Skip to main content

दिवाळी अंकांतील फराळ

Published on शनीवार, 06/11/2010
यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसतेने आस्वाद घेऊन आम्हांला जरुर पोचपावती द्यावी ही विनंती. आमच्या हातचा हा मामुली फराळ कसा काय झालाय? तिखट मीठ व्यवस्थित घोळले गेलेय ना? आंबट लागतोय की गोड? तुरट झालाय की कडू वाटला?

अभंगः विठ्ठल उभा विटेवरी

Published on शनीवार, 06/11/2010
अभंगः विठ्ठल उभा विटेवरी
विठ्ठल उभा विटेवरी भक्ताचीये वाट पाही ||धृ|| पुंडलीक लावी भक्तां मार्गा कर्म करण्या सोडी योगा तरची पावें प्रेमे देवा विठ्ठल पुंडलीक एकची राही ||१|| नामजप करता विठ्ठल अवघे हरपले भान कोण विठ्ठल कोण भक्त दोन ब्रम्ह वेगळे नाही ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०६/११/२०१०
काव्यरस

मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

लेखक दशानन
Published on शनीवार, 06/11/2010
नमस्कार, मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या.

ओबामांचा दौरा - लोकसत्ताचा मस्त आढावा

लेखक यकु
Published on शनीवार, 06/11/2010
भारत-पाकीस्तान-अमेरिका-रशिया यांच्या संबंधाचा लोकसत्तामधील मस्त आढावा. [http://tinyurl.com/2ws6epa] ओबामांचा भारत दौरा अमेरिकनांना रोजगार हमी देण्यासाठी अशीही बातमी आहे. अभ्यासूंनी मतं मांडावीत.

बुरा ना मानो दिवाली है!!

लेखक यकु
Published on शनीवार, 06/11/2010
उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले! सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही.

एखादे ईमेल आयडी अकाऊंट बंद करायचे असल्यास ते करता येते का?

Published on शुक्रवार, 05/11/2010
समजा आपण एखादे इमेल आयडी एखाद्या वेबसाईट वर उघडले (उदा: एबीसी१२३@याहू डॉट कॉम) नंतर आपल्याला ते बंद करायचे आहे तर त्यासाठी काय करावे लागते? (डिलीट अकाऊंड) ते बंद करता येते का? कृपया माहिती द्यावी.