Skip to main content

मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 16/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती? आता सहज आठवणार्‍या गायिका: नूरजहान, गीतादत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुरैय्या, जगजीत कौर, सुमन कल्याणपूरकर ....आणखी कोण कोण होत्या? मुबारक बेगम: बेमुरव्वत बेवफा..... गीतादत्त : ये कौन आया के मेरे दिल की दुनियामे बहार आयी... सुरैय्या: ये कैसी अजब दासता हो गयी है..... जगजीत कौर: तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो....

वाचने 14335
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

(१) केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर - सुमन कल्याणपूर (२) आज जाने की जिद ना करो - फरीदा खानुम (३) कैसे बेशर्म आशि॑क है ये आजके - बांग्लादेशी गायिका (४) लंबी जुदाई - रेश्मा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

In reply to by शुचि

"आज जाने कि जिद ना करो"पहायला मिळेल काय?

अ‍ॅखियोंके झरोकोंसे मैने देखा जो सावरे हे हेमलाता यांच गाण सर्रास लता आज्जीच्या नावावर खपवल जात..

In reply to by चतुरंग

गाणं लै भारी...रविंद्र जैनही. (असो. आम्ही लता आणि हेमलता यांच्यातला फरक स्पष्ट करायला या गाण्याचं उदाहरण देतो.) नितिन थत्ते

उमादेवी (नंतरची टुणटूण) हीचे "अफसाना लिख रही हू दिले बेकरार का" हे एक सुंदर गाणे आहे. गीता दत्त (आणि मुकेश) चे "खयालो मे किसिके" रुना लैला चे, "तुम्हे होना हो, मुझको तो" आणि "दमा दम मस्त कलंदर" नाझिया हसनचे "लैला मै लैला" (मधे "ओ लैला" आरडीचे :-) ) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

नाझिया हसनचे "लैला मै लैला" (मधे "ओ लैला" आरडीचे )
यात दोन चुका आहेत असे वाटते. माझ्या समजुतीप्रमाणे एक म्हणजे गाणे म्हटले आहे कंचनने (व अमितकुमार - किशोरचा हो) दुसरे - "ओ लैला" हे म्हटले आहे अमितकुमारने. नाझिया हसनचे एकच गाणे आहे. आर डी व कुर्बानीचा काहीच संबंध नाही. संगीत कल्याणजी-आनंदजी चे आहे ते एक गाणे सोडून आणी त्या गाण्याचे संगीत बिड्डू चे.

In reply to by दिगम्भा

बिन्गो. नितिन थत्ते

In reply to by दिगम्भा

मी आत्ताच आपला प्रतिसाद बघितला आणि नंतर जालावर पण पाहीले. माहीतीत योग्य दुरूस्ती सुचवल्याबद्दल धन्यवाद! त्या केस मधे मग अजून एक वेगळी गायिका आणि अविस्मरणीय गाणे.. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

बोल रे पपीहरा.... -वाणी जयराम माझं एक अत्यंत आवडतं गाणं!

माणिक वर्मांची सगळीच गाणी सुरेल म्हणता येतील. काही आठवणारी: कौसल्येचा राम बाई (भक्ती) पहाट झाली उद्यानातून मंदिरी ये गारवा (प्रियकराचा विरह) घननीळा लडीवाळा (प्रेम) लाविते मी नीरांजन (आईचा विरह) माळ पदक विठ्ठल (भक्ती) सुमन कल्याणपूरांचे "केशवा माधवा" पण खूप प्रसिद्ध झाले मात्र लोकल मधून प्रवास करणार्‍यांना ते वेगळ्याच कारणाने लक्षात राहीले असे वाटते... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हिची पी...पी...पी संपणार केंव्हा आणि दुसर्‍यांची गाणी वाजणार केंव्हा........
अज्ञानात सुख असतं हेच खरं! (कट्टर दीदीभक्त) तात्या.

