Skip to main content

स्त्री : रुढी परंपरा ..मनुस्मृती आणि आपली भूमिका !

लेखक इन्द्र्राज पवार यांनी गुरुवार, 22/04/2010 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
".....हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा"..... आपल्यातील काही परंपरांचे काळाच्या ओघात अर्थ आणि औचित्य या दोन्ही अंगांनी नव्याने परिशीलन होणे गरजचे आहे.

मिसळपाव...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 22/04/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत. गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.

कुसुमाग्रजांची कविता, पुनर्भेट

लेखक शेखर जोग यांनी गुरुवार, 22/04/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
'कुसुमाग्रज" एक अद्वितीय, तीव्र संवेदनशील व्यक्तीमत्व. कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची महाराष्ट्राला अस्मितेला नव्याने ओळख करून देण्याचा तसेच त्यांच्या कवितांचा अर्थ शक्य झाल्यास थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा एक खटाटोप. माझे भाग्य इतके चांगले की त्याना अगदी जवळून बघण्याचा सुदैवाने योग आला. अर्थात मी खूप लहान होतो त्यावेळी. त्यांच्या काही स्मृती, आठवणी मला माझ्या आईने (ते माझ्या आईचे मामेभाऊ लागत)सांगितल्या होत्या. त्याही तुमच्या समोर मांडण्याचा विचार आहेच.

तापत जाणारं ऊन!

लेखक राघव यांनी गुरुवार, 22/04/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच नागपूरला जाऊन आलो.आता मूळ गाव म्हटल्यावर एक ओढ असतेच मनाला.. त्यामुळे खरं तर कितीही वेळा तिथे गेलो कि अगदी नवीन वाटतं. एकदम फ्रेश! पण आत्ताचा उन्हाळा म्हणजे तिथे खरंच बाहेर पडू देत नाहीये. ४५ अंशांवर पारा सहज चढतोय. पोचलो तेव्हा सकाळचे ८ वाजले होतेत. पण अगदी ११ वाजलेत का काय असं ऊन तापलेलं. विचार करण्याजोगी गोष्ट आहे - सध्या संपूर्ण विदर्भच तापतोय. अकोला, खामगांव सुद्धा असंच भट्टीत जमा झालंय. अकोल्यात तर म्हणे दिवसाला ८ तास लोडशेडींग अन आठवड्याला १ तास पाणी येतंय अशी परिस्थिती आहे. टॆंकर बोलवायला पैसे आहेत लोकांकडे पण त्या टॆंकरमधे पाणी घालायला पुरेसा साठा नाही.

रसग्रहण - सुपरहिट गाणी !

लेखक टारझन यांनी गुरुवार, 22/04/2010 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स मंडली , सहजरावांबरोबर चर्चा करता करता सुचलेला एक विषय ... आपली बॉलीवुड परंपरा अतिशय महान आहे. मनोरंजणाचा अनलिमिटेड खजाणा आहे. दलाल : मिथुन च्या एका अप्रतिम हिट चित्रपटातलं हे गाणं म्हणजे क्या केहने ? सुनते ही बात बनती है .. "चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..." व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच !

भाषांतरासाठी मदत हवी आहे........

लेखक मितभाषी यांनी गुरुवार, 22/04/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मला खालील क्वालिटी पॉलिसीचे मराठीत भाषांतर हवे आहे. कृपया मदत कराल का? xxxxx Quality, Environment and Safety Policy xxxxxx is the union of community, shareholders.