जुनी
ओठातील छळी मला, अधूरी कहाणी जुनी
गालातील खळी काढी, खोडी दिवाणी जुनी
नीरव डोही काळाच्या, शब्द कुठूनी आले?
आठवांच्या लाटा म्हणती मुकी गाणी जुनी
सर्वस्व देऊनीही, ऋणमुक्त ना जाहलो
विकूनीयाही आत्म्याला, उरली नाणी जुनी
बेगड्या दुनियेमध्ये बेगडी किमयाच दिसे
शहनाई भासे जरी, आहे पिंगाणी जुनी
भग्न वा्स्तूखंडरात धुंडाळशी काय आज?
भरभरुनी लुटल्यावरी, उरली विराणी जुनी
मनोहर शेर लिखीत, रातराणी गायी गझल
का टोचूनी पुन्हा देशी, जखम ही राणी जुनी
मिसळपाव
साहित्यः-
उडदाची डाळ १ वाटी
हरभर्याची डाळ १ मोठा चमचा
कोरडं खोबरं किसून साधारण पाव वाटी
लसूण ४-५ पाकळ्या, आलं एक पेराएवढं, मीठ, चिंचेचा कोळ १ मोठा चमचा.
फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, जिरं, कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर
कृती-
उडदाची डाळ व हरभर्याची डाळ कुकरात ४ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी. एका कढल्यात कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घ्यावे.