Skip to main content

मी संपादक झालो तर ?

लेखक टारझन यांनी शनिवार, 20/02/2010 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्‍याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन. तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी . आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे १. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा २. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ? ३. मी संपादक झालो तर ? ४.

अशीच जर आमुची आई असती........

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच जर आमुची आई असती........ असे हो कोणी दिनीचा तो वार लागला होता महाराजांचा दरबार आमचे मध्ये राजे भोवती सरदार स्वराजाचा चाले असा कारभार जी........

नकारघंटा.............

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज विसरुनी यत्न कालचे नवदिनी गुंतलो आज पुन्हा नकारघंटा वाजत राही तरी मनी आशा हा काय गुन्हा भूमीपुत्र हा असा मी अडलो संथता,अनुबंध,अतिक्रमणात अडकलो पात्रता निपुणता धाब्यावर बसवली आता मात्र प्रभूरामाची वाणी उमगली असे हे कलयुग आज उगवले काग मोत्य कंकर हंस गमले परकीयांचे गमभन रुजले राज्कृत्या राजनितीस रमले आज वाचा हि फोडत येथे युवाशक्ती महायुवाच नेते अतिक्रमणास धड्भू धम लावू नैपुण्य, पात्रता शिरोधिनी पाहू - मंगेश पावसकर

कसा दिस आला.....{verry sad material}

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
कसा दिस आला............... कसा दिस आला असा माझ्या या नशिबाचा प्रीतीनेच अंत केला माझ्या या प्रेमाचा आता माझे जीवन हे विषण्ण विराण हे मनामध्ये सुडाचे जागले थैमान हे कुणाला हे सांगू आणि समजाऊ कोणाला प्रीतीनेच अंत केला .......... कसा दिस आला .............. तेव्हा तुझे स्मित हास्य नवखे नवीन से डोळे दोन्ही माझ्यावर नाव ते मनी असे कसे तोडीत गेली तू माझ्या या मनाला प्रीतीनेच अंत केला .............. कसा दिस आला ............... आता मी न जागतो न संपते हि रात्र हि पुन्हा पुन्हा स्वप्नीची माया मनी येत जाई आता प्रेम मन कधी करेना कुणाला प्रीतीनेच अंत केला.......... कसा दिस आला............. दु
काव्यरस

बिल्डर कसे व्हावे ......

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
बिल्डर कसे व्हावे............. (व्यंग) नमस्कार !!........ आज आपणास मार्गदर्शन करणार आहे बिल्डर कसे व्हावे. काही जणांच्या मते बिल्डर बनणे हि फारच किचकट गोष्ट आहे . आम्ही म्हणतो कठीण आहे पण जर आपण इतर यशस्वी बिल्डर पाहिलेत व त्यांचा पायावर पाय ठेवून जर बांधकाम व्यवसायाची माहिती घेतलीत, तर नक्कीच हा व्यवसाय फलदायी व क्लेश रहित आहे. इथे आपणास मुद्देसूद व सकल मार्गदर्शन केले आहे, पण अर्थात हे आजकालच्या जगतातले शिक्षण आहे, व ते आजकालच्या प्रमाणेच अवलंबिले पाहिजे. बाकी आपल्या तोंडी गरज आहे ती फक्त अरेरावीच्या भाषेची.....

"पुस्तकी" विनोद!!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 20/02/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(वेगळ्या प्रकारच्या एका विनोदाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कसा वाटला ते जरूर कळवा. यात कुणालाही आणि कशालाही दुखावण्याचा हेतू नाही.. तसे वाटल्यास हसून मोकळे व्हा - क्षणाचा सोबती) एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना: या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही. तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही.

कोडी पचडी - चिकनचे लोणचे

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 20/02/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
ही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून - "ट्राईड अँड टेस्टेड" अशी आहे. अनेक पायर्‍या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्‍या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत :) ). अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा.

साअरडो पावासाठी विरजण

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 20/02/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
काहींचा हा प्रयोग फसला असल्याचे वाचले, म्हणून मला अनेकदा हमखास जमलेली पाककॄती देत आहे. साअरडो पावासाठी विरजण लावणं भारतात खूप सोपं आहे, पण हवाबंद पाश्चिमात्य घरांत थोडी काळजी घ्यावी लागते. पूर्वसूचना: ही कॄती काही दिवसांची आहे. भारतात २-३ दिवसांत होते. हिवाळ्यात, थंड हवेच्या प्रदेशात हमखास फसणार. कॅलिफोर्निआत जमेल.
  1. कणकेचा लिंबाएवढा गोळा भिजवून घेणे. टीपः मीठ अजिबात न वापरणे. त्याने कवके मरतात. नळाच्या पाण्यात क्लोरिन अधिक असू शकते. त्यामुळेही कवके मरतात. ते टाळण्यासाठी पाणी न झाकता २४ तास ठेवावे, व मगच वापरावे. पाणी नंतर उडून जाते, त्यामुळे भिजवताना थोडे जास्त वापरावे.

किस्से कॅफेतले

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 20/02/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये 'बिकांना' माझ्या कॅफेत घडलेले काही गंमतीशीर किस्से सांगितले होते. ते किस्से लिहुन काढ म्हणुन बिका मागे लागले होते पण मी नेहमीप्रमाणेच आळस केला. काल सुहासनी विषय काढलाच त्यामुळे पुन्हा उत्साह आला आणी काही किस्से लिहुन काढले. चला तर मह लुटुया लुत्फ ... किस्सा १ :- वेळ :- सकाळी ११.२५ साधारण एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते. युवती :- एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ? मी :- एक्स्टर्नल ?? युवती :- हो ! किती पैसे होतील ? मी :- तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन.