Skip to main content

कान्हा रे कान्हा असे काय करी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/04/2010 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा रे कान्हा असे काय करी (चाल १): दही विकाया गोपी निघाल्या मथूरेच्या बाजारी वाट अडवून कान्हा बसला म्हणे दही कर द्यावा करी प्रिती पाहूनी कान्हाची आपल्यावरी गोपीका त्या वरवर रागावती लटका लटका नकार देती परी मनी सुखावती वाट अडवूनी कान्हा त्यांची छेड काढी कारण करूनी कान्हा मडके फोडी कान्हा मडके फोडी (चाल बदलून): कान्हा रे कान्हा असे काय करी दुधा दह्याचे मडके असे का फोडी फोडीलेस तर सोडीव मज ती गोडी ||धृ|| विरहाची सवय होत असतांना मला तुझ्याकडे पुन्हा का ओढी? ओढीत असता वस्त्रे न माझे फेडी ||२|| कान्हा रे कान्हा असे काय करी दुधा दह्याचे मडके असे का फोडी ||धृ||
काव्यरस

पालक पुरी

लेखक मीली यांनी शनिवार, 17/04/2010 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस :- गव्हाचे पीठ ६ वाट्या चण्याच्या डाळी चे पीठ १ वाटी तिखट, मिठ, हळद, ओवा चवीप्रमाणे लसुण पेस्ट १ चमचा मिर्ची कोथिंबीर पेस्ट २ चमचे धने, जिरे पुड १/२ चमचा प्रत्येकी १ पालक जुडी ,मळताना लागेल इतके पाणी मार्गदर्शन :- सर्वात प्रथम गव्हाचे पीठ व चण्याचे पीठ एकत्र करावे.

कृपया मार्गदर्शन करावे

लेखक babadi manjar यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिके सारख्या थंड देशात कडधान्य ला मोड कशी आणायची हे कोणी सुचवू शकेल का ? बरेच उपाय करून बघितले यश आले नाही .

घोराडेश्वर

लेखक झकासराव यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसानी इकडे चक्कर मारु मारु म्हणत रहातच होत. एका रविवारी जमवलच आणि निघालो. घरुन उरकुन जायल १० वाजुन गेले होतेच. उन्हाचा तडाखा भारीच जाणवत होता. निगडीतुन हे ठिकाण एकदम जवळ आहे. देहुरोड क्रॉस केला की सोमाटणे फाट्याच्या अलिकडेच घोराडेश्वराचा डोंगर आहे. पावसाळ्यात मस्त हिरवेगार डोंगर बघुन मजा वाटत असते पण आता ओकेबोके डोंगर. 1 तिकडे गेलो. दुचाकी सावली बघुन लावली. (हो नायतर नंतर पोळुन कोण घेणार?? ;) ) पायर्‍या बसवल्या आहेत आता. पण दुतर्फा झाडी नाहिये.

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........भागः२

लेखक भानस यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
कथेचा पहिला भाग येथे वाचता येईल त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........ पुढे........ या चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा पावडरचा हात फिरवून फ्रेश होऊन शमाने पाचला ऑफिस सोडले. चांगला दीड तास आहे अजून..... सहज पोचून जाऊ आपण. अभी तसा शहाणा आहे. नेहमी वेळेवरच येतो. असे बसस्टॉपवर एकट्या मुलीने वाट पाहत उभे राहणे म्हणजे किती दिव्य आहे.........

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........ भागः१

लेखक भानस यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बस दादरला पोहोचली तसे नेहमीप्रमाणे शमेचे लक्ष खोदादाद सर्कलकडे गेले. ओव्हरब्रीज, प्रचंड वाढलेला...... आवरेनासा झालेला ट्रॅफिक अन त्यात केविलवाणे झालेले, आहे का नाही असा प्रश्नच पडावा असे भासणारे खोदादाद सर्कल. एके काळी काय शान होती, किती मोठे वाटायचे सर्कल आणि आंबेडकर रोड क्रॉस करायचा म्हणजे भीतीच वाटायची. अगदी शाळेपासून मग कॉलेज - पुढे नोकरी..... आणि आपल्या गोड आठवणीही याच्या आसपासच गुंतलेल्या........ पाहता पाहता बसने किंग्जसर्कल गाठले अन त्या चिरपरीचीत फालुदाची तीव्रतेने आठवण आली. न चुकता प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपली की बाबा सगळ्यांना नको नको होईल इतका फालुदा खाऊ घालत.

नॉनसेन्स!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 16/04/2010 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती? आता सहज आठवणार्‍या गायिका: नूरजहान, गीतादत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुरैय्या, जगजीत कौर, सुमन कल्याणपूरकर ....आणखी कोण कोण होत्या? मुबारक बेगम: बेमुरव्वत बेवफा..... गीतादत्त : ये कौन आया के मेरे दिल की दुनियामे बहार आयी... सुरैय्या: ये कैसी अजब दासता हो गयी है..... जगजीत कौर: तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो....

कॅरी ऑन .. सिरीज मधले चित्रपट कुठे मिळ्तील.?

लेखक सागरलहरी यांनी शुक्रवार, 16/04/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
कॅरी ऑन स्पाइंग... इ. कॅरी ऑन नावाने सुरु होणारे एकाच नट संचातले ब्रिटिश (बहुधा) चित्रपट पूर्वी स्टार मूव्हीज वर लागत.. त्यांच्या सीडी किंवा डाउन लोड्स कुठे मिळ्तील ?

बेस्ट ऑफ बेस्ट गाणी

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 16/04/2010 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अंताक्षर्‍या (मिक्स/मराठी), शिणेमे (आवडते/नावडते) यांना उत आलाय. पब्लीक उत्साहाने भाग घेउन भरगोस प्रतिसाद बी द्येतय.. म्हनल आपुन बी हात धुन घावा ;) इथे तुम्हाला आवडणारी मराठी/हिंदि गाणी नमुद करा. पण लेको तुम्हाला खालच्या वर्गवारीतल सर्वात जास्त आवडणार एकच गाण द्यायचय बर. (इतक्या आवडणार्‍या गाण्यातुन एकच निवडाच म्हणजे कठीण आहे. पण करा प्रयत्न) या माहितीचा मला माझ्या संकलना साठी उपयोग होइलच इतर गरजुं नाही होईल. गाणी: युगुल गीत : प्रेम गीत : विरह गीत / सॅड साँग: गायकाच्या आवाजातल : गायीकेच्या आवाजातल : माझी चॉईस : युगुल गीत : तुझ्या गळा माझ्या गळा..