Skip to main content

नारळ पुराण

लेखक मालविका यांनी बुधवार, 03/11/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
ही कोणतीही पाककृती नाही पण अनेक पाककृतींमधला एक महत्वाचा घटक असलेल्या नारळाचं हे वर्णन म्हणून या सदराखाली लिहिते आहे. माहेर नि सासर दोन्ही कडून कोकणस्थ आणि कोकणातच रहात असल्याने नारळावर जरा जास्तच प्रेम. कधी कधी हे प्रेम इतकं उतू जात की नवरा वैतागून म्हणतो," आता नाश्त्याला नारळाची भजी, जेवायला नारळाची पोळी नि भाजी,प्यायला नारळाचं सरबत केलंस की पुण्य मिळेल" पण खरंच , ज्यात त्यात नारळ अर्थात ओलं खोबर घातल्याशिवाय मला समाधानच मिळत नाही. कुठलीही उसळ ही ओल्या खोबर्याशिवाय अपूर्ण. पलेभाजीत नारळ हवा. चटणी खोबर्याचीच. आमटीत खोबरं हवंच. याच मुळे दर दोन दिवशी घरात नारळ फुटतो.

पायातली वहाण..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी बुधवार, 03/11/2021 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
पायातली वहाण... तुला फक्त येते, श्रीखंड अन् पुरी.. आवडत नाही तुला, राईस अँड करी.. आम्ही जातो केळवणाला, तू बस घरी.. कसं आहे, पायातली वहाण, जरा पायातच बरी... येऊ का रे ऑफिसला..? मारते एक फेरी.. क्रेडिट आणि डेबिट मधलं, कळतं का काहीतरी..? घरी बस तुझी तिथेही, कटकट नको भारी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. लाव ना रे आजीला फोन, तिची तब्येत नाही बरी.. इतक्या वेळा शिकवलं तुला, पण विसरतेस तरी.. कधी तुझं तुला जमणार? बावळट आहेस खरी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. दोन पिढ्यांमधील अशीच, वाढत जाते दरी.. हीच परिस्थिती सध्या, तिला दिसते घरोघरी.. समजून घ्यावं ज्याचं त्यानं, गोष्ट आहे खरी..

आयुष्य म्हणजे स्वप्नांची अखंड मालिका

लेखक भागो यांनी मंगळवार, 02/11/2021 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
The dreams can be as real as you want them to be लक्षणे अशी दिसत होती की देशाला स्वातंत्र्य मिळणारच. दुसऱ्या महायुद्धांत दमछाक झालेले सरकार आता भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार करत होते अश्या खात्रीलायक बातम्या केसरीतून वाचायला मिळत होत्या. फक्त आपल्यालाच नाही तर सर्व कॉलोनींना स्वातंत्र्य मिळणार असे दिसत होते. मग काय गोरे इथून जाणार? गोरे सोजीर गेलेतर जाऊद्यात पण गोऱ्या कंपन्या गेल्या तर? असल्या काळज्यांनी झोप लवकर येत नव्हती. सगळे गेले तरी हरकत नाही पण एच जे फोस्टर अॅंड कंपनीची बॉम्बे ब्रॅंच चालू ठेव रे देवा. माझी नोकरी राहील. कृष्णा आणि गंगीचे शिक्षण करायचे आहे.

क्रोनोनॉट अरुण

लेखक भागो यांनी मंगळवार, 02/11/2021 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते. “ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले. बाबांचा क्रिकेटवर थोडा राग होता.

डॉक्टर ननवरे यांचे अद्भुत टाईम मशीन

लेखक भागो यांनी मंगळवार, 02/11/2021 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
(माझी ““पॉपकार्न परत आले” ही कथा “ऐसी अक्षरे” च्या २०२१ दिवाळी अंकात आली आहे. ही कथा त्या कथेचा दुसरा भाग) Statutory Warning Throughout this book(story), the author sometimes attempts to use humor to explain certain concepts in a light-hearted manner. However, the author is not professional comedian, and thus cannot assure the desired effect. Be assured, however, that the author does not intend to offend any dead, alive, zombie, or otherwise undecided cats in superposed status Exploring Quantum Physics Through Hands-On Projects डॉक्टर ननवरे आता आपल्यांत नाहीत.

दिवाळी अंक २०२१ : अलक - अनुभव

लेखक मालविका यांनी मंगळवार, 02/11/2021 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

लेखक हस्तर यांनी सोमवार, 01/11/2021 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा

दिवाळी अंक २०२१ : गाथा सागरतळाच्या सफरीची

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha

दिवाळी अंक २०२१ अलक - संस्कार

लेखक मालविका यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");} .navbar-fixed-top { background-color: #000011; border-bottom: 1px solid #111; } .node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;} .page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-sha