Skip to main content

प्रेम..जगावेगळे...

लेखक अथांग
मंगळवार, 12/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, या कवितेला नाव सुचत नाहीये किंवा जे सुचलेय ते रुचत नाहीये. मदत कराल प्लीज ? तिने चांगलाच धरला हट्ट.... म्हणाली, कसही कर आणि दे मला.. तुझ्या टपोर अक्षरमोत्यांची भेट.. युगं उलटलीत त्यांना बघून.. भकासलेल्या डोळ्यांत साठवून मिरवेन त्यांना दागिन्यासारखे, मग डोळेही माझे चमकतील बघ एका वेगळ्याच तेजाने.. ..... ....... त्यालाही आणायचेच होते परत तिच्या डोळ्यातील हरवलेले ते झळाळ-क्षण.. मनातील सर्व भावभावनांना गुंफित अक्षरमोत्यात त्यानेही मग उधळून दिले.. त्याच्याकडे होते-नव्हते ते सगळे.. कोणा-कोणालाच कळले नाही, हे प्रेम त्यांचे जगावेगळे !!

जाल आणि कायद्याचे हात

लेखक शुचि
सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जालावर जे प्रकरण गाजतय ते म्हणजे - http://abcnews.go.com/US/california-student-finds-fbi-tracking-device-c… यासीर अफीफी हा अमेरीकेचा नागरीक असलेला , मुस्लीम युवक जेव्हा त्याच्या कारची तपासणी करण्यासाठी, ऑईल बदलण्यासाठी म्हणून मे़अ‍ॅनिककडे गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याला लोहचुम्बकाने चिकटवलेलं एक यंत्र कारखाली लावलेलं सापडलं. त्याने ते यंत्र त्याच्या मित्राला दाखवलं. मित्राने एका संस्थळावर त्या यंत्राची छायाचित्रं केवळ कुतुहलाने प्रसिद्ध केली.

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी
पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||धृ|| हिरवा शालू तूला सासू आणील ग शालूत तू खुलून दिसशील ग शालूसंगे आणायला सांग पैठणी भरजरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||१|| पाटल्या बांगड्या तूला सासरा आणील ग गळा कोल्हापुरी साज तुला करील ग वाकेसरी आणायला सांग साजा बरोबरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||२|| अनवट
काव्यरस

वेलकम टु लाईफ...बार !!

लेखक सुहास..
सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हे जीवन सुंदर आहे असे कोणीतरी म्हणाले आहे,खरोखरच हे जीवन सुंदर आहे, आहे का ? अर्थात, त्या सौंदर्याच्या व्याख्या व्यक्तीगणीक बदलत असतात,कोणाला गाण्यांमध्ये सौंदर्य दिसते तर कोणाला, ज्या वयात, गर्लफ्रेंडला दुचाकीवर घेऊन फिरायचे,त्या वयात दर्‍या-खोर्‍यात,राना-वनात सौंदर्य दिसते तर कोणी तिच्या दुचाकीवरच्या ओझरत्या स्पर्शाला सौंदर्य म्हणतो.जीवनात येणार्‍या अनेक पैलुपैंकी,अनेक घटनापैंकी आपण ज्याच्याकडे नकळतपणे आकर्षित होतो त्यास सौंदर्य म्हणावे का ?

'ग्रँटा'मध्ये पाकिस्तानच्या वेगवेगळ्या वास्तवांचं चित्रण

सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
Plane and clothes ग्रँटा या साहित्यविषयक इंग्रजी मासिकाचा नवीन अंक समकालीन पाकिस्तानी साहित्याला वाहिलेला आहे.

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची
मी नेसली नेसली, साडी अंजीरी ग रंगाची कशी दिसते दिसते, लाडाची लाडी तुमची ||धृ|| गजरा माळला माळला, शेवंती फुलांचा डोई घेतला घेतला, पदर लाल बुट्टीचा भांगी भरलं भरलं, कुंकू सवाष्णीचं आहे मौलीक मौलीक, माझं कपाळीचं लेणं नको नजर लागो या वैभवाला कुणाची कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||१|| गळा घातला घातला, चंद्रहार सोन्याचा मंगळसुत्र मिरवीते मिरवीते, ऐवज धन्याचा कानात घातले घातले, कर्णफुले झोकाची
काव्यरस