Skip to main content

सुटका

लेखक भागो यांनी शुक्रवार, 03/09/2021 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
थाड थाड आवाज करून आचके देत अखेर गाडी बंद पडली. डॉक्टरांना अंदेशा आलाच होता. गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती. डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे साडेआठ झाले होते. त्यांनी रस्त्यावर पुढे मागे नजर टाकली. चिटपाखरू पण दिसत नव्हते. हा चिटपाखरू नव्हे पण मधुनच काजव्यांचे थवे लुकलुकताना दिसत होते. मान्सून सुरु होऊन दोन तीन आठवडे झाले असावेत. रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव डराव आवाज करत होते. रातकिडे किर्र करत होते. बस एवढीच कायती हालचाल. ह्या आडरस्त्यावर माणूस भेटायची शक्यता नव्हती, कोण येणार रात्री अपरात्री ह्या रस्त्यावर?

जनरेशन गॅॅप

लेखक भागो यांनी गुरुवार, 02/09/2021 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
पांडुरंग स्वतःवरच भनकला होता. शेजारचा श्रीरंग तो किती हुशार होता. ते काय म्हणतात न हां स्मार्ट! सगळेजण त्याची स्तुति करतात. पोरीबाळींशी बोलताना तर विचारायला नको. असा लाळघोटेपणा करतो. पण कामात मात्र चुकार. साधी बेरीज वजाबाकी करण्यात हजार चुका. वाण्याकडे सामान आणायला गेला तर वाणी त्याला हमेशा चुकीची मोड देणार! त्याचा मालक दहादा त्याच्याकडून हिशेब करून घेणार, मालक बिचारा म्हातारा झालेला, पहिल्या तारखेला येणाऱ्या पेन्शनवर सगळा महिना काढायाचा . त्याला पै न पैची काळजी असणारच. आता ह्या वयात रंग्याला काढून दुसऱ्या कुणाला ठेवायचे म्हणजे जीवाला केव्हढा घोर.

जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 01/09/2021 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले वार्‍यावर उडणारा, मी केर, धूळ, माती येता तू सांगाती दगडांचे झाले मोती. परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले. गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला र्‍हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
काव्यरस

पारवे पाळले होते

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/09/2021 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गावात भोई मास्तरांनी पारवे पाळलेले होते. (त्यांचं आडनाव भोईच होतं.) पारव्यांसाठी त्यांनी मोठं लाकडी खोकं तयार करून घेतलं होतं. खोक्याला लोंखडी जाळी बसवलेली होती. सकाळी त्या खोक्याचं दार उघडलं की पारव्यांचा थवा बाहेर उडायचा. गल्लीत, झाडांवर, भितींवर, घरांवर सगळीकडे ते उडत- चरत विहार करायचे. आणि संध्याकाळी बरोबर त्याच खोक्यात येऊन बसत. खोक्यात ती गुटूरगूम...गुटूरगुम करायची. भुई मास्तरांचा मुलगा- सुरेश त्यांना ‘आऽ आऽ’ करून बोलवायचा. दाणे टाकायचा. पारवे त्याला ओळखायचे. त्याच्या अंगावर बसायचे. त्याच्या आजूबाजूला न घाबरता बागडायचे. हे दृश्य पाहून माझं मन हरखून जायचं.

रायगड जिल्ह्यातील पारंपारिक गोकूळ अष्टमी साठी नैवेद्याचे कुट्याचे लाडू/घरगुती कुरमू-याचे लाडू

लेखक जागु यांनी सोमवार, 30/08/2021 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
|| जय श्री कृष्ण || गोकूळ अष्टमीला महाराष्ट्रात घरोघरी बालगोपाळाला गोडाचे नैवेद्य दाखविले जाते. रायगड जिल्ह्यात तांदळाची शेती केली जाते त्यामुळे घरगुती तांदळापासून बहुतांशी घरात कुरमुरे तयार करुन ते भरडून, गूळ व इतर जिन्नसे खल-बत्यात कुटून त्यापासून लाडू करून तो नैवेद्या दाखविण्याची परंपरा आहे. खलबत्यात कुटल्याने भरड पीठ व गुळ एकजीव होते. कुटतात म्हणून याला कुट्याचे लाडू असेही म्हणतात. बरं हे कुरमुरे म्हणजे भेळवाल्याकडे मिळणा-या कुरमु-याप्रमाणे नसून पाण्यात अर्धा दिवस भिजवून तव्यावर अथवा कढईत खमंग भाजून मस्त कुरकुरीत केलेले तांदूळ असतात.

