Skip to main content

झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी

लेखक रतन
बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आजचा बेत झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी. झिंगालाला देशामधे काय खावे हा मोठा प्रश्न पडतो. एकतर ईथे पालेभाजी दिसत नाही. कधितरी पालकासारखी कोणतीतरी दिसते पण घेण्याची हिम्मत झाली नाही. भात किंवा ब्रेड खावून कन्टाळलो आणि वीकांताला पराठे करायचे असा बेत केला. झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी. आपला दोन नंबरचा आवडता मेनु .

सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!

लेखक अवलिया
बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'गॉन' हे सासवडहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पुण्यातल्या सर्वात जास्त सुसंस्कृत लोकसंख्या असलेल्या सदाशिवपेठेतल्या सायबर कॅफेमधुन तीस लाख नीलचित्रपट सीडीज चोरीस गेल्या आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. आजकाल अशा कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते! अशा बातम्या वाचल्यावर "पुण्याची संस्कृती पहिल्यासारखी राहिली नसावी" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते.

'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती

बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सक्षम स्त्रिया बायकांना सक्षम करणार्‍या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते. गर्भधारणा आणि प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातला कसोटीचा काळ असतो.

मासे १४) जिताडा

लेखक जागु
बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्‍यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. शेतातले जिताडे म्हणजे चविष्ट मांसाहार. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे. जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी.