Skip to main content

एक पौष्टिक आहार्--नाचणी वडी

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 05/03/2010 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-एक वाटी नाचणी पीठ,अर्धा वाटी खोबरे,दीड वाटी साखर ,थोडी वेलची पूड्,एक चमचा तूप कृति-प्रथम तुपावर नाचणी पीठ व खोबरे भाजून घ्यावे.साखरेत थोडेसे पाणी घालून घट्टसा पाक करावा,पाकात वेलची पूड ,भाजलेले पीठ व खोबरे घालून मिश्रण घट्ट होइपर्यंत हलवावे.ताटाला तूपाचा हात फिरवून मिश्रण ओतावे ,गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. नाचणी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे लहान मुले,गर्भवती महिला,म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त. नाचणीच्या रंगामुळे बरेचजण ती खायचे टाळतात्,वड्यांचा रंग कोकोसारखा दिसतो म्हणून कोणीही आवडीने खाऊ शकेल.

सचिनची आरती!

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 05/03/2010 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळपासून एक ढकलपत्र जालावर फिरतेय. (माझ्या ८ मित्रांनी पाठवलंय मला आजच्या दिवसात). सचिनची कुणीतरी आरती लिहिलीये. कोणी लिहिलंय ठाऊक नाही. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची! अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची! सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची! आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची! जय देव जय देव जय तेंडुलकरा! तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा! जय देव जय देव.. १४७ चेंडू खेळपट्टीवरी उभा! सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा! मदतीला कार्तिक पठाण धोनी आलेगा! धावांचा डोंगर उभा राहिला बघा!

कवितक -१ माणूस अशातला - माणूस तशातला

लेखक चित्रा यांनी गुरुवार, 04/03/2010 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसावरून सुचलेले हे काव्यरत्न. ते प्रो. घासकडवी यांच्या मार्गदर्शनपर लेखाला आलेल्या विविध रसांतील काव्यांत कुठेतरी गहाळ झाले असते, म्हणून इथे टंकणार आहे. अर्थातच देवी सरस्वती आणि प्रो. घासकडवी यांना आदरपूर्वक प्रणिपात करून. रस अर्थातच भयंकर. हास्य, करूणा, वीर, अद्भुत यांच्या सगळ्यांच्या मिश्रणाने तयार झालेले हे मिश्रण केवळ भयंकरच असू शकते. तेव्हा सादर आहे आमची काव्याची पाककृती - क्ष - माणूस य - मनातला, गाण्यातला, धंद्यातला, वांध्यातला (ही विशेषणेही होऊ शकतात, याने आम्ही कवितकांमध्ये वरच्या लेव्हलला पोचतो का?
काव्यरस

माझे संत्रापुराण

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 04/03/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते. काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते!

श्वास

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मी उरतो ,कधी मी पुरतो एकमेव मी कधी न भुलतो साथ माझी रे जन्मापासुनी मी संपता जीव ना उरतो कधी उश्वास नधी निश्वास नावं माझी अनेक हृदयाशी मैत्री माझी फक्त श्वास म्हणूनच नेक कधी शरीर, कधी काया जेथे मी तेथे माया क्षणार्धात मी सोडूनी जाता नाती गोती सर्वही वाया काळ मी आज मी सुरवात मी शेवट मी अनादी मी अनंत मी दिव्यासारखा तेवत मी दिव्यासारखा तेवत मी

माय मराठी

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली धोतर लेन्ग्याची लाज वाटते आज मराठी माणसाला बर्गर चाच वास येतोय मराठमोळ्या कणसाला मराठी मातीतच खेळायचं असं म्हणत बसलो इथच सांगतो मित्रानो आपलं गणित फसलं अटके पार लावलेला झेंडा जरा आठवा टाच मारून याच मातीतून मराठी, गल्ली गल्लीत पोचवा शिवाजी राजे भोसले (चित्रपट) पाहून ३ तास का होईना मन पेटलं मराठी माणूस जागा झाल्याच क्षणभर तरी वाटलं कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला द्या पुन्हा गर्जना SS , तोच मर्द मराठी ललकार दरी खोर्याच्या महाभूमिचे स्वप्

बघता बघता

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता दिवस सरतात ,लहानाचे मोठे होतो जीवनाच्या वाटेवर मग सुंदर एक क्षण येतो नवे पर्व ,नवी नाती सगळा नवं नवं असतं कुणीतरी अश्यावेळी सोबत हवं हवं असतं क्षितीजामागे सांजवेळी जग अगदी छान दिसतं स्वप्नातल्या राज्यात मग दोघांचं गाव दिसतं सूर मग जुळून येतात, स्वप्नवत होतो आभास हृदयाला दोघांच्या पुरतो एकच श्वास एका प्लेट मध्ये मग भेळ पुरी तिखट असतानाही गोड लागते ती जवळ असताना ,पाण्याविनाच तहान भागते ती च्या ती मध्ये मग माझ्यातला मी असतो तिच्यातल्या तिला पाहताना, माझा मीच हरवून बसतो
काव्यरस

शब्दार्थ हवा आहे.

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 04/03/2010 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मला कोणी "वितांशक" या शब्दाचा अर्थ सांगू शकेल का? जमल्यास व्युत्पत्तीसुद्धा द्यावी.