Skip to main content

एम - २२

लेखक मस्तानी
Published on मंगळवार, 26/10/2010
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात. आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !

स्वैर विचारः गोलमाल ३ कुठे पाहू?

लेखक देवदत्त
Published on मंगळवार, 26/10/2010
नगीना, निगाहें स्टाईल, एक्स्क्युज मी कोई मिल गया, क्रिश धूम, धूम २ वास्तव, हथियार सरकार,सरकार राज फू़ंक, फूंक २ सर्व सिक्वेल... म्हणजे दुसर्‍या भागात कथा पुढे नेलेली. 'आंखे' चा दुसरा भाग येणार असे ऐकले होते. पण अजून काही बातमी आली नाही.

खोकला ..

Published on सोमवार, 25/10/2010
मिपाकरांनो मला १ आठवड्यापासुन खुप जोराचा खोकला येत आहे. खुप सारे टॉनिक्स आणि काढे घेऊन पाहिले परन्तु काहि फरक पडत नाही. आपल्याकडे जर काहि उपाय असतील तर कृपया सांगावे. मी खोकल्याने खुप हैराण आहे एक शब्द धड बोलु शकत नाहिये . तेंव्हा आपण मला मदत केल्यास मी आपला आजन्म ऋणी राहिन. धन्यवाद.

टॉनिक..

लेखक प्राजु
Published on सोमवार, 25/10/2010
'आयुष्य' या शब्दाचा अर्थ जर वर वर विचार केला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही काळ असतो त्याला आयुष्य म्हणतात असाच असेल. पण हा जो काही काळ असतो तो आपण कसा घालवतो याला कदचीत 'जीवन जगणे' असे म्हणत असावेत. मी कधीही या दोन्ही गोष्टींचे अर्थ लावण्याचा अथवा समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला.. किंवा इथून पुढे करेन असेही नाही . मात्र गेल्या काही दिवसांत जे काही बदल मला जवळून पहायला मिळाले त्यातून कदाचीत थोडंफार यालाच 'जीवन' म्हणत असावेत असं वाटू लागलं. आयुष्यात थोडासा जरी 'बदल' झाला तरी तो बाकी इतर किती 'बदल' घडवू शकतो याचं उदाहरणच पाहण्यात आलंय.

पार्लेरी पाटी

लेखक विजुभाऊ
Published on सोमवार, 25/10/2010
पुणेकरानीच फक्त पाट्यांचा तोरा मिरवावा अशी मक्तेदारी उरलेली नाही. पार्ल्यात काल एक पाटी पाहिली आणि मला पार्ल्याचा जाज्वल्य अभिमान वाटून ऊर भरून आला . मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील मोदकपात्र बहुगुणी उपयोग : कडधान्ये बटाटे अळूवड्यांचे रोल पालेभाज्या व अंडी उकडण्यासाठी तयारकेलेल्या अळुवड्या इडल्या कोथिंबीरवड्या ढोकळा पुलाव बिर्याणी गरम करण्यासाठी फळे ठेवण्यासाठी डिशचा वापर व फुलांची परडी म्हणूनही उपयुक्त संकष्टी अंगारकी चतुर्थी ला घरात आवर्जून उकडीचे मोदक मोदकपात्रात तेल न वापरताही लवकर उकडविण्यासाठी . हे पदार्थ ज्या गृहिणीना येतच नसतील त्यांच्यावरही एक सोल्यूशन म्हणजे सुं

फक्त पुणेकर

लेखक रन्गराव
Published on रवीवार, 24/10/2010
शुक्रवारी एका मित्राला भेटलो. गडी चांगलाच वैतागला होता! त्याला विचारलं-" कावलायस का भावा? शनिवार, रवीवार बी हाफिस हाय काय?" मित्र -" अर एक मराठी पोरग आलय आमच्या कंपनीत." मी-" भावा चांगल हाय की मग!" मित्र-"घंटा! खुळ्या ल@#$च हाय ते." मी-" आयला, आल्या आल्या काय केल भावान?" मित्र - " त्याला ईचारल- तु बी मराठी काय , तर ते म्हणतय - नाही मी पुण्याचा आहे!" ऐकून हसून हसून पुरेवाट झाली. लिहायला एक विषय भेटला! तसा मी पुन्यात फार कमी वेळ राहिलेलो आणि पून्यातल्या लोकांचा पून्याबाहेरच संपर्क आला.