आदरार्थी मैत्र...
ती सदासर्वदा चैतन्यमयी नजरेनं वावरणारी, नेहमी हसतमुख राहणारी, निर्मळशा झऱ्यासारख्या मुक्त स्वभावाची एक युवती.
नेहमीच खळाळता संवाद साधीत हास्यमळा फुलवण्याची तिची हातोटी जगावेगळी. तिचा मार्केटींगच्या क्षेत्रात वावर असल्यामुळे नव्हे तर प्रत्येकाला तिच्या बद्दल वाटणारा स्नेह, आपुलकी अन् विश्वास यांमुळेच तिचे दोन मोबाईल अविश्रांत रुणझुणत असतात. तिच्या बोलक्या स्वभावामुळे ती प्रत्येकाला आपलंसं करीत जाते. तिचं फ्रेन्ड सर्कलही मोठं विस्तारत जाणारं. त्यात कमी अधिक वयाच्या अनेक व्यक्ती. तिच्या बरोबरीच्या जितक्या मैत्रिणी तितकेच मित्रही.
मिसळपाव