Skip to main content

एक पाहुणी पोरगी ...

लेखक वैभव देशमुख यांनी शनिवार, 31/07/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक पाहुणी पोरगी पाणी शेंदायला येते आणि जराश्या उन्हानं फूल पळसाचं होते कसे खुणावती डोळे कसे खुणावती हात जणू अंधार राहतो आजूबाजूच्या डोळ्यात आडापुढची खिडकी मुका हवेत सोडते आणि पाहुण्या पोरीच्या मनी मोहोळ फुटते ..सारा दीस आडावर तरी भरे ना घागर एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर.. वैभव देशमुख
Taxonomy upgrade extras

झाझिकी..

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 31/07/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आमच्याकडे पारा ३५ अंशावर झेपावला आहे. युरोपातल्या मंडळींना कुठली इतक्या उच्च तपमानाची सवय? त्यात ह्या लोकांना घरात सिलिंगफॅन लावायला नकोत आणि ए सी ची आम्हाला गरज नाही म्हणतात.वर्षातून आठ दहा दिवस ३०/३२ अंश से.पर्यंत चढतं तपमान, उन्हाळ्यात २२/२५ अंश आणि एरवी तर सिंगल डिजिट किवा उणेच.. मग लागतात कशाला अशा गोष्टी? हा यांचा युक्तिवाद ३५/३७ अंश से. नी या उन्हाळ्यात अगदी हाणून पाडला आहे . मॉलमधली आइसक्रीम्स, दही पटापट संपायला लागले आहेत. काल दुपारी त्सेंटा आजीकडे ह्याच गप्पा चालू होत्या. आजी म्हणाली ह्या हवेसाठी एकदम उत्तम रेसिपी म्हणजे ग्रीक झाझिकी ! आता हे काय प्रकर्ण आहे?

कै. वि.ल.भावे

लेखक शरद यांनी शनिवार, 31/07/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
.वि.ल.भावे (१८७१-१९२६) ठाण्याच्या एका सुखवस्तु घराण्यात श्री.भाव्यांचा जन्म झाला. शालेय अभ्यासात फार लक्ष नसले तरी निसर्ग निरिक्षणाचा नाद असल्याने ते तासंतास भटकण्यात घालवावयाचे व पुढे त्यांनी यावर लिखाणही केले. त्यांनी मिठाच्या व्यवसायाला सुरवात केली व त्यात यश व पैसाही मिळवला. व्यवसायासंबंधी त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर भरपूर प्रवास केला व त्यावेळी संतांची माहिती व त्यांचे साहित्य याबद्दल बरीच सामग्री गोळा केली. या करिता त्यांनी कर्नाटक व तामिळनाडूतही प्रवास केला. त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे १८९३ ला "मराठी ग्रंथसंग्रहालय" स्थापन केले.

एक दिवस मैत्रीचा..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 31/07/2010 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा! एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्‍यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते.

फर्डिनांड मॅगेलान - जगाचा प्रवासी!

लेखक असुर यांनी शनिवार, 31/07/2010 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करणारा महावीर कोण? या प्रश्नाचा शोध 'फर्डिनांड मॅगेलान'पाशी येऊन संपतो. कारण हाच तो सुपरहिरो ज्याने पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. ती सुद्धा आपण शंकराला प्रदक्षिणा घालतो ना, तशी! या मॅगेलानबद्दल मी पहिल्यांदा वाचलं जेव्हा मी हौशी खगोलनिरीक्षकाचं काम करायचो. दक्षिण गोलार्धातून दिसणारा एक खगोलीय अविष्कार म्हणजे मॅगेलानचे ढग. प्रत्यक्षात ह्या अवकाशातील छोट्या आकाराच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) असून आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरणाऱ्या उप-आकाशगंगा (किंवा लघु-दीर्घिका) आहेत.

मार्गदर्शन हवे आहे

लेखक सानिका पटवर्धन यांनी शनिवार, 31/07/2010 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक मैत्रिण भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी येणार आहे. ती Arnold & Marie Schwartz College of Pharmacy and Health Sciences,Brooklyn, New York येथे शिकणार आहे. विद्यार्थी म्हणून रहाण्याच्या दृष्टीने कोणती जागा योग्य ठरेल? रहाण्याच्या खर्च, जायला-यायला लागणारा वेळ, सुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टींचा ( इतर कोणते महत्वाचे मुद्दे असल्यास सांगावे) विचार करता न्यूयोर्क की न्यू जर्सी मधे राहणे जास्त सोईचे पडेल? न्यूयोर्क / न्यू जर्सी मधे कोणत्या भागात राहता येईल? मिपाकरांनी कृपया योग्य मार्गदर्शन करावे.

सुकटची चटणी

लेखक जासुश यांनी शनिवार, 31/07/2010 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस सुकट २ वाटि टोमेटो-१ कान्दा-१ लसुण-४ पाकळ्या हिरवि मिर्चि-१ कोथिम्बिर चिरुन तिखट-१ चमचा हळ्द-१ लहान चमचा मिठ- चविनुसार तेल- १ पळि जिरे- १ लहान चमचा मार्गदर्शन १.एका पातेल्यात पाणी घ्यावे. मग त्यात सुकट टाकावी. सुकट पाण्यात अलगद तरंगेल. ति पाण्यातून काढून घ्यावी. २.एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे,ठेचलेला लसूण व कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा. त्यात चिरलेला टोमेटो टाकावा .त्यात हळद, तिखट व मीठ टाकावे. ३.नंतर धुऊन घेतलेली सुकट टाकावी. व वाफ येईपर्यंत शिजवावी. ही चटणी सुकी बनते.

CE मार्कची वांगी!!!!?????

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 30/07/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो) सीई मार्कचे वांगे १ सीई मार्कचे वांगे २ त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो.

मातेचे ऋण

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 30/07/2010 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
A builder builded a temple he wrought it with grace & skill pillars & groins & arches all fashioned to work his will men said as the saw it's beauty, "it shall never know decay great is thy skill o builder! thy fame shall endure for aye!" A mother builded a temple with loving & infinite care planning each arch with patience lying each stone with prayer None praised her unceasing efforts none knew of her wonderous plan for the temple the mother builded was unseen by the eyes of man Gone is the builder's temple crumpled into the dust low lies each stately pillar food for consum
काव्यरस