Skip to main content

सखा...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 11/06/2010 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
तसा तो मला नेहमीच भेटायचा.... कधी परसातल्या कडुनिंबावरून हलकेच ओघळताना. कधी अंगणात फुललेल्या निशिगंधेला रडवताना.... तर कधी घराच्या छतावर जोराजोरात थापा मारुन मी आलोय रे...., म्हणून सांगताना ! लहानपणी शाळेत जातानाच्या पाऊलवाटेवर आपोआपच उगवून आलेल्या दगडफुलांना गोंजारताना... उघड्या पायांनी (पादत्राणाशिवाय) रस्त्यावरच्या डबर्‍यात साचलेले पाणी एकमेकांच्या अंगावर उडवीत सवंगड्यांबरोबर मस्ती करताना... तो नेहमीच भेटायचा.... सख्ख्या मित्राप्रमाणे...., सख्ख्या मित्रासारखा ... डोळ्यातली आसवे लपवताना.... तो माझ्यासवे बोलायचा, खेळायचा, बागडायचा क्वचित रडायचाही... पण रडू नको म्हणून नाही सांगायचा, तर स्वतःच

नको तेच झाले

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 11/06/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पेच झाले; असेही, तसेही नको तेच झाले; असेही, तसेही जरा बोलले मी; रुढीहून काही निराळेच झाले; असेही, तसेही किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे उखाणेच झाले; असेही, तसेही मुके राहणेही विरोधात माझ्या, पुरावेच झाले; असेही, तसेही फुका बोलबाला ऋतूपालटाचा, उन्हाळेच झाले; असेही, तसेही कशाला निमित्ते हवी भेटण्याची? दुरावेच झाले; असेही, तसेही मला हासताना हसे शेवटी या जगाचेच झाले; असेही, तसेही

सिंगापुरात वर्षभर ऋतु एकच- उन्हाळा, पण ऋतुगंध किती विविध!

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 11/06/2010 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षभरातल्या विविध ऋतुंचा आनंद सिंगापुरात राहून लुटता येत नाही. वर्षभर एकच ऋतु! उष्ण आणि दमट. अशा वातावरणात राहून ऋतुगंध कल्पनेतच शोधावा लागणार. पण हे काही कठीण नाही! मराठी मातीशी जोडलेल्या कल्पना, लेखन, नाट्य, संगीत आदी कलांची उणीव मराठी प्रेमींना जगाच्या पाठीवर कुठेही भासत नाही. महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)ने ईथल्या मराठी बांधवांना साहित्याशी जवळीक साधायला, मराठीशी आपले नाते घट्ट करायला, ऋतुगंध हे द्वैमासिक काढून एक चांगला अवसर दिला आहे. गेली चार वर्षे हे मासिक नियमित प्रसिद्ध केल्या जाते. ह्यात विविध विषयांवरील लेख, कथा, कविता, प्रवासवर्णने, माहितीपर ईत्यादी लिखाण असते.

उल्हास दरी...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 11/06/2010 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुणे धबधबा कुणे धबधबा (पहिला टप्पा) कुणे धबधबा (दुसरा टप्पा)

आवाहन

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 11/06/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, कलादालनमध्ये फोटो टाकताना कृपया कॅमेरा वापरलात कोणता ते आवर्जून लिहा. या माहितीचा अप्रत्यक्ष उपयोग बराच आहे. कोणत्या कॅमे-याने किती चांगले (किंवा किती वाईट) फोटो येऊ शकतात ही माहिती नवीन कॅमेरा निवडताना/घेताना उपयोगी पडते. पिकासा सारख्या वेब-अल्बम मध्ये ही आणि इतर माहिती लगेच कळते. पण इथे डकवलेल्या फोटोंच्या बाबतीत तशी मिळत नाही. असो. -युयुत्सु

आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया

लेखक हैयो हैयैयो यांनी शुक्रवार, 11/06/2010 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया मित्रहो, चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्‍यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत. आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या. धन्यवाद. हैयो हैयैयो.

युगलगीत: ही धुंद पावसाळी हवा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 11/06/2010 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही धुंद पावसाळी हवा मंडळी, काव्यातील ओळीचा शेवटच्या शब्दाने पुन्हा नविन ओळ सुरू होणारी हे काव्य आहे. एक नवा प्रयत्न केला आहे. आस्वाद घ्या. ती: ही धुंद पावसाळी हवा तो: हवा हवासा गारवा ती: गारव्यात तनू ही धुंद तो: धुंदीत रंगला खेळ नवा दोघे: ही धुंद पावसाळी हवा....
काव्यरस