Skip to main content

एक पौष्टिक आहार्--नाचणी वडी

लेखक वैशाली हसमनीस यांनी शुक्रवार, 05/03/2010 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-एक वाटी नाचणी पीठ,अर्धा वाटी खोबरे,दीड वाटी साखर ,थोडी वेलची पूड्,एक चमचा तूप कृति-प्रथम तुपावर नाचणी पीठ व खोबरे भाजून घ्यावे.साखरेत थोडेसे पाणी घालून घट्टसा पाक करावा,पाकात वेलची पूड ,भाजलेले पीठ व खोबरे घालून मिश्रण घट्ट होइपर्यंत हलवावे.ताटाला तूपाचा हात फिरवून मिश्रण ओतावे ,गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. नाचणी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे लहान मुले,गर्भवती महिला,म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त. नाचणीच्या रंगामुळे बरेचजण ती खायचे टाळतात्,वड्यांचा रंग कोकोसारखा दिसतो म्हणून कोणीही आवडीने खाऊ शकेल.

वाचने 6058
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

माझ्या आवडीचा पदार्थ.... अवांतर : बर्‍याच दिवसानी मिपावर येणे झाले तुमचे...