Skip to main content

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

लेखक विकास यांनी सोमवार, 28/06/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
Source: lbl.gov
left
आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लागतात. अनेक सर्वर्स जोडलेली ही क्रेंद्रे अथक आणि अहोरात्र कार्यरत असतात. प्रचंड उर्जा खर्च होत असते.

पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य

लेखक शुचि यांनी सोमवार, 28/06/2010 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिममधे माझं आटोपल्यावर नवर्‍याची वाट बघत एक पुस्तक चाळत बसले होते. पुढील उतार्‍यानी लक्ष वेधलं - पुरुष हे प्रचंड प्रमाणात व्हिज्युअल असतात. स्त्रियांना आवडो अथवा न आवडो एक गोष्ट अजीबात नाकारता येत नाही ती म्हणजे - पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व. एखाद्या पुरुषाला सुंदर स्त्रीचं छायाचित्र दाखवा अणि त्याची नजर हमखास २ क्षण जास्त रेंगाळेल याउलट आकर्षक पुरुषाच्या छायाचित्राची दखलही एखादी स्त्री घेणार नाही. १०० पुरुषांना विचारा की ते सौंदर्यास अधिक प्राधान्य देतात की स्वभावास आणी ९५ पुरुष सांगतील सौंदर्य बाकीच्या ५ जणांना प्रश्न कळला नसेल. मला हा मुद्दा पटला, नीट पटला.

कृपया पादत्राणे बाहेर ठेवावीत

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी सोमवार, 28/06/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही मालिकांमध्ये नेहमी पाहिले जाते, सर्व कलाकार चप्पल बूट घालूनच घरात वावरतात. याचे नक्की कारण कळेल काय ? हिंदी मालिकांचे अनुकरण करुन राठी मालिकांमध्येही ही सवय वाढत आहे असे दिसते.

कृष्णा नी बेगने..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/06/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा नी बेगने..(येथे ऐका) (हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी.

रिक्षावाले काका

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद. दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! '' दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! '' पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात. ''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! '' रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते.

आस “ नाविन्याची “

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 28/06/2010 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
“मरण “ मरणापेक्षाही महाग तीन दिवसापूर्वी “सकाळ “ला लेख वाचला. मरणोत्तर अफाट खर्चा संबंधी……………….. आस “ नाविन्याची “ भोगिले आकंठ जीवना, नाविन्य काहीच आता ना राहिले, उपभोगण्या मृत्यो तुला, इतुकेच होते राहिले.

मासे - बोंबिल

लेखक जागु यांनी सोमवार, 28/06/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे आहेत बोंबिल कालवणाचे साहित्य : १ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.) लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन हिंग, हळद १ ते २ चमचे मसाला चिंचेचा कोळ चविपुरते मिठ १ मिरची मोडून थोडी कोथिंबीर तेल. कालवणाची कृती : तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.