Skip to main content

अर्जेंटिना एक परिपूर्ण संघ!

लेखक संजय अभ्यंकर यांनी बुधवार, 23/06/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० चा फिफा विश्वचषक जर अर्जेंटिना जिंकू शकली नाही तर ते एक आश्चर्य ठरेल. शिस्त, संयम आणी कलाकारी जी अर्जेंटिना ने आता पर्यंत दाखवली त्याला तोड नाही. खेळाडूंच्या गर्दीत गोलक्षेत्राजवळ अचूक पासिंग केवळ अप्रतिम! चेंडूवर सतत ताबा ठेवणे, आपल्याला अनूकूल परिस्थीती निर्माण झाली की हल्ला करणे. उगाच ताकतीचे प्रयोग न करता, अचुकता व नजाकतीचे SILKY Passing, सारे केवळ पहात रहावे असे. लायोनेल मेस्सी स्वतः गोल न करता सतत समन्वयाचे (provider) काम करतो हे सर्व संघांच्या फॉरवर्डसनी शिकावे असे स्कील. माझ्या अर्जेंटीनाला शुभेच्छा!
विशेष

आनंदाची बातमी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 22/06/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS गोंद्या आला रे आला गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'?? ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्‍या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली ! धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS

सुटका

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 22/06/2010 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
"कुऽऽऽऽऽऽऽईऽऽऽऽऽ कुऽऽऽऽईऽऽऽऽऽ" खाडकन जागा झालो. आधी समजेनाच काय आवाज येतोय. कसला आवाज येतोय. जरा समज आल्यावर समजलं. खिडकीत जावुन पाहिल तर समोर रस्त्यावर बसुन मान वर करुन यमन गाणारं कुत्र पाहुन डोकच सटकलं. मनात एक सणसणीत शिवी आली आणि तोंडातुन उच्चारुन त्याला हाकलुन लावावं असा विचार आला. पण तेवढ्यात लक्षात आलं. जमणार नाही असं बोलुन तो परत केकाटत बसला असता तर... पंचाईतच झाली असती. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. शेवटी शुक शुक करुन हाकलुन लावलं. हल्ली वाढलेल्या वयात शुकशुक करण्याचा फक्त कुत्रे मांजरी हाकलायलाच उपयोग होतो. तांब्यातलं पाणी पिवुन तोंड ओलं केलं आणि परत लवंडलो.

सॉफ़्ट्वेअर क्षेत्र – मी पाहिले तसे.

लेखक sandeepn यांनी मंगळवार, 22/06/2010 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने खुले अर्थिक धोरण अवलंबले आणि बोलता बोलता जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागले आणि यात सगळा भारत वाहत गेला. नारायण मुर्ती,अझिझ प्रेमजी यासारख्या वल्लींनी सॉफ़्ट्वेअर उद्योगामधे उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली.आणि पाश्चात्य देशांना कमी किमतीत सॉफ़्ट्वेअर बनवुन देणारी खाण सापडली. बोलता बोलता सॉफ़्ट्वेअर सेवा क्षेत्रामधे भारत अग्रगण्य बनला.सुरवातीला लोकांची कामे कॉम्पुटर करील व लोकांच्या नोकय्रा धोक्यात येतील असे भाकीत वर्तवण्यात आले. पण त्याच कॉम्पुटरमुळे खूप सारय्रा नोकरय्रा उपलब्ध झाल्या.आणि मागणी तसा पुरवठा या मार्गाने सॉफ़्ट्वेअर इजिंनियर लोकांची एक फ़ळीच तयार झाली.

" स्वप्न" पहिला पाउस

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 22/06/2010 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
" स्वप्न" पहिला पाउस सुटला वैरी वादळवारा, रिमझिम बरसतील रेशीम धारा, इंद्र धनुचे रंग घेउनी, भेटावीस तू अशाच प्रहरा. पहिला पाऊस तू होऊन यावी, प्रेमघनासम मजवर बरसावी, तव प्रीतीच्या जलधारांनी, प्रेमसागरा भरती यावी. ओलेती तव रूप पहावे, संमोहित गात्रांनी व्हावे, प्रेमरंगी तल्लीन होऊनी, प्रीतीचे अमृतघट प्राषावे, विसारावीस तू क्षणिक ह्या जगा, मजसी माझा विसर पडावा, तव मिलनाचा अपूर्व ठेवा, हृदय अंतरी जतन करावा,. सुटला वैरी वादळ वारा ……… निरंजन वहाळेकर
काव्यरस

गीत: कधी कधी खोटं बोलाया लागते

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 22/06/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खोटं बोलाया लागते
कधी काम करतांना, कधी काम सांगतांना तुमची आमची कसोटी खरोखर लागते लोकहो तुम्हां खरखरं सांगतो, तेव्हां कधी कधी खोटं बोलाया लागते ||धृ|| लहाणपणीचे साधे उदाहरण तुम्ही घ्याना शिक्षक सांगती अमूक तमूक गृहपाठ करूनी आणा न केला अभ्यास तर तुम्ही काय देता उत्तर? ठावूक असे गुरूजनांना त्याचे कारण तरीही शिक्षा मिळे तुम्हांला ओल्या छडीची खोटे बोलणे तेव्हा आपसूक येई तुमच्या ओठी असलेच खोटे खोटे बोलणे तेव्हापासून सुरू होते म्हणून तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||१|| मोठे

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

आमंत्रण ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/06/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
बेभान उधाणला वारा थेंब टिपूर पावसाचे ... अंगणी ठरेना पाऊल परसात धुंद मोर नाचे ... वसंत कोवळा पानोपानी कानी सुर ते मल्हाराचे ... अतृप्त चातक पाऊसवेडा तया आकर्षण जलदांचे ... गळू लागल्या उन्हपाकळ्या भेदूनी पडदे ते ग्रिष्माचे ... रसरसली अन् वसुंधराही होता आगमन हे वरुणाचे ... फुलूनी आल्या मुग्ध कळ्या लेवूनी वसने शरदाची ... ओघळला अलवार प्राजक्त गुणगुणतो गाणे आनंदाचे ... सुखे ओलावली वसुधा नभ ओघळले पावसाचे ... क्षितीजापार उभा रवी घेवुनी आमंत्रण उजळायाचे... विशाल

रोहीडा: बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 22/06/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
२० जूनला सकाळी कुठेतरी भटकायला जायचे ठरले आणी लगेच ठिकाणही ठरले ते म्हणजे भोरजवळील रोहिडा किल्ला बरेच दिवस तो करण्याचे मनात होते पण काही केल्या जमत नव्ह्ते. आज योग जुळून आला. आम्ही चौघे मित्र निघालो ते मित्राच्या चारचाकीने. सव्वा तासातच भोरपासून ८ किमी असलेली बाजारवाडी गाठली. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे अतिशय सुंदर असे गाव. गावापासून लगेच चढाईला सुरुवात होते. पावसामुळे हवेत मस्त गारवा पसरला होता. शेतं हिरवीगार झाली होती. काळे ढग मधूनच बाजूला सरकून निळाइचे दर्शन घडवत होते.