Loreak...एक स्पॅनिश चित्रपट.

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 30/08/2021 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
Loreak - flowers. Directors: Jon Garaño, José María Goenaga दोन स्त्रिया, ऍन आणि lourdes (मनी हाईस्टची राकेल). एकमेकांना न ओळखणा-या. दोघीही चाळीशीच्या आसपास. फुलांच्या एका निनावी बुकेमुळं त्यांच्या मनोविश्वात काय काय स्थित्यंतरं होतात हे तरलपणे दाखवणारा हा स्पॅनिश/ बास्क चित्रपट. दोघींच्या कथा इथं simultaneously उलगडत जातात. पहिलं कपल ऍन आणि तिचा नवरा. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात येणारं साचलेपण, संवादाचा अभाव इथंही आहे. तिची मेनॉपॉज जवळ आलीय. त्यामुळे काही ना काही शारिरीक तक्रारी आहेतच. एक दिवस तिची डॉक्टर तिला सांगते, एक छोटी सर्जरी करावी लागेल.ऍन घरी येते.

गोकुळ अष्टमी  ..स्त्रीला भेटत राहतो कान्हा

लेखक Bhakti यांनी सोमवार, 30/08/2021 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा ..सावळा..बासुरीवाला..राधेचा सखा..अगदी लहानपणापासून आपण याची अनेक रूपे पाहत मोठे होत आलो आहोत.मुलींना त्याच बासारीधारक रूप आवडतं. लहान असताना कान्ह्याच्या रम्य नटखट गोष्टी ऐकल्या आहेत.अजूनही छोटा कान्हा माती खातो तेव्हा यशोदामय्या त्याला दरडावून तोंड उघडायला सांगते  तिला विश्वरूप ब्रम्हांड दिसते आणि तिला भोवळ येते.हि गोष्ट फार फार आवडते.

पारनेर -१ (ढोकेश्वर लेणी )

लेखक Bhakti यांनी रविवार, 29/08/2021 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इतकी व्यस्तता झाली आहे की १०-२० किमीची भटकंतीही सुसाह्य झाली आहे.घर की मुर्गी दाल बराबर सारख ण करता आसपासच्या ठिकाणांना करोनातला आधार म्हणून डावलून कसे चालेल.टाकळी ढोकेश्वरची लेणी (गुहा) पाहण्याचा सूटसुटीत बेत आखला . “श्रावण मासातली हिरवाई पाहत रस्ता कापत होतो.रस्त्याच्या दुतर्फा देवबाभाळाची आणि पिवळ्या रंगांच्या फुलांनी मांडव घातला होता.शेतातली पिकं,झेंडूची फुले ,सूर्यफुल मन मोहित करीत होती.एक हिरवाईने नटलेला डोंगर दिसला येतांना थांबूया इथे ठरवले.हवेत आल्हाददायक गारवा जाणवत होता.मनोमनी पावसाची इच्छा बाळगत होते. एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा थोडा होता.तलावाचा पूल

सद्गुणांचं संचित

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 29/08/2021 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच.

वरदान

लेखक भागो यांनी रविवार, 29/08/2021 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
वरदान संध्याकाळचे सहा वाजले की माझी पाऊलं अपोआप हॅाटेल सवेराकडे वळतात. आज पण मी समोरचे कागद बाजूला सारून, कपडे करून बाहेर पडलो. माझ्या नेहमीच्या हॅाटेलच्या मध्ये जाऊन चहा पीत बसणे हा माझा आवडीचा टाइम पास होता. ह्या हॅाटेलची रचना मोठी सुरेख आहे. काही टेबल आंत होती तर काही बाहेर मोकळ्यावर. ज्याची जशी आवड त्याप्रमाणे लोक बसत असत. मी नेहमी बाहेर एका ठरलेल्या जागी जाऊन बसतो. ह्या जागेवरून रस्त्यावरची रहदारी अगदी सहज नजरेस पडते. मी येईपर्यंत शेट्टी त्या टेबलावर रिझर्वची पट्टी लाऊन ठेवत असे. माझ्यापासून शेट्टीच्या हॅाटेलचा खास फायदा होत असेल असे नाही.