Skip to main content

चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 15/04/2010 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
नाडीवर बरेच दिवसात काही वाचायला मिळालेले नाही... ओक साहेबांस विनंती की त्यांनी लवकरात लवकर किमान पाच-सात नाडीवाचनाचे वेळी पट्टी हुडकताना होणार्‍या संभाषणाचे पूर्ण रेकॉर्डिंग करून मिपा वर टाकावे. (मागे अरुंधती ताईंनी लिहिलेच होते की....... मला वाटते की ओकांनी onus to prove the authenticity of Nadi Bhavishya दुसर्‍यावर ढकलून देऊ नये.

श्रीनिवास रामचंद्र सिरास

लेखक रोचनाकोन्हेरी यांनी गुरुवार, 15/04/2010 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटीच्या प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरास यांचा नुक्ताच "संशयास्पद" मृत्यू झाला. त्यांना अलीकडेच विद्यापीठातील त्यांच्या पदावरून समलैंगिक संबंध ठेवल्याकारणाने निलंबित करण्यात अाले होते. प्रा. सिरास हे मराठी साहित्याचे अभ्यासक व शिक्षक होते. कुठल्यातरी बातमीपत्रात कवि ग्रेस यांनी त्यांची प्रशंसा केल्याचे वाचले. ते कविताही करत असत, व त्यांच्या कवितासंग्रहाला पारितोषिकही मिळाले होते असे ऐकले. त्यांच्या कविता किंवा अन्य लेख कोणी वाचलेय? त्याबद्दल काही अभिप्राय? मराठी साहित्यजगाकडून या घटनेला काय प्रतिसाद मिळाला अाहे?

मला आवडलेले काही (कमी किंवा अ प्रसिद्ध) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 15/04/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

दीन दयालु रामा : येशुदास व गायत्री

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 14/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामाच्या नावासरशी त्याच्याविषयीची अनेक गाणी, अनेक कथा, त्याची अनेक रूपे नजरेसमोर येतात. प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचे निमित्त करून अनेक चित्रपटकारांनी आपल्या चित्रपटाच्या कथानकात अप्रत्यक्षपणे रामाचा आदर्श ठेवून, किंवा त्याला पूजनीय मानून त्याप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करणारे नायक दाखवले. त्या प्रभू रामचंद्राच्या स्तुतीचं, कौटुंबिक सौहार्दाचं, केरळच्या नयनरम्य हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवणारं हे अजून एक गाणं..... येशूदास व गायत्री अशोकन् यांनी गायलेलं....रवींद्रन् यांनी स्वरबध्द केलेलं.... मामुट्टी ह्या समर्थ अभिनेत्यावर चित्रित केलेलं......

'महाराष्ट्र टाइम्स्' व 'मुंबई सकाळ' वर्तमानपत्रांच्या संपादकांची नावे, ई-मेल पत्ते व दूरध्वनी क्रमांक हवे आहेत

लेखक दिपोटी यांनी बुधवार, 14/04/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मला 'महाराष्ट्र टाइम्स्' व 'मुंबई सकाळ' या मुंबईच्या दोन वर्तमानपत्रांच्या संपादकांची / उपसंपादकांची नावे आणि ई-मेल पत्ते (व जमल्यास दूरध्वनी क्रमांक) हवे आहेत - त्यांच्याशी थोडा पत्रव्यवहार करायचा आहे. मिळू शकतील का ? - दिपोटी

अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 14/04/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
कालच अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव या शांतिलाल सुरतवाला यांच्य पुस्तकाच्य प्रकाशनाला गेलो होतो. जाताना पक्क ठरवल होत की पुस्तक अजिबात विकत घ्यायच नाही. साली दरवेळी खिशाला चाट बसते अन घरी कचरा वाढतो.

वळखा पाहू

लेखक बाबुराव यांनी बुधवार, 14/04/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावगाडा म्हणल्यावर गाणी, म्हणी, उखाणी, त्या इषयाला काय कमी नाय. आन उखाणा कोड्यासारखा असला तर लय मजा. आज काही कोड्यासारखी उखाणी घालतो . तुम्हाला ठाव असल तर तुम्हीबी उखाणे टाका. पर उखाण्यामधी कोडं असलं पाह्यजेन. उखाण्याचं उत्तर धाग्यामधीच द्यायचं. ज्याच उत्तर बरुबर राहीन. त्याच्या खरडवहीत 'शाब्बास' असे लिव्हल्या जाईन याची गावकर्‍यांनी नोंद घ्यावी. :) १) रंग नाही रुप नाही आभाळ म्हणशील काय ? आदी नाही अंत नाही देव म्हणशील काय ? भूत नाही, देव नाही, विचार करतोय काय ? सांग मला काय ते, नाही तर येथून जाय.

Ubuntu मदत new problem update!!

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 14/04/2010 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही. Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का? मोजकाच वेळ असल्याने जास्त वेळ नाही देउ शकत पण प्रतिक्रीया वाचुन लिहावस वाटल आवशीचो घोव् व रवी ह्यांचे विशेष आभार.....व ईतराचेंही प्रतिक्रिया

लावणी: मोबाईल चार्ज करा तुमचा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/04/2010 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल चार्ज करा तुमचा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा काय काम करायचं तुमाला तर मग नुसता मिस कॉल का हो देता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||धृ||
कोरस: हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा ओ आम्दार उगा मिशीवर मारू नगा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा
कालच्याच दिशी आली वाड्यावर इस्कोट झाला तुमी असल्यावर पैकं द्या म्हनलं तर निसतं एटीएम कार्ड काय दावता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||१||
काव्यरस