"देखो जी देखो देख रहा था पपीहा" या गाण्याची तु-नळी ची लिंक आहे का कुणाकडे? मला मिळत नाहीये. मला वाटतं सुमन कल्याणपूरचं आहे हे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

१. कभी तनहाईयों में यूं -- मुबारक बेगम २. गीता दत्तची अनेक - खासकरून 'वक्त ने किया क्या हंसी सितम' ३. 'आर पार' मधली शमशाद बेगमची गाणी

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

छान गाणी सुचवलीत. आर-पार आठवला की मला Mr & Mrs 55 सुद्धा आठवतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

सुधा मल्होत्रा सलाम-ए-हसरत कबूल कर लो http://www.youtube.com/watch?v=AroYTP4xW9Y जगजीत कौर तुम अपना रंज-ओ-गम http://www.youtube.com/watch?v=xlxYifOdZjU राजकुमारी सुन बैरी बलम सच बोल.. http://www.youtube.com/watch?v=PeeC3aeg5Ic ---मंगेशकर भगिनीबद्दल यत्किंचितही अनादर नसणारा

हमे तुमसे प्यार कितना (चित्रपटः कुदरत) : परवीन सुलताना जिथे दीदी/आशाताई संपतात तिथे सुरू होतं हे गाणं. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

एकदम मस्त गाणे आठवले. खूप आवडते गाणे आहे (ऐकायलाच ;) ) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हेमंत कुमारबरोबर म्हटलेले एक जुने गाणे आ गुप चुप गुप चुप http://www.youtube.com/watch?v=BaHDIEDrjTQ ललिता देऊळकर (सौ. सुधीर फडके चू.भू.द्या.घ्या) http://www.youtube.com/watch?v=aWqjDTu0n6U जोहराबाई अंबालेवाली अखियां मिला के जिया भरमा के .. http://www.youtube.com/watch?v=vU-gLlZ6iqI १९४४ सालचे गाणे अजूनही ऐकावेसे वाटते. त्याचे एक बीभत्स रिमिक्सही बनले आहे. काळाचा महिमा दुसरे काय!

माझ्या माहितीनुसार या जोडीचे एकमेव गाणे मिलते ही आंखे दिल हुआ दिवाना किसीका . गाव दणाणून सोडणारा शमशाद बेगमचा आवाज आणि मलईदार श्रीखंडासारखा तलतचा आवाज यांचे काँबिनेशन करण्याची कल्पना ज्यांच्या डोक्यात आली त्या नौशादसाहेबांना सलाम. या गाण्यात तलत शमशादला गाणं शिकवतो आहे की शमशाद तलतला, हा प्रश्न पडतो. 'बाबुल' नंतर तलतला नौशादसाहेबांनी फारसा वापरला नाही, कारण 'बाबुल' च्या रेकॉर्डिंगदरम्यान तलतला सिगारेट ओढताना त्यांनी पाहिलं, अशी एक दुर्दैवी आठवण या गाण्याच्या संदर्भात आहे. लेके पहला पहला प्यार हे तर अजरामरच गाणे आहे. त्यातला शमशाद बेगमचा आवाज 'कलेजेपे मीठी छुरी चलानेवाला' वगैरे वाटतो. समोर रफीसाहेब आहेत म्हणून बरे, अन्यथा धडगत नव्हती. या गाण्याच्या सुरवातीच्या हार्मोनियमच्या पीसची 'कॉलर ट्यून' कुणी करुन देईल का? अशी बरीच गाणी आहेत. वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

In reply to by सन्जोप राव

दोन्ही गाणी एकदम आवडती! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by सन्जोप राव

>> गाव दणाणून सोडणारा शमशाद बेगमचा आवाज आणि मलईदार श्रीखंडासारखा तलतचा आवाज >> क्या बात है!! गाणी आहेतच छान पण आपण केलेलं आवाजाचं रसग्रहण ...... किती सुंदर आहे. आम्ही इथे नुसती गाण्यांची भरताड लावत चाललोय पण ते मनाला कसं भावलं, काळजावर मीठी छुरी वगैरे चालली हे एक आपणच लिहू जाणोत सन्जोप राव. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

व्वा...छानच चालला आहे हा धागा.... मुबारक, शमशाद, गीतादत्त यांची आणखी गाणी काढा ना आठवणींच्या खजीन्यातून..... आणखी एक शारदा होती बघा, शंकर जयकिशनची गाणी आहेत काही.. आठवतात का कुणाला?

