Skip to main content

'आई'[एस.एम.एस.]

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 01/04/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मी रचलेली नाही पण मला ह्या कवितेचा कवी पण माहीत नाही.... ही कविता मला सरळ मोबाईल संदेश[एस.एम.एस.] द्वारे आलेली आहे पण खुप आवडली म्हणुन मिपा रसिकांसाठी देण्याचा मोह आवरला गेला नाही ...... आवड्ली तर अवश्य प्रतिक्रिया द्या.... "आई आहे मंदिराचा उंच कळस... अंगणातील पवित्र तुळस... भजनात गुणगुणावी अशी संतवाणी... वाळवंटात प्यावं असं थंडपाणी.... आई म्हण़जे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी... आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..."

एकदा, `रान' पेटलं...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 01/04/2010 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक कवी, म्हणाला, मलापण `पद्मश्री' हवी... आणि `रान' उठलं. वयोमानामुळे भान सुटलं, म्हणालं. तू `जनस्थान' मिळव, नाही तर `ज्ञानपीठ' मिळव. तुझा राजकारणाशी संबंध काय? `मातोश्री'चा शेजारी, एवढाच ना तुझा पत्ता? पावसाच्या नावानं धो-धो कविता पाडल्यास, म्हणून `रानाशी नातं' नाही जुळत... त्यासाठी, रानकळा सोसाव्या लागतात. रानातल्या एअर कंडिशन्ड घरात, हुरड्याची कणसं चाखवत, `जाणत्या राजा'ला रानाचं कवतिक ऐकवावं लागतं... राजकारणाचं बोट धरून रानातल्या कविता कॊंक्रीटच्या जंगलात दिमाखात फिरू लागल्या, की पद्मश्री मागून चालत येते... तुझ्या इमारतीच्या टीचभर अंगणात, आहे असं, माझ्यासारखं रान?

कवितेचा मार ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 01/04/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा मार ! ! ! जेष्ठ कवींचे संमेलन, भरले श्रोत्यांनी प्रांगण. कवींना चढे अगणित स्फुरण, श्रोत्यांची स्थिती दारूण. झडती कवितेच्या अगणित फैरी, ए के – 47 च्या माऱ्या परी. श्रोते जाहले सैरावैरा, धडकी भरे त्यांच्या उरी. आधीच समस्त श्रोते वेठीला, त्यात एक कवी अवतरला. छेडीला भीमपलास कवितेचा, उतावीळ श्रोते भैरवीला. . जाहले तास दोन तास, तरीही ना सरे त्याचा अट्टाहास. वदे एक श्रोता शेजारी स्त्रीस “ काही उपाय सुचवा हो “ ! वदली ती गौरांगना सत्वर, “ तुम्हीच काही सुचवा गुरुवर, सहते वीस वर्षे हा कवितेचा मार उपाय परी ना गवसला आजवर.
काव्यरस

नाचरी गाय - २ (आधारित)

लेखक चित्रा यांनी गुरुवार, 01/04/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची कविता आणि पूर्वपीठिका/संदर्भ इथे http://www.misalpav.com/node/11707 (पामेला ट्रॅव्हर्सच्या मेरी पॉपिन्समधील एका कथेवर आधारित) हा भाग जरा लांबला, पण मूळ कथेतील वर्णनाचा विस्तार पाहता हे ठीक वाटले. माझ्या संगणकावर घातलेले तक्ते दिसत नाहीत, म्हणून वाचायला अजून सोपी करता आली नाही. (असेच गेले दिवस बहु अन अशाच गेल्या रात्री अनेक थांबेना फडफडते शेपूट आणि नाचरे पाऊल एक) ..(येथून पुढे सुरू ....
काव्यरस

सलाम मुंबईकर

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 01/04/2010 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वींची घटना आहे. मी सकाळी कामावर येण्यासाठी "बेस्ट"च्या स्टॉपवर आलो. सकाळी ७-७.३० ची वेळ असेल. बसचे सुटायचे ठिकाण असूनही बस बर्‍यापैकी भरलेली. मला मागील जागा बसायला मिळाली. "बेस्ट"मध्ये डाव्या बाजूला तीन सीट महिला, ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी राखीव असतात. त्यापैकी अपंगांसाठीच्या सीट रिकाम्या होत्या. एक आजी, आजोबा बसमध्ये चढतात. ते त्या अपंगांसाठीच्या रिकाम्या जागेकडे जाऊ लागतात. आजोबा त्या जागी बसणार तोच आजी: "आहो, त्या जागा अपंगांसाठी आहेत. आपण उभे राहू." आजोबा: "अग कोणी आले तर आपण उठूयात.

रानातली वाट - The Way Through the Woods

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 01/04/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर बऱ्याच अनुवादित कविता दिसल्या म्हणून ही रुपांतरीत कविता व त्यासंदर्भात मी लिहिलेला छोटासा लेख इथे टाकत आहे.
काव्यरस

घाट चढा आता

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/04/2010 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आपली हिरो अन हिरवीन प्रवासाला निघालेय. त्यांची गाडी जोरात जावू द्यायची की हळूहळू ते आपणच ठरवूया. सादर आहे "घाट चढा आता" लावणीच्या दोन आवृत्या एकाच वेळी, एकाच धाग्यात... (ढॅण.. ढॅण्...ढॅणाण...) (राजेश घासकडवींचे अन Nile यांचे खास आभार.
काव्यरस