Skip to main content

कोल्हापुर

लेखक नाद्खुळा यांनी शुक्रवार, 12/03/2010 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या कामातून मित्रानो ,थोडा वेळ काढूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया रंकाळ्यावरचा मस्त वेळ एकदम झक्कास टी टाइम भेळ पुन्हा एकदा खाऊया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया युनिवर्सिटीताली सुखद संध्याकाळ पन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ पुन्हा एकदा पाहूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया मिसळेचा जेवढा झटका माणुसकीची तेवढीच गोडी पुन्हा एकदा चाखूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया कट्ट्यावरची मस्ती खासबाग ची कुस्ती पुन्हा एकदा खेळूया एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया -के गा

कारभारी गोपाळे!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्‍या वार्‍याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं. पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्‍या पोरांचे आवाज कानावर आले.. "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!

झोप (Need, Deprivation and Abstinence thereof)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 12/03/2010 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी. -- आपला नम्र, इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.

दत्तकविधान-४

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
दीड वर्षं! तब्बल दीड वर्षं हातावर हात धरून भजन करायचं होतं. दुसरं मूल हवं होतं, त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती, पण मुलाचीच प्रतीक्षा होती. हा दीड वर्षांचा कालावधी फार जीवघेणा होता. आमच्या हातात काहीच नव्हतं...वाट बघण्याखेरीज! मनस्वी आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. शाळा, बाल भवनमधील दोस्त मंडळी, सोसायटीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरात धुडगूस सुरू झाल्यानं तिचीही स्वतःची मतं तयार होऊ लागली होती. "आपल्याकडेही बाळ आणायचं,' असं टुमणं सुरू झालं होतं. आम्ही तिला सांगूही शकत नव्हतो आणि लपवूही शकत नव्हतं. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार होता.

दत्तकविधान-३

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
संस्थेत आमची प्राथमिक मुलाखत झाली. आमचं मूल दत्तक घेण्याचं कारण, त्यामागची मानसिकता, आमची मानसिक-आर्थिक तयारी, दत्तक मुलाची प्रक्रिया, त्यासाठीची कागदपत्रे, सगळी माहिती देण्यात आली. जवळपास दोन तासांचं ते मार्गदर्शन होतं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं - दत्तक मूल मिळण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागतो. दत्तक घेऊ इच्छिणारे पालक "वेटिंग लिस्ट'वर आहेत! दीड वर्षं हा कालावधी आमच्यासाठी अगदीच अनपेक्षित, प्रदीर्घ होता. आमचं दोन मुलांमधल्या अंतराचं नियोजन बोंबललं होतं. म्हणजे मनस्वी साडेचार वर्षांची होईपर्यंत तरी तिला भाऊ मिळणार नव्हता. तोपर्यंत गावभर बोंब करून कुणाला सांगणंही योग्य नव्हतं.

दत्तकविधान-२

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षदा आणि मी एकत्र भेटून (एकमेकांशी) लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दुसऱ्याच बैठकीत आपल्या (भावी) अपत्यांविषयी चर्चा केली होती. सुदैवानं तिची आणि माझी आवड त्या बाबतीतही जुळली... एकट्या मुलांचे प्रश्‍न आसपासच्या कुटुंबांत पाहायला मिळत होते. मुलं एकांडी, हेकेखोर होणं, एकाच प्रकारे विचार करण्याची किंवा दुसऱ्यामध्ये न मिसळण्याची प्रवृत्ती निर्माण होणंही नवीन नव्हतं.

दत्तकविधान-१

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
child ``अमक्‍या तमक्‍याचं तिसरं मूलही असंच सातव्या महिन्यात गर्भात गेलं...'' कुणीतरी मला कळवळून सांगत होतं." "अरे, एवढी गंभीर परिस्थिती होती, तर कुणी सांगितलं होतं, नस्ती रिस्क घ्यायला?'' माझी त्यावरची सहजस्फूर्त, पहिली प्रतिक्रिया ही होती.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल. एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय! टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.) (आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!! लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता? (गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे? अं...आँ....कोण कुठे? अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी? हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते! मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले? मला काय माहीत?