Skip to main content

जालवाणी - अभिवाचनाचा अंक

लेखक बाबुराव यांनी रविवार, 15/08/2010 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर जी काय पडीक नाव असत्याल त्यातले एक नाव म्हंजी आदरणीय प्रमोद देव. लय लोकायचा मित्र असलेल्या या भल्या माणसाला जालीय हालचाली शिवाय चैन पडत नाय . मित्रमंडळी खूप असल्यामुळे हाक मारली की त्यायचा गोतावळा जमा होतो. आमच्या आंतरजालीय खबरीनुसार त्यायच्या गुगल 'बझ बझाट' दररोज पार हजाराच्या खरडी पार करतो. येगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींचा तिथे वावर असतो. माणूस तसा जरासा तापट असावा. जरशीक मतभेदामुळे ह्यो देव माणूस माणूस मिसळपाववरुन आपल्या लेखनाला डिलीट मारुन पसार झाला.

हे स्वातंत्र्यदेवते!

लेखक उमेश कोठीकर यांनी रविवार, 15/08/2010 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे स्वातंत्र्यदेवते, आज सालाबादाप्रमाणे, परत टाळ्या वाजवितांना.. तुला स्वतंत्र आकाशात फडकतांना पाहून, तुझ्या वाढदिवशी विचार येतोय्... काय वाटत असेल तुला? साठी ओलांडलीस तू, वय झाले तुझे, दृष्टी अधू झाली असेल तुझी..अश्रू ढाळून, बघून; झालेला रौरव नरक, या देशाचा, तुझ्या प्रतिष्ठापनेसाठी ते नंतरही...आजपर्यंत, अभिषेक सोसत आणि पाट पाहात...फक्त रक्ताचे! रक्त बालकांचे, आयांचे, बहिणींचे, मुक्यांचे, वेड्यांचे, गांधींचे, शांतीचे, मनाचे..... तुझे, का? का?

आंतरराष्ट्रिय बातम्या आणि भारतिय वृत्तपत्रे

लेखक नंदू यांनी रविवार, 15/08/2010 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात सध्या पुरानं थैमान घातलंय. पंधरा दशलक्ष म्हण्जे जवळ जवळ नऊ टक्के लोक विस्थापित झालेत. आणि हे घडतंय ते आपल्या शेजरी राष्ट्रात, ज्याच्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा आपल्या देशावर थेट परिणाम होतो. या अशा आपत्तीतही भारताने देऊकेलेली पाच्दशलक्ष डॉलर्रची मदत स्विकारावी का नाही यावर त्या देशात खल चल्लय. स्वाभाविकच ही एक प्रचंड महत्वाची बातमी आहे पण दुर्दैवाने टाइम्स सारख्या प्रमुख वृत्तपत्र समुदायाने याची तितकिशी दखल घेतलेली दिसत नाही. याला अपवाद मात्र मद्रासच्या हिंदूचा.

interview ला जाणार आहे,सल्ले हवेत.

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 15/08/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार....... आताच वहीदाच्या एका खरडीला उत्तर देताना,मी लिहले.......
अरे मी उद्या एका MNC मधे interview ला जाणार आहे. ते personal की काय ते प्रश्न,कोणते अपेक्षित आहेत व काय उत्तरं द्यायची जरा थोडक्यात सांगशिल का? मला ह्यावर एक लेख लिहायचा आहे.ईथे professional लोकं फार आहेत,मदत होईल. (जॉब मलाच मिळणार आहे)
पण ती गैरहजर आहे,मला जलद व योग्य प्रतिसाद हवेत. आता जास्त काही बोलत नाही.होउ द्या सुरु!! आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!

सामंतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 15/08/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
सामंतांचा काल वाढदिवस होता. ते हल्ली दिसत नाहींत. कुणी म्हणले होते की सध्या अमेरिकेत आहेत. त्यांना शुभेच्छा!

स्वातंत्र्यदिनाचा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 15/08/2010 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य! देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे. लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो. मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स!

गगनावरी तिरंगा ....!!

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 15/08/2010 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
तिरंगा गगनावरी तिरंगा ....!! गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका संगे हिमालयाला येण्यास मार हाका समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी आता अभय मनाच्या धुंदीस
काव्यरस

पीपली लाइव

लेखक प्रमोद्_पुणे यांनी रविवार, 15/08/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्‍या एका गरीब शेतकर्‍याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट.

पिठल

लेखक कुक यांनी शनिवार, 14/08/2010 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-- १ वाटी चण्याच पिठ, १ मध्यम कान्दा बारिक चिरुन , दिड ग्लास पाणि, क्डीपत्याची पाने, २ मिरच्या बारिक चिरुन, हवा असल्यास टोमेटो, लाल तिखट १छोटा चमच, अरधा चमच हळद, मिठ चविनुसार, तेल फोडणिसाठी, राई, जिरे ईत्यादि क्रुति--- प्रथम पाण्यात चण्याचे पिठ, हळद, मसाला, मिठ एकदम पातळ कालवा गुठळी राहु देउ नका. कढईत तेल तापवुन त्यात राई जिर्याचि फोडणि करा. त्यात मिरची व कडीपत्ता घाला कान्दा घाला, कान्दा लाल झाल्यावर(टोमेटो हवे असल्यास बारिक चिरुन घाला मि टोमेटो घालत नाही) त्यात कालवलेले पिठ घाला. थोडे शिजु द्या. पुर्ण आटवु नका थोडे पातळ ठेवा.

तीन बातम्या...........

लेखक वेताळ यांनी शनिवार, 14/08/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्हीवर काही बातम्या एक दोन दिवस अगदी कंटाळा येईपर्यत दाखवत राहतात. नंतर त्या लगेचच लोकांच्या विस्मृतीत जातात. गेल्या एक दोन महिन्यात घडलेले काही बातम्या आणि आजकालच्या काही बातम्या ह्यात खुपच जवळचा संबध वाटतो. त्याबद्दल खालील तीन बातम्या देत आहे.आपणाला त्या बद्दल काय वाटते त्याचे अभिप्राय जरुर द्या. पहिली बातमी म्हणजे धान्यापासुन दारु बनवायला महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. त्या निर्णयाचा फायदा सर्व आघाडीच्या राजकारण्यानी घेतला.आपआपल्या नातेवाईकांच्या नावे त्यानी धान्यापासुन दारु बनवायला परवानगी घेतली व नंतर इतराना परवानगी देण्याचे बंद केले.त्यावर सगळीकडे खुप गदारोळ उठला.