छाया गांगुली: आपकी याद आती रही रात भर... (संगीतः जयदेव / गीतः शहरयार) पुर्वार्धात अतिशय थोडके पण समर्पक संगीत....गाण्याच्या उत्तरार्धात हळुवार धरलेला ठेक, लुब्ध करणारे शब्द आणी छाया गांगुलीचा ठुमरीवजा आवाज...एक अविस्मरणीय गाणं... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

हिकडं ही दीदी......हिची पी...पी...पी संपणार केंव्हा आणि दुसर्‍यांची गाणी वाजणार केंव्हा.... आपला इतर गायिकांची गाणी आठवण्याचा उपक्रम स्तुत्य आहे पण जाताजाता लताबाईंवर हा शेरा खटकला. हे देवा, आमच्यावर तू खरंच फार कृपा केलीस लतादिदींची गाणी समजण्याची शक्ती दिलीस म्हणून!!! नूरजहान, शमशाद बेगम आणि अशा अनेक बगैर मंगेशकर गायिका माझ्या आवडीच्या आहेत, प्रत्येकाच्या आवाजाची मजा औरच! पण म्हणून लताला नांवे ठेवणे म्हणजे ...... जाऊ दे . em>हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

सहमत आहे. एकाची प्रसंशा म्हणजे दुसर्‍याची निंदा अथवा हेटाळणी हे समीकरण बदलायला हवे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by पांथस्थ

@पांथस्थ तुमचे फ्लिकर वरील फोटो बघण्यास सुरुवात केली अहे, फारच सुंदर आहेत.... रानातला प्रकाशही वाचूच.

.......पूर्वी फक्त पानपट्टीच्या दुकानांवरच वाजणारी गाणी ऐकायला मिळायची, घरात रेडियो नसायचे, तेंव्हाचे आमचे ते बालपणीचे स्वगत होते...... आम्हीही लताबाईंच्या अनेकानेक गाण्यांचे दीवाणे आहोतच..... ....एवढे मनावर नका घेउ हो.......

In reply to by चित्रगुप्त

....एवढे मनावर नका घेउ हो.......
नाहि घेत मनावर. दिले खाली ठेवुन. हाय काय आन नाय काय? तुमचे स्वगत बाजुला ठेवुयात. पण असे अनेक जण भेटले आहेत ज्यांच्या मनात लताबद्दल आकस आहे. कारण काय तर लताने इतर गायिकांना पुढे येउ दिले नाहि. हे मला काहि कळत नाहि बुवा. असो, हा (चाहत्यांसाठि) जरा भावनिक विषय आहे. नाहि तर ह्यावर एखादा धागा सुरु व्हायचा. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by चित्रगुप्त

बालपणीचा पोरकट जोक अजून, आता उतार लागल्यावरही तितल्याच आवेशाने सांगताय, तेव्हा उतार 'मस्त मस्त' नसावा असं दिसतंय!! त्या मूर्ख उल्लेखाला टाळून पुढे जाणे मलातरी शक्य नाही. आपल्याला आशा सर्वश्रेष्ठ गायिका वाटते, ह्याविषयी माझे काहीच म्हणणे नाही, कारण ही आपली आवड आहे. आणि ती व्यक्त करण्याचा आपला अधिकार आहे. ज्याप्रमाणे लता ही सर्वश्रेष्ठ गायिका आहे हे माझे मत आहे. अजून कुणाचे तरी शारदा/ कॄष्णा कल्ले/ जोहराबाई/मधुबाला चावला...... इ. पैकी कुणीही सर्वश्रेष्ठ गायिका आहे, असे मत असले व ते त्या व्यक्तिने येथे व्यक्त केले तर काहीही बिघडत नाही. कारण ही वैयक्तिक मते स्वतःच्या आवडीनिवडीवर आधारित असतात, त्यात बरोबर/ चूक काही असू शकत नाही. परंतु कुणालाही एखादी गायिका सर्वश्रेष्ठ आहे, असे स्वतःचे मत मांडतांना दुसरी कुणीतरी भिकार कशी आहे, हे का सांगावे लागावे हे कळत नाही. त्यातून त्या आवडत्या/ नावडत्या गायिकांच्या शैली/आवाच्या प्रति अगदी भिन्न असतील (जसे लता x शमशाद, लता x नूरजहाँ, लता x गीता दत्त...) तर ते थोडे समजूही शकते. लता व आशा ह्यांच्या बाबतीत इतके टोकाचे मत असावे हे अगम्य आहे!! खरे तर धाग्याची संकल्पना छान आहे. लता, आशा वगळून हिंदीत मला इतर दोनच गायिका आवडतात-- गीता दत्त (तिची सर्वच गाणी बहारदार होती, पण अगदी एकच द्यायचे म्हटले तर 'आज सजन मोहे अंग लगा लो') आणी सुधा मल्होत्रा (सलामे हसरत कबूल कर लो/ फिर न कीजिये मेरी गुस्ताख निगाही का गिला..).

