Skip to main content

मिर्ची चे लोणचे

लेखक नेहमी आनंदी यांनी गुरुवार, 08/07/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
लाल किंवा हिरव्या मिर्च्या १ किलो मीठ १५० ग्रम चिंच ३०० ग्रम तेल अर्धा किलो भाजुन कुटलेले तीळ १५० ग्रम मोहरीची पावडर ४० ग्रम जिरा पावडर २० ग्रम मेथी पावडर १० ग्रम शोप पावडर १५ ग्रम हळद १५ ग्रम हिंग आवडी नुसार कृती:- मिर्च्या उभ्या चिरुन घ्या.चिंचेचा कोळ तयार करुन घ्या.थोड्या तेलात मिर्च्या थोड

न्यायाचा पुतळा

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 08/07/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे. आपले नित्यनेमाचे उद्योगधंदे आटोपुन तो नगरीचा फेरफटका करत असे. नगरीत अनेकांशी गप्पा मारत असतांना तो आपल्या वैयक्तिक आयुष्याला विसरत असे. नगरीत अनेक विद्वज्जन, मान्यवर भल्या भल्या विषयांवर चर्चा, वाद करत असत. पण हा त्यापासुन बरेचदा दुर रहात असे. लोकांशी बोलावं, विनोद करावा, टवाळी करावी असाच याचा खाक्या असे. वैयक्तिक आयुष्यात ज्यांना विचार करायचा नसतो ते चव्हाट्यावर येवुन विचार केल्याचे नाटक करतात असा त्याचा सरळ सरळ विचार होता. नगरातील नगरपालाने काही काळ बदली नगरपाल नेमल्यानंतर ब्राह्मणाची साडेसाती सुरु झाली.

अतरंग ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 08/07/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
जैपालभौंची ही सुंदर कविता वाचल्यावर आम्हाला राहवले नाही, अंतरंगात गडबड सुरू झाली अन इडंबन जलमलं ! पावसाच खाणं मातीत जाणं पोटात गडगड होणं अतरंगी ओला टॉवेल पिवळी नक्षी कायमच्या साक्षी अतरंगी गच्च दरवाजे ओली थरथर अधिरलेले उदर अतरंगी उठे उधाण सरे देहभान पोटात तुफान अतरंगी झाकल्या खुणा का उघडता पुन्हा घडला काय गुन्हा? अतरंगी नवईडंबनकार इरसाल
काव्यरस

फुटबॉल आणि भविष्यवाणी -

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 08/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत.
विशेष

स्वातंत्र्यवीर सावरकरः ऐतिहासिक उडीची शताब्दी

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 08/07/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मार्सेलिस बंदरामध्ये ७ जुलै १९१० ह्या रात्री मोरया बोट थांबली आणि ८ जुलै १९१० रोजी सकाळी स्वातंत्रवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोल मधून भर समुद्रात उडी मारली व पोहत मार्सेलिस बंदराला लागले. ह्या जगभर गाजलेल्या ऐतिहासिक पराक्रमाची आज शताब्दी आहे. त्यानिमित्त ह्या थोर स्वातंत्रवीराला मिपापरिवारातर्फे विनम्र आदरांजली.

"उलटे समीकरण घातक!"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 08/07/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
समाजाचे आणि सद्यस्थितीत घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब सिनेमात, मालिकांमध्ये आणि बातम्यांमध्ये दिसते असे आपण म्हणतो. पण कधीकधी या उलटही घडू शकते, असे वाटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे असे मला वाटते. त्यासाठी दोन उदाहरणे अत्यंत ताजी आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित झालेला थ्री इडीयटस नंतर या वर्षीच्या जानेवारी महिन्या पासून शालेय आणि कोलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांची लाट आली. ती अजूनही कायम आहे.

Caricature:Johny Lever

लेखक jagdish bhawsar यांनी गुरुवार, 08/07/2010 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
हे चित्र काढले आहे लवकरच प्रदर्शीत होत असलेल्या हिन्दी चित्रपट गोलमाल ३ साठी. चित्रपटाच्या मागनीनुसार आर्ट director नरेन्द्र राहुरीकर यांनी सांगीतल्या प्रमाने johny lever चा लुक मी तैयार केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल .!!! प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत .....