Skip to main content

याची कानी ... याची डोळा ...

लेखक सावळागोंधळ यांनी बुधवार, 21/07/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन. आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ... जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात .. त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख .... याची कानी ... याची डोळा ... प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ...

१२ राशींमधला प्रवास

लेखक शुचि यांनी मंगळवार, 20/07/2010 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ्जवळ एक तप झालं असेल भारतात एक खूप मस्त राशींवरचं पुस्तक वाचलं होतं. ज्यात जीवात्म्याचा विकास प्रत्येक राशीत कसा होतो ते सविस्तर सांगीतलं होतं. आणि एका धाग्यात तो प्रवास सुंदर रीतीने ओवून दाखवला होता. जितकं आठवेल तितकं आणि तर्कशुद्ध इथे मांडायचा प्रयत्न करते. मेष राशीत जीवात्मा नुकताच जन्मास आलेलं अर्भक असतो. स्वयंकेंद्रीत आणि मी म्हणेन तसच व्हावं अशी अपेक्षा असणारा. मनाविरुद्ध झाल्यास सगळं घर डोक्यावर घेणारा. वृषभ राशीत तो ज्याला इंग्रजीत "टॉडलर" म्हणतात तसा होतो. या बाळाला प्रत्येक रंग , रूप, रस, गंध याचं आकर्षण वाटतं.

पाउस आनि निसर्ग

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 20/07/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस आणी निसर्ग पाउस हा नसतो फक्त आनंदाचा उरुस तर पाउस हा असतो आभाळाच्या लेकरांनी विश्वाच्या ओसरीत घातलेला धुडगुस पाउस म्हणजे आभाळाने धरणीला दिलेला असतो एक नजराणा आणी पाउस म्हणजे आकाशाचा धरतीला भेट्ण्याचा असतो एक खोटा बहाणा या जलदाच चैतन्य भेटत असत जेव्हा प्रितीत तेव्हा पाउस घेत असतो स्रुजनाला आपल्या गोड मिठीत तहान विसरुन मेघ जेव्हा जलधारा शिंपुन होतात अधु धरणी मात्र होते तेव्हा हिरवा शालु नेसलेली नववधु पावसाच या निसर्गाला काहिच नसत सांगण आणी निसर्गाच या पावसाकडुन काहीच नसत मागण कारण पाउसच असतो या निसर्गाच शुभ्र कोंद्ण आणी निसर्गच असतो या पावसाच हिरवं अंगण .......

सच्चा माणूस!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
जून २००७ च्या सुमारची घटना. संजय संगवईचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणी मी 'मनोगत'वर जागवल्या होत्या. लेखनावर एक प्रतिक्रिया आलेली दिसली. पत्रकारितेतील माझ्या अनुभवांविषयीचा उल्लेख त्यात होता. मी या व्यवसायात आहे हे फारसं कुणाला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. जालावरच मी नवा. सदस्याचं नाव पाहिलं, 'भोचक'. मी उडालो. हा कोणाचा भोचकपणा, स्वाभाविक प्रश्न आला. काही कळणं शक्य नव्हतं. व्यनि करणं शक्य होतं. माझ्या स्वभावानुसार ते काही झालं नाही. मीही नंतर फारसा रस दाखवला नाही. त्याची आणि माझी अखेरपर्यंत भेट न होण्याचं कारण तिथं असावं का? हे मनाचे खेळ.

प्रकटन

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले. अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले. तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे.

उडदाचं घुटं

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 19/07/2010 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज खूप दिवसांनी येत आहे. सोबत आणला आहे रोजच्या जेवणातला साधासाच एक पदार्थ. रोजच्याच आमटीचा कंटाळा आला की करावं असं उडदाचं घुटं किंवा उडदाची आमटी. साहित्यः- उडदाची डाळ १ वाटी हरभर्‍याची डाळ १ मोठा चमचा कोरडं खोबरं किसून साधारण पाव वाटी लसूण ४-५ पाकळ्या, आलं एक पेराएवढं, मीठ, चिंचेचा कोळ १ मोठा चमचा. फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, जिरं, कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर कृती- उडदाची डाळ व हरभर्‍याची डाळ कुकरात ४ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी. एका कढल्यात कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घ्यावे.

ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 19/07/2010 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं.

कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 19/07/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुन्हा एकदा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू आणि काही खरडवह्या ;;) कोणत्या शब्दात दम त्याला भरू ? माजले जालात जे फुलपाखरू तू अता बघशील वाताहत खरी लागले पाध्ये जसे हे अवतरू पंचही तेव्हाच खाते कापतो लागले उधळायला जर शिंगरू पटवती सार्‍या पुरातन ओळखी बघ पुन्हा आले जुने माथेफिरू ! फुरफुराया लागले धागे किती ! लागले कंपू पुन्हा कल्ला करू आठवू इतके कसे मी आयडी ? आठवू कोणास, कोणा विस्मरू ? ---------कलम १ ----------------- खूप नक्षीदार आहे लेख हा एकमेकांना चला वाव्वा करू आपल्या दोघांमधे कोणी नको ये खरड टाकू जरा