Skip to main content

राजकीय पडझड

लेखक विकास यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
येथे अनेकांना राजकारणाच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्याची इच्छा असल्याने, त्या साठी हा धागा चालू करत आहे. आपले विचार मांडताना फक्त गैरसमज अथवा टोकाचे वाद होणार नाहीत या बाबत मर्यादा पाळाव्यात इतकीच विनंती! बाकी धर्मावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हीन उल्लेख केलेले कुठल्याही परीस्थितीत चालणार नाहीत आणि ते प्रतिसाद तात्काळ संपादीत करण्यात येतील.

"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला. सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच. रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर. बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन थ्रिलर म्ह्टल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही? कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता.

अभंगवाणीची बिदागी - मुगाची उसळ अन् चपाती..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मडळी, 'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे ही आमची पंढरी आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी, अर्थात आमचे अण्णा हे त्या पंढरीतले विठोबा... आजवर अनेक वर्ष, अनेकदा त्या वास्तूत गेलो. अण्णांशी अनेकदा संवाद साधता आला. त्यांचा सहवास लाभला. अगदी त्यांच्या घरी बसून त्यांचं गाणं ऐकता आलं, चार गोष्टी शिकायला मिळाल्या. वत्सलाकाकूही तेव्हा हयात होत्या. त्यामुळे कधी शहापुरी कुंदा तर कधी थालिपिठासारखा कानडी पदार्थही हातावर पडायचा... :) अण्णांची लेक शुभदा, मुलगा श्रीनिवास हेही आपुलकीने स्वागत करायचे.

अकलेचे तारे आणि जावईशोध

लेखक भाऊ पाटील यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सुमार काँग्रेस्करांनी त्यांच्या आजच्या अग्रलेखात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेवरुन (काहीच्या )काही तारे तोडलेत आणि जावईशोध लावलेत. त्याची उदाहरणे: १) राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भरवल्याने रोजगारनिर्मितीतही आपण जी भरारी मारली आहे, ती लक्षात घ्यायला हवी. ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ने या संदर्भात दिलेली आकडेवारी पुष्कळच बोलकी आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन ते एक लाख सतरा हजार कोटी रूपयांवरून एक लाख पंचाहत्तर हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे.

रंभा- सुधा----

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 05/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हटके पदार्थ---------------- रंभा- सुधा---- साहित्य- सहा केळी , अर्धा लिटर दुध तापवून गार झालेले, साखर एक वाटी, खोवलेला नारळ एक वाटी.काजूचे काप पाव वाटी. कॄती------ तीन केळीचे काप करावेत , तीन कुस्करुन घ्यावीत, त्यात बाकीचे साहित्य घालून ढ्वळत रहावे.साखर विरघळली की रंभा -सुधा खाण्यास तयार. कालच हा पदार्थ केला होता.......पण फोटो काढायचा राहिला.