आल्मंड बटर
आल्मंड बटर
आजकाल पीनट अॅलर्जी मुळे इथे बर्याच शाळा 'पीनट फ्री' असतात. माझ्या लेकाची शाळाही याला अपवाद नाही. त्यामुळे साहाजिकच पीनट बटर ऐवजी आल्मंड बटर वापरायला सुरुवात केली. पण हे आल्मंड बटर एक तर गावातल्या दुकानात मिळत नाही आणि दर वेळी ५० मैलावरच्या दुकानात तेवढ्यासाठी जायची माझी तयारी नव्हती, तेव्हा घरी प्रयोग केला. दोनदा ट्रायल अॅन्ड एरर केल्यावर लेकाला आवडेल असे आल्मंड बटर जमले.
साहित्य
१/२ कप बदाम
चिमुटभर मीठ
१ टी स्पून वेजिटेबल किंवा कॅनोला तेल
कृती
ओवन २५० F ला तापत ठेवा. ओवन तापला की ट्रे मधे बदाम ठेऊन ओवन मधे २०-२५ मिनिटे भाजुन घ्या.भाजताना शेवटच्या ५ मिनिटात लक्ष ठेवा.
मिसळपाव