शोभा गुर्टू यांच्या श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या गझला..... माझिया प्रियाला प्रीत कळेना अनुराग त्याचा माझा हाय रे जुळेना उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

माझिया प्रियाला प्रीत कळेना
ह्यात लागलेला आवाज कसा मस्त पहाडी आहे - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by नितिन थत्ते

मूळ धागा हिंदी चित्रपट गीतांविषयी होता असे वाटते. पण मराठीचा अंतर्भाव असेल तर सुलोचना चव्हाण व मालती पांडे ह्यांचा मी आदरपूर्वक उल्लेख करीन. (सुलोचनाबाई कदम हिंदीतही कार्यरत होत्या असे ऐकून आहे, पण त्यातील मी काहीही ऐकलेले नाही).

गीता दत्त : १.नन्ही कली सोने चली हवा धीरे आना - सुजाता.... २. वक्त ने किया क्या हसीन सितम.... कागज के फूल.... ३. आज सजन मोहे अंग लगा लो - प्यासा http://www.youtube.com/watch?v=HUeBGQUC8CY अरुंधती http://iravatik.blogspot.com/

एकाची प्रसंशा म्हणजे दुसर्‍याची निंदा अथवा हेटाळणी हे समीकरण बदलायला हवे. सहमत

प्रीती सागर - मारे घर अंगन आना भूलो ना. (मंथन) सलमा आगा - फज़ा भी है जवां जवां. (निकाह) जाता जाता - तात्या बसलेच लिहायला तर आपण सर्वांनी केलेल्या यादीच्या चौपट गाणी दीदीचीच (फक्त हिंदी) एका बैठकीत लिहून काढू शकतील असा विचार आल्यावाचून राहिला नाही... :>

इन्टरनेटप्रेमी यान्च्याशी सहमत .... "अ" किती मोठा हे दाखविण्यासाठी "ब" चे पाय मोडून त्याला लहान करू नये हीच अपेक्षा ! किंबहुना खुद्द "अ" ची देखील अशी इच्छा नसते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

श्री. पवार, सहमतीबद्दल आभारी आहे.

"अफसाना लिख रही हू दिले बेकरार का"- उमा देवी "बाबूजी धीरे चलना"- गीता दत्त ----- सौरभ :)

ज्योतिका रॉय यांची मीरेची भजने निव्वळ अप्रतिम. यू नळीवर उपलब्ध. खरेतर कोणत्या दोन गायिकांच्या आवाजाची तुलना होऊ शकत नाही, आणि ती शक्यतो करूही नये - परीक्षक सोडून अशा मताचा मी आहे. इतर काही अविस्मरणीय आवाज - एम. एस. सुबलक्ष्मी - यांची 'मीरा' सिनेमातील गाणी सौ. किशोरी आमोणकर - जाईन विचारित रानफुला - वगैरे हिराबाई, सरस्वतीबाई यांची काही गाजलेली गाणी, ज्योत्स्ना भोळे यांची कित्येक नादमधुर गाणी परवीन सुलताना यांचे - रसिका तुझ्याच साठी मी एक गीत गाते आणि मग अर्थातच कित्येक लावण्या - सुलोचना चव्हाणांच्या अप्रतिम बुलंद आवाजातल्या. मला कोणी विचारले, या सर्वात अधिक प्रिय कोण? तर मी निरुत्तर होईन - माझ्या साठी, हे सर्वजण - मी त्यांची लायकी ठरवण्याच्या फार फार पल्याड आहेत. माझ्या मनःस्थितीनुसार वेगवेगळ्या वेळी मला वेगवेगळी मंडळी आवडतात. (संगीत प्रेमी ) शशिधर.

