Skip to main content

तेथे वेधलिसे बाळी

लेखक शरद यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची एक कविता बघणार आहोत.विसाव्या शतकांत मनोविज्ञान संशोधिकांनी केलेल्या प्रयोगाचा वापर सातशे वर्षांपूर्वीच्या कवितेत आढळतो.प्रथम कविता बघू. निळिये मंडळी निळवर्ण सावळी तेथे वेधलिसे बाळी ध्यानरुपा ! वेधू वेधला निळा पाहे घननिळा विरहिणी केवळा रंगरसने ! निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ वेधे वेधू न लभे वैकुंठीचा ! ज्ञानदेव निळी हृदयी सावळी प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ! बाळी- गोपी, अंभ- आकाश, स्वयंभ- विष्णु/कृष्ण, कल्लोळ - लाटा संशोधकांनी केलेला प्रयोग असा : एका कुत्र्याला खाणे द्यावयाच्या आधीं शिट्टी वाजवावयाची आणि लगेच खाणे द्यायचे.

म्हातारबाँचा दिवस...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आमचे म्हातारबॉ भलतेच खुश असतात. कारण त्यांचे दिवटे चिरंजीव म्हणजे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो असून आम्हांमुळे म्हातारबाँच्या कितीतरी आगंतुकांना बांडगुळासारखे हक्काचे शोषण करुन घेण्याची नामी संधी त्यायोगे मिळालीय. खायचं, प्यायचं अन् ह्याचं जुळव, त्याचं मोड अशी लावालावी करीत गावोगाव उंडारायचं. हेच त्यांचं ज्येष्ठ काम उरलंय. त्यांची साठी उलटली तेव्हा आम्हांला वाटलं त्यांच्या हाती काठी येईल पण छे! म्हातारबाँनी अनेक सवलतीच्या पासांची ताटीच बांधली... यष्टी, रिल्वे यांचे तर अर्ध्या तिकिटाचे पास आहेतच.

मोबाईल फोन मध्ये नवे काय हवे?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज सगळ्यांची आत्यंतिक गरज बनलेला मोबाईल फोन हा संदेशन आणि करमणुकीचे साधन म्हणून विकसित झाला. अजून ५ वर्षांनी जन्माला येणार्‍या मोबाईल फोन मध्ये काय असायला हवं याचा विचार करत होतो. तेव्हा काही कल्पना डोक्यात आल्या.

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय!
काव्यरस

डूड...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय. वी विल कमेन्स आऽर डिसेंट शॉर्टली. यु आऽ रिक्वेस्टेड..." समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला. मान उंचावून दोन सीट सोडून डावीकडे असलेल्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली. विमान डावीकडे वळत होते. त्याबाजूला झुकल्यामुळे खाली चमचमणारा दिव्यांचा समुद्र अगदी लख्ख दिसत होता. सोळा सतरा तासाच्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. मस्त हात उंच करून त्याने आळस दिला. खिडकीच्या बाजूला शाय, आय मीन, शलाका काचेला नाक लावून खाली बघत होती. तिच्या बाजूला आई अगदी सराईतपणे घोरत होती.

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता
सोडा हातातल्या हाता नाथा आता हातातल्या हाता अहो सोडा हातातल्या हाता नाथा हातातल्या हाता ||धृ|| मनाचीये गुंत्यामधे होssओssहोssओ मनाचीये गुंत्यामधे नका अडकू आता नाथा सोडा हातातल्या हाता ||१|| आले जरी दुरवरूनी आssआssआssआss आले जरी मोहीम करूनी का बळेची ओढता नाथा आता सोडा हातातल्या हाता ||२|| सासू सासरे दिर जावा हंssअंssअंssअंss सासू सासरे दिर जावा बोल बोलतील असे एकांती पाहता नाथा आता नका....नका सोडा हातातल्या ह
काव्यरस