लहानपणापासूनच रंग, ब्रश पाह्यले की हात शिवशिवतात. ते रंग, ब्रश घेऊन जोवर दोन-चार फटकारे मारत नाही कॅनव्हासवर, तोवर समाधान नाही होत. ग्लास पेंटिंग हे कधी केलेलं नाही पण शाळेत असताना आमच्या कलाशिक्षकांनी केलेले असे पेंटिंग्ज पाह्यलेत. आठवडाभरापूर्वी असेच काही ग्लास पेंटिंग्ज नजरेखालून गेले आणि मला चळ भरलं. असे पेंटिंग्ज आधी पाह्यले जरी असले तरी गुगलून अधिक अपडेट घेतले. पुन्हा रंग सॉल्व्हन्ट बेस्ड बरे का वॉटर बेस्ड हा प्रश्न आला. मग मिपाकरांची थोडी मदत घेतली.