Skip to main content

किल्ले दुर्ग आणि धाकोबा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 25/03/2010 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले दुर्ग आणि ढाकोबा (मुरबाड परिसर) शनिवारी पहाटे ५.०० च्या सुमारास ठाण्याहुन बाईकवरुन निघालो. दोघेच. मुरबाड एस्.टी. स्टॅन्डवर आलो तेव्हा ७.३० वाजत आले होते. वाफाळलेला चहा घेतला आणि रामपुर या दुर्गच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाण्याचा रस्ता विचारुन घेतला. स्टॅन्डच्या बाजुनेच जो रस्ता धसईला जातो त्याच रस्त्यावर पुढे रामपुर लागते. रामपुरला येईपर्यंत ८.३० वाजत आले. रामपुर गावात एका घराच्या अंगणात बाईक लावली आणि जरा वाट दाखवायला कोणी मिळ्तय का त्याची चौकशी सुरु केली. रामभाऊ नावाचे एक मामा वाट दाखवायला तयार झाले. लगेच निघालो.

खिडक्या

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 24/03/2010 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला म्हणलं नेहमीप्रमाणे सुदर्शनला जाव. नाटक होत खिडक्या मूळ जर्मन नाटकाचे मराठी भाषांतर विद्यासागर व सुनंदा महाजन यांनी केलंय. कलाकार- ज्योती सुभाष, असीम पाळंदे आजी व नातू या दोनच पात्रांभोवती हे नाटक फिरतं. कमल आजी वय ७० (ज्योती सुभाष) व तिचा नातू प्रसाद वय २५ (असीम पाळंदे) यांच्या संवादातून होणारी तीन पिढ्यांचे चित्रण यात आहे. कमल आजीला प्रसाद मोठी आई म्हणतो. कारण आजी म्हटल्यानं तिला म्हातारं वाटतं. स्टेनो म्हणून रिटायर झालेली कमल व तिचा नवरा गोविंद हे दोघेच मुंबईत फ्लॆट मध्ये राहत असतात. दोघांची मुले अमेरिकेत व मुलगी कानपुरला. मुलांशी फारसा संपर्क नाही.

पहिलं प्रेमपत्र

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 24/03/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं..... मनात खूप धाकधूक वाटत होती.... छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची! काय करणार?

भेंडके / फुंडके खास खानदेशी पदार्थ

लेखक दिपाली पाटिल यांनी बुधवार, 24/03/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
भेंडके किंवा फुंडके किंवा वड्या खानदेशात खास प्रिय आहेत...मी मात्र भेंडकेच म्हणणार...पूर्वी घरी जात्यावर तुरींपासून डाळ पाडत असत, तेव्हा जो डाळीचा चूर पडे त्याचा वापर कसा करावा म्हणून हे भेंडके बनवण्यास सुरुवात झाली...तसे भेंडके बर्‍याच तर्‍हेतर्‍हेने बनतात... साधे कांदा घालून, चिवळीची भाजी (जीला स्थानिक भाषेत चिव्वयी किंवा चिव्वि ची भाजी म्हणतात.) आणि घोळीची भाजी...फॉर अ चेंज माझी आई मेथीची भाजी घालूनही बनवायची...आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा वाफवलेला प्रकार आहे म्हणजे अब्सोल्युटली नो ऑइल...

माथेरान....!!!

लेखक कैलास२४३ यांनी बुधवार, 24/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो हे माझे पहिलेच लेखन आहे..काही त्रुटी राहिल्या असल्यास क्षमस्व... २००७ च्या पावसाळ्यात आम्ही चार जण माथेरानला हुंदडायला गेलो होतो..त्यातील काही फोटो आणि त्याचे वर्णन येथे देत आहे... जेव्हा आम्ही तिथे गेलो त्यावेळी ढगफुटी झाल्यासारखा पाउस कोसळत होता..आणि माथेरनची टॉय ट्रेन जून ते नोव्हेंबर बंद असते.. हा पहिला फोटो सह्याद्री एक्सप्रेस मधून खंडाळ्याच्या स्टेशन जवळ काढला आहे... आणि हा फोटो नेरळ स्टेशन जवळचा..!! माथेरानला जाण्य

माझी प्रेम कविता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 24/03/2010 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
नाहि कळत मला तुझ्या प्रेम कविता त्या श्रुंगारीक उपमा....ते शब्द लालित्य त्या अनुप्रासात,गण,मात्रात गूंफलेल्या शब्द रचना.. माझी प्रेम कविता चार अक्षरात सुरु होते व संपते.. "तु माझा मी तुझी" माझी प्रेम कविता अविनाश

कोडे: विचारा एकच प्रश्न आणि उघडा स्वर्गाचे द्वार...

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 24/03/2010 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. दोन अगदी सारखे दरवाजे ... एक स्वर्गाचे प्रवेशद्वार आणि एक नरकाचे... पण कोणते कशाचे द्वार आहे हे कुठेच लिहिलेले नाही. प्रत्येक दरवाज्याजवळ अगदी सारखे दिसणारे पहारेकरी... दोन्ही पहारेकऱ्यांना माहिती आहे कोणते दार कशाचे आहे ते! पण, त्यातला एक पहारेकरी फक्त नेहमी खरेच बोलतो आणि एक नेहमी फक्त खोटे! पण नेमका कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, हे माहीत नाही. एक मनुष्य त्या दोन्ही दरवाज्यांजवळ आला. त्याने कोणत्यातरी एकाच पहारेकऱ्याला फक्त असा एकच प्रश्न विचारायला हवा की त्या प्रश्नाच्य

अभिनंदन

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 24/03/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोर्टाचे अभिनंदन कारण १. शिक्षकांना पल्स पोलियो, हागणदारी सर्वे व इतर जोखडातुन मुक्त केल्याबद्दल २३. लिव इन रिलेशनशिप ला मान्यता दिल्याबद्दल (कृष्ण आणि राधेचा दाखला का द्यावा ते मात्र कळाले नाही)