Skip to main content

चांदण्याचे ओठ तुझे

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 15/04/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्याचे ओठ तुझे चंद्रमा चेहर्‍यातला रात्र काळे केश अवघे नेत्रात दर्या उफाळला शब्द सुमधुर दिव्य झंकार श्वासांत सुगंधही दाटला वारुणी नेत्रात तुझिया रात्रवणवा पेटला पदन्यासाने तुझिया राजहंसी थिरकला भृकुटीविभ्रमाने तव मन्मनही घायाळला यौवनाची नवनव्हाळी मोगराच अंगी फुलविला गुल्मोहरी वेणुतला निषाद कुणी आज झंकारिला? [फार वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना ''झालेली'' कविता! :) ] -- अरुंधती
काव्यरस

डिरेग्युलरायझेशन ऑफ फ्युएल प्राईजेस इन इंडिया

लेखक अप्पा जोगळेकर यांनी गुरुवार, 15/04/2010 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिखाण मंडळींना आवडेल असे वाटते. म्हणून देत आहे. लेखकाची परवानगी घेतली आहे आणि मगच टाकत आहे. डिरेग्युलरायझेशन ऑफ फ्युएल प्राईजेस इन इंडिया लेखक - प्रसन्न वैद्य, डोंबिवली

लिनक्स उबंटू (ubantu) मिळावा मोफत..

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 15/04/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
https://shipit.ubuntu.com/ ह्या साईट वर आपले नाव, पत्ता आदी details द्यावेत, सुमारे १० आठवड्यांत आपण निवडलेल्या पर्यायानुसार सीडी घरपोच होते. (आपल्या सर्वांच्या माहिती साठी सविनय सादर)

लघुपट महोत्सव

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 15/04/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
लघुपट महोत्सव पुण्यात फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टीट्युट ऒफ इंडिया तथा एफ टी आय आय ही एक नावाजलेली संस्था आहे. तिथे १० व ११ एप्रिल २०१० ला मानवी विकास या विषयावरील विविध प्रादेशिक लघुपट दाखवण्यात आले.निमित्त होते ते संस्थेच्या गोल्डन ज्युबिली वर्षाचे. दोन दिवसात त्यांनी २६ लघुपट दाखवले. हे लघुपट संस्थेच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. या महोत्सवाच्या उपक्रमाचे समन्वयक होते मिलिंद दामले. अशा ठिकाणी मराठी नाव असल कि जरा बरच वाटत.लघुपटातुन मानवी विकासाच्या टप्प्यातील वेगवे्ळ्या सामाजिक समस्या व त्याची हाताळणी दाखवलेली गेली.

प्रवास (न) अन्ताचा ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 15/04/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास ( न) अन्ताचा ! ! ! “काम नाही “ “ जगह नही “ “ माफ करा ” “नो व्हेकन्सी “ तरीही सुरु असतो जीवघेणा प्रवास, त्याच्या प्रयत्नांचा, आशा-आकांक्षांचा ! ! पैशांची चाकं लावून, अर्जा-अर्जाला, टेबलापासून –टेबलांपर्यंत ! अधिकाऱ्यांपासून-मंत्र्यापर्यंत ! "स्टेशन नोकरीचं" मात्र नाहीच येत शेवट पर्यंत ! ! “ लग्नाचं वय सरलं ताईच, “ “आजारपण बाबांचं,” “शस्त्रक्रिया आईची,” “ सगळा खेळ पैशांचा ” फक्त असहाय्यता, अन अगतिकता ! ! ! सहजच गवसतं असलं सावज.

सावल्या

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/04/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा हात सोडून पुढे जाताना, एक क्षणभरच.. त्या वळणावर रेंगाळले.. आणि मग आठवल्या..., त्या सावल्या ...! तुझ्या असण्याच्या... तुझ्या असण्यात माझ्या... हलकेच विरघळण्याच्या...! वेड्या सावल्या... माझ्याभोवती फेर धरून नाचणार्‍या... नाचता नाचता अलगद.. तुलाही खुणावणार्‍या... मग तुझ्याशी खेळता खेळता... मलाच विसरणार्‍या... या अशा का गं? आपल्या आपल्या म्हणताना.., क्षणात परक्या होणार्‍या... मी विचारलं... माझ्या सावलीला..., तर मलाच विचारते..., ......, ......, प्रेम खरंच वेडं असतं का गं? विशाल

पहिला पगार

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 15/04/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पगार घेताना तुम्हाला कसे वाटले?.. नेमक्या काय भावना होत्या तुमच्या? त्या पगाराचे तुम्हि काय केले..... कसा खर्च केला? कोणाला भेट वस्तु आणल्या?. मी पण २१ चा असताना मेक इंजीनीअर झालो व नोकरीला लागलो साल १९६७ पगार..रु १५०=०० प्रति महिना.... मी इ.एस.आय कापुन हातात मिळालेला १३७=०० रु पगार माउलिच्या हातात दिला... तिला खुप भरुन आले.

सवय झाली आहे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/04/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
सवय झाली आहे (फर्मास इडंबन आलं पाहीजे याच्यावालं बरं का मंडली!) कार्यालयात युपीएससी तून नवीन भरती झाली आहे. नवा साहेब तरणा आहे. पिकले केस अन अनूभव नाही दिसत त्याला. त्याची सवय झाली आता. सोसायटीच्या जिन्यात देवांच्या टाईल्स लावल्या आहेत. तरीही पान, तंबाखुच्या पिंका कोपर्‍यात पडतातच आहेत. मला त्याची सवय झाली आहे. काय सांगावं, पिंका टाकणार्‍यानाही त्याची आता सवय झाली आहे. शाळेत आताशा शिकवत नाही. म्हणून मुलाला ट्यूशन लावली. आमच्या वेळी नव्हत असं काही. असं एकायची सवय झाली. दररोज जाहिराती पहायच्या नोकरी अर्ज नेहमी करायचा मुलाखतीत उत्तरे द्यायची अन 'नंतर कळवू' चा नकार घ्यायचा सव
काव्यरस

श्री दशभुज लक्ष्मीगणेश - हेदवी

लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 15/04/2010 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ली यांनी काढलेली हेदवी आणि परिसराचे अतिशय सुंदर प्रकाशचित्रे आपण पाहिलीत. त्याच हेदवी गावातील श्री दशभुज लक्ष्मीगणेशाची हि कथा आणि परिसराची भटकंती.
महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे.