवन सरले, शैशव आता स्वप्नचि उरले आठवणींचा खेळ चालला संध्याछाया झाकोळती दिशा सखेसोबती वाट पाहती समांतर वाटा जरी चालती मधुर क्षणांची बकुलपुष्पे अजुनि जागविती मनी आशा पैलतीरी नेत्र लागले स्वप्नांचे आभासही नुरले नको येथले भास मखमली अन परतीची फसवी भाषा.
काव्यरस