Skip to main content

फुलांचे प्रदर्शन, पुणे भाग २

लेखक विनायक रानडे यांनी रविवार, 07/02/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक प्रकार मेहेक ह्या कंपनीच्या दालनातील सजावटीचा होता नाव होते " नॅनो " वर व खाली ह्या दोन्ही सजावटी स्पर्धेतील आहेत.

धोका

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/02/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा बेगडी आयुष्य देते रोज धोका बंद केली मी सुखाची सर्व दारे, एकही नाही घराला या झरोका हारणे हा वारसा की धर्म माझा? सोडला हातातला प्रत्येक मोका! सोबती काळोखगर्भाचा उबारा, आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

आता तुझी पाळी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी रविवार, 07/02/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
'चला, कणकवली. कणकवलीवाले उतरून घ्या. गाडी दहा मिनिटे थांबेल.' कंडक्टरच्या आवाजाने तंद्रीतून जागा झालो. घड्याळ पाहिलं-दुपारचे दोन. हात वर करुन एक आळस दिला. अजून चार तासात कोल्हापूर. तिथून सांगली दोन तास. तिथून औदुंबरला जायला असा किती वेळ लागतो? अंग घामाने भिजलेले होते. कपडे तसेच चिंब भिजून अंगाला चिकटलेले. आधीच कोकण्-त्यात मार्च महिना- त्यातच हा लांबवरचा प्रवास्-दोडामार्ग ते कोल्हापूर- अंगभर घामाचे झरे पाझरणार, नाही तर काय होणार? बरोबर दहाव्या मिनिटाला कंडक्टरने बेल मारली. बाकी एक मात्र खरं, गोवा डेपोच्या बसेस वेळेबाबत अगदी पंक्चुअल! गाडी कोल्हापूरकडे पळू लागली.

रस आणि शेवया

लेखक कपिल काळे यांनी रविवार, 07/02/2010 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच अंगारकी निमित्त, बाप्पाच्या नैवेद्यासाठी रस - शेवया केल्या होत्या. एकदम सोपी सुटसुटीत कृती आहे. साहित्य १. तांदळाची पिठी २. ओले खोबरे ३. गूळ ४. स्वादासाठी वेलची पूड तांदुळाच्या पिठीची उकड काढून घ्यावी. मुटकुळे करुन घ्यावेत. उकडीचे गरम मुटकुळे किचनप्रेस मध्ये टाकून शेवया करुन घ्याव्यात.

पुन्हा एकदा स्मृतीरममाणता

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 07/02/2010 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणूस स्मृतीत रमणारा 'रम्य भूतकाल' या वृत्तीचा आणि अव्यवहारिक नोस्टाल्जिक आहे का हा प्रश्न मी पूर्वी विचारला होता. (या मराठी माणसांत मीही आणि विशेषेकरुन मीही आलो!) . 'तसे स्मरणरंजक सगळीकडेच असतात' इथपासून ते 'स्मरणरंजनात वाईट काय?' अशा पिळदार मिशांच्या सवालापर्यंत उत्तरे आली. ही चर्चा उदाहरणार्थ विचारस्वातंत्र्याची तथाकथित मुस्कटदाबी होत असलेल्या संकेतस्थळावर झाली. पण स्वातंत्र्याचे मनमोकाट वारे वहात असलेल्या स्थळांवरही फारसे वेगळे चित्र नाही, असेच दिसते आहे.

नयना

लेखक सुनिल पाटकर यांनी शनिवार, 06/02/2010 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
नयना एका लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि.व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ?

आणखी किती सतिश शेट्टी?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 06/02/2010 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता. परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.

<परा>

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 06/02/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : सूचना: या लेखनातील परा याचा अर्थ पळूनजाणारा राजकुमार असा घ्यावा. कोणत्याही हयात असलेल्या नसलेल्या डुप्लीकेट/अडुप्लीकेट सदस्याचा काही संबन्ध लावू नये. कोण आहेस तु? जीमेल वर असतोस्? लॉग इन आयडी काय तुझे? पिंग पण करणार नाही ? माझ्याशी पण नाही ? मी तुला परा म्हणेन ! चालेल? तू ब्लॉक द सेंडर चे बटण दाबणार ? नको रे... नाही करणार पिंग सारखे सारखे ... परा! * परा ! ये ! ये ना !
काव्यरस