Skip to main content

माझे सदस्यत्व .................

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी रविवार, 01/08/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ..... मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद......... माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........ आपली नम्र मृण्मयी दीक्षित

साहित्यसंपदा.कॉम

लेखक अभिमोहित यांनी रविवार, 01/08/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आजच्या पिढीला वाचण्याची सवयच नाही" हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांना वाचायला आवडतील अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवणारी प्रभावी यंत्रणाच आज आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यातच वाचनालयांची स्थितीही म्हणावी तशी समाधानकारक नाही. आपल्याला हव्या त्या पुस्तकांसाठी दिवसेंदिवस वाट बघावी लागते. चोवीस तास ऑनलाईन असणारे, पुस्तकांवरही तितकेच प्रेम करतात, पण आपल्याला पाहिजे असलेल्या पुस्तकासाठी असे दिवसेंदिवस वाट पहाणे त्याना पटत नाही. वाचायची इच्छा असुनही या तरुण वाचकांपर्यंत पुस्तक पोहचतच नाही. पुस्तकं त्यांच्या टप्यात आली तर वाचन संस्कृती अजुन वाढेल.

..मैत्र...

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी रविवार, 01/08/2010 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
............ ते कोण आहेत माझे ?............ काय नातं आहे त्यांच्यात आणि माझ्यात?.......रक्ताचं तर नाहीच नाही....पण बाकी?..... काका ....मामा .... खरं सांगू? मला तर आज हे लिहिताना सुद्धा समजत नाहीये कि त्यांना काय नाव देऊ !..... "दीपक भा"..... त्याना ओळखणारे सगळेजण त्यांना याच नावाने ओळखत ....मीही तेच म्हणते.... ..... कधी कधी टिपूर चांदण पडतं ..... रात्रीच्या जेवणा नंतर सहज चांदण्यात थोडसं फिरून यावसं वाटत..... बाहेर पडते .... कोपऱ्यापर्यंत जाता जाता सवयीप्रमाणे आकाशाकडे नजर जाते..... चंद्रकोर अतिशय मोहक दिसत असते... मधेच एखादा हलकासा ढग तिच्यावरून हळूच सरकत सरकत निघून जातो...

महाराष्ट्रातलं मौल्यवान रत्न

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 01/08/2010 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
परमेश्वर पाट्या टाकतो. होय. परमेश्वर माणसं बनवताना चक्क पाट्या टाकतो. फरक जाणवतो जेव्हा तो काही माणसांना बनवताना ओव्हर टाईम घेतो. मन लावून काम करतो आणि त्याच्या हातातून असामान्य माणसं घडतात. प्राध्यापक शिवाजीराव भोसले गेल्याच वाचलं आणि मन विषण्ण झालं. लोकसत्तेत "महाराष्ट्र शारदेच्या दरबारातील रत्न निखळल" अशा मजकुराची बातमी आली होती. महाराष्ट्र शारदेचा दरबार दिवसेंदिवस रिकामी पडायला लागलाय. महाराष्ट्रात रत्नांची व्याख्याच बदलायला लागली आहे. या निखळ रत्नांची पारख करणारे रात्नपारखीही कमी व्हायला लागले आहेत. या अस्सल रत्नान ऐवजी इतर रत्नांना भाव आला आहे.

जाये तो जाये कहां

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 01/08/2010 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. पूर्वी दहा बारा वेळा गेलोय, तरी दिल्ली तशी माझ्या साठी नविनच. तिथे असलेल्या गुजराथ भुवन किंवा महाराष्ट्र भुवनच्या स्वस्त आणी मस्त अ‍ॅकोमोडेशनल फॅसीलीटीज मी आधीच यूज केल्या असल्यामूळे अ‍ॅकोमोडेशनची काळजी नव्हती.सकाळी साडेदहाच्या सुमारास स्टेशनावरुन मी सरळ गुजराथ भुवनला पोहोचलो. नव्या नियमा प्रमाणे माझ्या सरकारी आईकार्डाची झॅरोक्स घेवून मी काउंटरवर लाइनीत उभा राहीलो. अर्ध्या तासानी नंबर आला.रीसेप्शनीस्टनी रजीस्टर माझ्यापूढे केले.

महाराष्ट्रातलं मौल्यवान रत्न

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 01/08/2010 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
परमेश्वर पाट्या टाकतो. होय. परमेश्वर माणसं बनवताना चक्क पाट्या टाकतो. फरक जाणवतो जेव्हा तो काही माणसांना बनवताना ओव्हर टाईम घेतो. मन लावून काम करतो आणि त्याच्या हातातून असामान्य माणसं घडतात. प्राध्यापक शिवाजीराव भोसले गेल्याच वाचलं आणि मन विषण्ण झालं. लोकसत्तेत "महाराष्ट्र शारदेच्या दरबारातील रत्न निखळल" अशा मजकुराची बातमी आली होती. महाराष्ट्र शारदेचा दरबार दिवसेंदिवस रिकामी पडायला लागलाय. महाराष्ट्रात रत्नांची व्याख्याच बदलायला लागली आहे. या निखळ रत्नांची पारख करणारे रात्नपारखीही कमी व्हायला लागले आहेत. या अस्सल रत्नान ऐवजी इतर रत्नांना भाव आला आहे.

प्रेरणादायी २० गोष्टी

लेखक मोहन यांनी शनिवार, 31/07/2010 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज तर नक्कीच विमान चुकणार असा विचार करत कसाबसा अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचलो तर विमान दोन तास ऊशीराने असल्याचे फळकावर झळकत होते. हुश्श करुन चेक इन सोपस्कार आटोपले आणि वेळ घालवायला म्ह्णून पुस्तकाच्या दुकाना कडे वळलो. मुखपॄष्ठावर उलटी अक्षरे बघून कुतूहलाने साहाजिकच पुस्तक उचलले. Connect the Dots - रश्मी बंसलचे. त्यांच्या Stay Hungry Stay Foolish बद्दल कुठेतरी ऐकले होते. लेटेस्ट २०१० चे प्रकाशन व २०० रु किंमत पाहुन वेळ घालवायला बरे असेल म्हणून लगेच घेतले. "अचानक धनलाभ" माझ्या राशी भविष्यात होते की काय कोण जाणे.

आयला!! हे अवघड आहे बुवा !!!

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 31/07/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः हे लेखन केवळ विरंगुळा म्हणून घ्यायचे आहे. नुकताच एका सदस्याने स्वयंपाक येणे/करणे यावरून एक धागा काढला आहे. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या किंवा अपेक्षित धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात न झाल्यामुळे होणार्‍या मनस्तापाविषयी तो धागा आहे. आजकाल लग्न ठरताना आणि ठरल्यावर प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटण्याची बरीच संधी मिळते.