Skip to main content

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

लेखक Nile यांनी मंगळवार, 04/05/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे!

आभास

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 04/05/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं नातच आभासांचं कधी खूप खूप खोल वाटणारं, थेट जाउन हृदयाला भिडणारं, काळजाला हात घालणारं, पण कधी क्षणात उथळ होणारं, अनोळखी वाटणारं ! मग खरं काय असतं ? ते खूप खोलवर घाव घालणारं, हृदयाला साद घालणारं ? का पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ? शेवटी आभासच सारे ! त्यात खरं काय आणि खोटं काय ! तुझं माझं नातच आभासांचं शब्दांशिवायच भावना बोलणारं, मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं, हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं, पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं निशब्दता पण अनोळखी होते. मग खरं काय असतं ?
काव्यरस

ओढ

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/05/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणात हसले क्षणात रुजले, वसंता तूझे गीत कोवळे.. दंवे सुखाने तृणही रमले, कळ्यात हळवे भ्रमर गुंतले ! प्राजक्त फुले गंध दरवळे, फुलूनी आली बकुळफूले.. गुलाब गाली ओज झळकले, समीरानेही अंग झटकले ! माळरानी रानफुल एकले, त्यानेही तव गीत ऐकले.. तोर्‍यात उभी निशिगंधा बोले, मला सख्याचे वेड लागले ! हळुवार तुझी चाहूल वसंता, बघ वसुधेने बाहू पसरले .. विरह व्याकुळ प्रिया जणू , भेटाया तुज मन आसावले ! विशाल
काव्यरस

कामगार आम्ही कामगार असतो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 04/05/2010 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
कामगार आम्ही कामगार असतो कामगार आम्ही कामगार असतो ठिणगी ठिणगी एक होतो धमन्यातले रक्त जाळतो मोठ्या आगीचे एकक असतो कामगार आम्ही कामगार असतो देशाच्या प्रगतीची ओळख असतो वेगवेगळे हात एकवटतो तुकड्यातुकड्यांचे एकसंध निर्मीतो कामगार आम्ही कामगार असतो श्रमांचे आम्ही मोल असतो कपाळावरच्या भाग्यरेषांतूनी घामाच्या नद्या वाहवतो कामगार आम्ही कामगार असतो भक्कम हातांच्या मुठी वळवतो वज्रालाही पिघळवतो मनगटासारखे कांबवतो विश्वकुटूंबातील घटक असतो भिन्न देश अन भाषा जरी असो संकेतांना अनुसरतो विचार कृतीत रुपांतरतो अजस्र यंत्राचा एक भाग असतो आम्ही हलतो, विश्व तोलतो समुहाच्या नात्यातून कामगारांती
काव्यरस

मुंबई मोटरमन चा संप, आणि आपली भूमिका

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 04/05/2010 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३ मे २०१० पासून मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन्स यांनी बेमुदत अन्नाचा त्याग करून आंदोलन उभारले आहे... या बाबाबत एक प्रवासी आणि नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते? आधीच संपूर्ण दिवस मर मर काम करून थकलेल्या प्रवाशांचे अशा प्रकारे हाल होतात, त्यांना लोकलची तासन तास वाट पहावी लागते.. ही या आंदोलनाची एक बाजू झाली... पण अशा प्रकारे आंदोलन करावे लागले त्यामागे आंदोलनकर्त्यांचीही काही कारणे असतीलच की - ती समजून घेणारे भाष्य करणारे फारसे कोणी दिसले नाही..

मै ऐसा क्यूं हूं?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 03/05/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :) बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं.

मिल्क: एक चळवळ

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 03/05/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने माणसांवर इतक्या प्रकारे अन्याय केला असेल की त्यापुढे कोणतीही गोष्ट फिकी पडावी.. माणसाला गोष्टि इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वर्गीकृत करता येतात हे मनुष्यप्राण्याचे वैशिष्ट्य समजले जाते. मात्र या गुणामुळे माणसाने माणसाला केवळ वर्गीकृतच केले नाहि तर आपल्या भोवती ही वर्गीकरणाची कुंपणे घालून घेत स्वतःला संकूचिततेच्या सीमेपार ढकलले.. काळा, गोरा, तपकीरी असे रंगांवरून वर्गीकरण करून तो थांबला नाहि तर गोरा श्रेष्ठ, काळा कनिष्ट हे ही त्यानेच ठरविले.. स्त्री-पुरूष हे वर्गीकरण तर निसर्गाने केलेले.. म्हटल्यास तुल्यबळ.. पण त्यातही माणसाने पुरुषाला श्रेष्ठ ठरविले..