यातील विविध प्रतिक्रिया वाचत असतानाच एफ. एम . band वर नुकतेच एक अविस्मरणीय गाणे लागले होते "तुम मुझे भूल भी जावो, तो ये हक़ ही तुमको..... मेरी बात और है, मैने तो मुहब्बत कि है......तुम मुझे !!!" चित्रपट : 'दिदी' ~~ गायिका "सुधा मल्होत्रा" - यांच्यासमवेत स्वर्गीय मुकेश यांचाही आवाज आहे, पण मनात रुंजी घालून जातो तो सुधाताईंचा आवाज ! फारच सुरेख आहे ही रचना ! मला वाटते मूळ "शुक्र तारा मंद वारे...." हे अमर गीत देखील अरुण दाते समवेत सुधाताई यांनीच प्रथम गायिले होते. चू. भू. द्या. घ्या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

गाणी हा एक वेगळा लेखाचा विषय होईल. त्यातही 'कहीं दूर जब दिन ढल जाएं' हे माझं नितांत आवडतं गाणं आहे. मुकेशच्या आवाजाचा इतका परिणामकारक वापर क्वचितच कुणी केला असेल. सलिल चौधरी ह्या देवदूतानं दिलेलं हे संगीत अजरामर म्हणावं असं आहे. एकदा हे गाणं ऐकलं किंवा त्याची आठवण जरी झाली तरी दिवसभर ते पाठ सोडत नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती?
असा धाग्याचा विषय आहे.

राजकुमारीचं "घीर घीर के आस्मां पर छाने लगी घटाएं" फार फार आवडीचं लहानपणापासून. विशेषतः "घीर घीर" शब्दावर जो उमड उमड स्वर बांधलाय तो लाजवाब. "तू अपनी ओढनी मे मन बांध ले पिया का, फिर ना वोह तुम्हे भुलाए ना भूल तुम्हे पाए" http://www.youtube.com/watch?v=naqQzsL_1x4 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

तुमने पुकारा और हम चले आये- सुमन कल्याणपूर आवाज दे कहा है, दुनिया मेरी जवां है - नूरजहाँ. आज जाने की जिद्द ना करो - फरिदा खानम ए दिल मुझे बता दे - गीता दत्त कजरा मोहोब्बत वाला- शमशाद बेगम बोले रे पपीहरा - वाणी जयराम - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

मित्रहो, माझ्याकडे साधारणतः जुनी - १९३८ सालापासूनच्या १९६४ सालापर्यंतची जवळ जवळ सगळी गाणी आहेत. रेकॉर्डींग एवढे चांगले नाही, पण ठीक आहे. एखादे गाणे पाहिजे असल्यास व्यनि करावा. सगळीकडे शोधून झाल्यावर, कारण नाहीतर मग मला फक्त तेच काम करावे लागेल. आशा आहे आपण समजून घ्याल. पण आत्तापर्यंत मला लोकांनी सांगितलेले अशापैकी एकही व्यनि मिळालेला नाही. निलकांत या बाबतीत मदत करु शकतील का ? फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एखादे गाणे शोधायला फार वेळ लागतो. ( संख्या : ९००० ते १००००) समजा काही नाही मिळाली माझ्याकडे तर कृपया टर उडवू नये. तसे होणेही शक्य आहे. सध्या मी "ते माझे घर, ते माझे घर" राग : केदार हे गाणे शोधत आहे. कोणाकडे असल्यास कृपया कळवणे. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com