Skip to main content

आयपीएल-पुणे संघ-नाव सुचवा

लेखक नील_गंधार यांनी सोमवार, 22/03/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालच सहारा ग्रुपने आयपीएल -४ हंगामापासून "पुणे " ह्या शहराची टिम विकत घेतली आहे. ती देखील तब्बल १७०० कोटी रुपयांना. तर इतर संघांप्रमाणेच ह्या संघाला देखील काहितरी छानसे नाव असायला पाहिजे. मला सुचलेली काहि नावे अशी १. मराठा वॅरिअर्स २. पुणे पेशवाज ३. सह्याद्री मराठाज ४. महाराष्ट्रा फायटर्स मंडळी तुम्हाला देखिल कोणकोणती नावे सुचली आहेत?

रस्ता ओलांडता

लेखक sur_nair यांनी सोमवार, 22/03/2010 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता ओलांडता आठवते चतुर्थीला गणपतीच्या देवळात आईचा हात धरून दर्शन घेताना आठवते अजून तो भरगर्दीतला रस्ता बाबांचा हात धरून ओलांडताना आठवतं अंधुकसं पहिल्यांदा जेव्हा आईनं शाळेत सोडलं होतं आठवतं जेव्हा, माझ्या हट्टाखातर बाबांनी खांद्यावर घेतलं होतं देवळात असो वा रस्ता ओलांडता किती सुरक्षित आहोत वाटायचे खांद्यावर बसून बाबांच्या मला आपण उंच झालो असे भासायचे पुढे वयाने मोठा, देहाने उंच झालो शाळा- कोलेजात जाऊन सुशिक्षित झालो अन रस्ता पार करता करता जाणवले आपण एकटेच फक्त आता पुढे आलो आई बाबा जसे होते तिथेच राहिले रस्त्याच्या त्या दुसरया बाजूला मधेच
काव्यरस

गांधी व मल्ल्या

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 21/03/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? 8| तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय? /:) क्रोधित (चुचु)

लवासा सिटि

लेखक धिन्गाना यांनी रविवार, 21/03/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षान्पुर्वि लवासा सिटिला गेलो होतो.देवड्या आणि चौक्याना तोन्ड द्यावे लागले.मोठ्या मिनतवारिने प्रवेश मिळाला.सहा गावे सम्पादुन हि सिटि तयार केलि आहे.किति गावकरि विस्थापित झाले असतिल कोन जाने.टेकड्या पायरि पायरि सपाट करत नवि फुलझाडे लाविलि होति.जुन्या व्रुक्शाना तिलान्जलि दिलि असेल.धनदान्डग्याच्या बोटिन्ग साठि नदि अडवुन पाणि साठविले आहे. पुढच्या लोकानि काय केले असेल?आता टाइम्स ओफ इन्डियमध्ये पर्यावरना वर लवासावाले व्याक्खान देत आहेत्.पर्यावरन्तज्द्न माधव गाडगिल ह्यान्च्याबरोबर बोलले. कोनि लक्श घालित नाहि. असो.

परवलीचा शब्द

लेखक देवदत्त यांनी रविवार, 21/03/2010 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या कथेत, अलिबाबाला त्या चाळीस चोरांच्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द कळला आणि त्याने आत जाऊन त्यातील फक्त हवे तेवढे सोने, दागिने स्वतःकरीता आणले. त्याचा भाई कासिम ह्याने गळ लावून अलिबाबाकडून त्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द मिळविला. गुहेत गेल्यावर आतील खजिना पाहून तो वेडाच झाला. त्यात तो परवलीचा शब्द विसरला आणि मग त्या चोरांच्या हाती लागून स्वतःचा जीव गमावून बसला. सर्वांना माहित असलेल्या कथेचा भाग संपला. अलिबाबाची कथा आजच्या जीवनात धरली तर, आपण ह्यातील एकच असे कोणी नाही तर त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रकारात येतो.