Skip to main content

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच प्रेरणा: ओळखा बघू अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू टंकू आणिक मरू पकतिल प्रेक्षक, पको नागरिक पकतिल महिला, पकतिल वाचक विडंबने पण करू, टंकू आणिक मरू लेख आमुचा आढाव्याचा, स्वप्नामधल्या संदेशाचा अट्टहास हा सुरू, टंकू आणिक मरू विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो संगर अंती विजयी ठरू, टंकू आणिक मरू
काव्यरस

<<विंडबकांच्या 'फळ'प्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू >>

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विंडबकांच्या फळप्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू चिक्कु किंवा पेरु, चिक्कु किंवा पेरु !! कविता आवश्यक विडबंनासाठी कच्च्या मालावर अत्याचारासाठी धावा कोणाचा करू, चिक्कु किंवा पेरु !! आमुच्या थर्डक्लास काव्यप्रतिभेतुन वाचे जी संपादकाच्या चाळणीतुन, कोणाची कविता स्मरू, चिक्कु किंवा पेरू !! विक्षिप्त,पुप्या,ममो ,रंगा अम्हास ठावे थोर विडंबक औषधासही न गावे कास कोणाची धरू, चिक्कु किंवा पेरू !! प्रासंगिकही लेख न सापडे पडलो धराशायी आम्ही बापुडे एका जनार्दनी टारू , चिक्कु किंवा पेरू !! ऊचलले दंडक संपादकानी रे सुहासा पितृपक्षीय बाजे डंका,चाले तमाशा बंद पडले बोरू, चिक्कु किंवा पेरू !!
काव्यरस

माझी फुलांची रांगोळी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत.

झक मारते राव तुमची स्कॉच !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक - दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे 'पळी' गावापाशी एक पाटी बघीतली होती.. "डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स....!" कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे.

प्लीज व्होट फॉर मी - चिनी शाळेत लोकशाहीचा अंतर्मुख करणारा प्रयोग

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
Please Vote For Me - Poster
आजच्या जगात ‘लोकशाही’ म्हणजे नक्की काय याचा उहापोह व्हावा यासाठी एका संस्थेनं २००७ मध्ये 'Why Democracy?' नावाचा एक प्रकल्प हाती घेतला. जगाच्या विविध कोपर्‍यांतल्या दहा देशांमधून एक तास लांबीचे दहा माहितीपट या प्रकल्पात बनले. त्यापैकी चीनमध्ये बनलेला 'Please Vote for Me' हा गमतीशीर चित्रपट नुकताच पाहायला मिळाला.

(फुटकळ गळक्या कौलांसंगे युद्ध आमुचे सुरू)

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - काही धागे व एक कौल यांना फुटकळ जाहीर करून त्यांच्यावर हल्ला-बोल करणारी विडंबनं व तथाकथित फुटकळ कौल आल्यावर फुटकळतेविरुद्ध युद्ध चांगलंच पेटलेलं आहे हे दिसलं.
काव्यरस