Skip to main content

प्रतिष्ठा

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिष्ठा
निष्ठेला लावून तिष्ठा, बघ राज्य करी प्रतिष्ठा | ही वसते सर्व जनात करी जागृत 'अहं' क्षणात राखाया मर्जी हिची ना स्वकीयांची ही क्षिति ||१|| हे मित्र होते हो कधी पण आली प्रतिष्ठा मधी आज नजरेत यांच्या गरळ एक शब्द ही न ये सरळ ||२|| उन्मत्त गर्व अन माज हे स्तवन शब्द ही धरी वाढवी वर्चस्व भू-वरी तडतडा तांडव करी ||३|| चालता तुम्ही आदर्शे ही हळूच तुम्हा चिकटते आल्हादे मोह पाडुनी ती अधिकृत ठाण मांडते ||४|| मग आदर्श हो दुय्यम अन करिती जन तडजोड कसे चिकटता तिज तुम्ही हे सुटत नसे हो कोड ||५|| साऱ्या आयुष्याचा खेळ मोडते एका घडी
काव्यरस

तिक्खा कबाब

लेखक जासुश यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तिक्खा कबाब चिकन पीसेस ना खूप सारे तिखट मीठ लिंबू रस लावा. किमान ४ तास फ्रिज मुरत ठेवा. वाट बघायची तयारी असेल तर रात्रभर हे चिकन फ्रिड्ज मधे ठेवा. ;) आता हे चिकन फ्रिड्ज मधून काढा. एका वेगळ्या भांड्यात दही,वितलेले बटर किंवा मोहोरीचे तेल घाला. मग त्यात थोडा रंग व चिकन मसाला घाला. थोडे अजुन मीठ घाला.[आधीच चिकेनला मीठ लावले आहे विसरू नका..नाहीतर खारट होतील कबाब.] ओवेन प्री हिट करावा. आणि त्यात हे चिकेन कबाब २०-२५ मिनिट भाजून काढावेत. आणि ईव्निंग स्नॅक म्हणून खावे.

गोळ्यांची आमटी/सांबार..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नाही.. नाही.. रस्ता नाही चुकला. अहो मी ही स्वयंपाक करतेच की घरी..! असो.. डिस्क्लेमर : ही ऑथेंटीक पा कृ नाही. अशीच सांगोवांगी आणि थोडीफार जयश्री देशपांडे यांच्या कृपेने जे काही घरात होतं ते वापरून केलेली आहे. प्राजु श्टाईल म्हणा हवं तर!! ऑथेंटीक पाकृ साठी सुगरणींची आणि बल्लवाचार्यांची मदत घ्यावी. काही चुकले-माखल्यास मी जबाबदार नाही.

प्रॉब्लेम

लेखक गणपा यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली. बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?' लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो." बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.) पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?" लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्‍या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही." बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला. बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?" लेक : "अग पण तो केवडुसा आहे.

स्टफ्ड मशरूम्स

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य १२ मोठे बटन मशरुम्स २ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा २ टे. स्पून बारीक चिरून बेल पेपर ६-८ सोलून साफ केलेल्या कोलंब्या १/२ टी स्पून मिरे बारीक करुन १/४ टी स्पून इटालिय सिझनिंग ब्लेंड २ टे. स्पून परमेजान चीज १/२ कप मोत्झारेला चीज १ टी स्पून तेल कृती ओवन ३५०फॅ. ला तापत लावा. मशरूमचे देठ काढा. त्यातील ४ देठ बारीक चिरुन घ्या. कोलंब्या बारीक चिरुन घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. पातेले तापले की त्यात तेल घाला. कांदा,मशरुमचे देठ घालून २-३ मिनिटे परता. आता त्यात बेलपेपर घालून २-३ मिनिटे परता.

अबईच्या शेंगा

लेखक जागु यांनी सोमवार, 04/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अबब, अगबाई केवढ्या मोठ्या शेंगा ह्या संवादावरुन कदाचित ह्या शेंगांना अबई हे नाव पडल असेल. गुलमोहराच्या शेंगांप्रमाणे ह्या शेंगा लांब होतात.