अपव्यय
काही वर्षांपूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राने खार्या पाण्याचे रूपांतर गोड्या पाण्यात करण्याचे रिव्हर्स ऑसमॉसिस तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे वाचले होते. त्यावेळी देशी तंत्रज्ञांनी यश मिळवल्याचा अभिमान वाटला होता. पुढच्या काळातील पेय जलाच्या टंचाईवर उत्तम उपाय असे जाणवले होते. नंतर त्यांनी हे तंत्रज्ञान अल्प किंमतीत खुले करून दिल्याचेही वाचले होते.
या तंत्रात एका सूक्ष्म छिद्रे असलेल्या पडद्यातून (Membrane) खारे पाणी पास केले जाते पाण्यातील क्षार त्या पडद्यातच राहतात आणि गोडे पाणी पलिकडे जाते. नंतर त्या पडद्यात अडकलेले क्षार 'धुवावे' लागतात.
मिसळपाव