Skip to main content

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.

ठोसेघर धबधबा

लेखक उपेन्द्र यांनी रविवार, 05/09/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज संध्याकाळीच सातार्‍याजवळच्या ठोसेघर धबधब्याला भेट देऊन आलो. पूर्वी एकदा गेलो होतो तेव्हा रस्ता खूप खराब होता. पण आता चांगला आहे.

भाद्रपदात येती गौरी-गणपती..

लेखक प्राजक्ताचि फुले यांनी रविवार, 05/09/2010 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
हरितालिका: सखी पार्वतीने शंकरासाठी खुप मोठी तपश्चर्या केली. कितीतरी वर्षे झाडाची पाने खाऊन होती. शेवटी तिच्या ह्या उग्र तपश्चर्येला फळ येऊन शंकर तिला प्रसन्न झाले.यासाठी भाद्रपदेच्या तृतीयेला हरितालिकेचे व्रत असते. कुमारिका आणि सुवासिनी या दिवशी उपवास करतात. एका चौरंगावर वाळुचे शिवलिंग स्थापले जाते. आजुबाजुला सूर्य चंद्र आणि सखी पार्वतीची प्रतिक्रुती बनवली जाते.चौरंगाच्या आजुबाजुला रांगोळी काढून जागा सुशोभित करतात. पार्वतीला गळ्सरी, कापसाची वस्त्रे वाह्तात.

आपणाला दुसर्‍याचा नवरा आवडतो का?

लेखक भीडस्त यांनी रविवार, 05/09/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर खूप विनोदी चर्चा चालू आहेत. त्यात गंभीर म्हणा विचारप्रवर्तक म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी आमचे बायकोबरोबर (नेहमीप्रमाणे) परत एकदा भांडण झाले. आज सकाळी मिपावर आलो आणि हा विषय सुचला विषयाचे नाव आहे.

पालकभात

लेखक मितान यांनी रविवार, 05/09/2010 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात आपल्या हिरव्या पालेभाज्यांपैकी पालक ही एकच भाजी मिळते. ती पण कमीत कमी अर्धा किलो चे पॅकेट घ्यावे लागते. एवढा पालक न कंटाळता संपवायचा म्हणजे फारच सुगरणपणा दाखवायला लागतो ;) मग पालक पराठे, सूप, पालकभात असे भरपूर पालक लागणारे पदार्थ केले जातात. त्यातला एक प्रकार पालक भात. लागणारा वेळ - ३० मि. दोन फुल एक हाफ व्यक्तींसाठी.

मुली व मुले यांच्याशी वर्तन

लेखक अनुप्रिया यांनी रविवार, 05/09/2010 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या मॉडर्न जगात मुले व मुली यांना समान हक्क आहेत असे मानले मुला, समानतेने वागवले जाते. तरीही काही ठिकाणी पालकांनी अथवा सासरच्या लोकांनी मुलींना कमी लेखणे, अन्याय करणे. नव-याने बायकोला अथवा प्रियकराने प्रेयसीला "taken for granted" समजणे. असे प्रकार आजही होत आहेत. असेच जर मुलीच्या घरचे जावयाशी वागले किंवा बायकोने नव-याला अथवा प्रियकराला "taken for granted" समजले तर चालेल का?? सर्व बंधने मुलींवरच का?? प्रत्येकवेळी तिने अ‍ॅडजस्ट करावे, समजून घ्यावे, माफ करावे ही भावना का?? हे कितपत योग्य आहे.??? या बाबत तुमचे मत काय?

टोल भरा प्रवास करा (आपण असेच भरडणार)

लेखक टग्या टवाळ यांनी रविवार, 05/09/2010 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, काल मी पुणे ते कोल्हापुर असा प्रवास करत असतांना जाता येता ३०० रु टोल पोटी खर्च झाले सहज विचार करता अस लक्शात आल की आज महाराष्ट्रत कोठे ही प्रवास करतांना आपल्याला प्रत्येक जागी टोल द्यावा लागतो तो का कशा साठी.

पॅराडाइज नाऊ

लेखक सुनील यांनी रविवार, 05/09/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नॅब्लूस हे पॆलेस्टाईनमधील एक शहर. सैद आणि खालेद हे त्या शहरात एकत्र वाढलेले जिवाभावाचे मित्र. सुहा ही सैदची मैत्रीण. तिचे वडील इस्रायलविरुद्धच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले. परंतु पॅलेस्टाईनबाहेर वाढलेली सुहा आहे मध्यममार्गी! मूळात मोटर मेकॅनिक असलेल्या सैद आणि खालेद यांची तेल अवीववर आत्मघातकी हल्ला करण्याच्या मोहिमेवर निवड होते. मोहिमेला निघण्यापूर्वीचा शेवटचा दिवस ते आपल्या कुटुंबियांसमवेत घालवतात, त्यांना ह्या मोहिमेबद्दल कसलीही चाहूल लागू न देता! सैदला सुहाच्या शांतताप्रिय, मध्यमार्गी विचारांचा अंदाज येतो.

झुंजु-मुंजू

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 05/09/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आई....! ए, आऽई!! लेकीची दबकी हांक कानावर आली तसा मंगलाबाईंचा डोळा उघडला पण पुरती जाग आली नव्हती. ’सकाळ झाली की काय!’ म्हणून नजर खिडकीवरल्या झरोक्याकडे गेली तो अजून काळोख गडदच होता. सरत्या ग्रीष्मातली रात्र तशी फार मोठी नसली तरी उजाडायला एखादी अजून घटका तरी जायला हवी होती. हे असं काहीसं भान जाणवतं न जाणवतं तोच पुन्हा एक दबकी हाक! पण या वेळी कणभर कण्हल्यासारखी. पुढ्यातच झोपलेल्या लेकीच्या पाठीवर त्यांचा हात गेला आणि तसाच तो आभावितपणे तिच्या कपाळावरही गेला. "काय गं? काय होतंय?" "आईऽऽ, पोऽऽऽट...." "दुखतंय?" "हंऽ!!" "बरं.

शिक्षकांची परवड

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 05/09/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्‍यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला दिन ढकलतांना आढळतात. पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली.