Skip to main content

ओवलेकरवाडीतिल (ठाणे) उडती रत्ने

लेखक jaypal यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी खुप दिवसांनी येत आहे. रिकाम्या हाताने कसं भेटायच ? म्हणुन नाराजी दुर करन्यासाथी हा उडत्या रत्नांचा खास आहेर आणला आहे . १. a २. b ३. पैलु न पडलेली रत्ने आधी दाखवतो c ४.

शब्दालंकार-१. छेकापन्हुती

लेखक शरद यांनी शुक्रवार, 17/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हराच्या हाराच्या, किंवा कोडी हे गंमत म्हणून ठीक. पण त्यांची जागा ताटातील चटणी-कोशींबरीसारखीच. आज जरा एका अशा विषयाकडे वळू जो शाळेत आपण शिकलो व आज जवळजवळ विसरलोच आहोत." काव्यालंकार". उपमा, उत्प्रेक्षा, यमक इत्यादि. जेंव्हा यांची नावेही माहीत नव्हती तेंव्हाही या अलंकारांमुळे आपल्या नकळत आपल्या मनात ते कवितेची गोडी निर्माण करत होते. कविता पाठ होत होत्या, त्यांच्यामुळे. पण त्यावेळी त्यांची किंमत होती परिक्षेतील ५-७ गुण. आज आपण त्यांचा आस्वाद जास्त जाणकारीने घ्यावयाचा प्रयत्न करणार आहोत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनुप्रास, यमक, व्यतिरेक, इत्यादी ५०-६० अलंकार मम्मटाच्या काव्यप्रकाशात दिले आहेत.

झाशीची राणी - मूळ छायाचित्र (??)

लेखक यकु यांनी शुक्रवार, 17/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आंतर्जालामध्ये फेरफटका मारत असताना एका ब्लॉगवर हे छायाचित्र दिसले. हे झाशीच्या राणीचे मूळ छायाचित्र आहे असा दावा इतिहासाचा विद्यार्थी असलेल्या त्या हिंदी ब्लॉगलेखकाने केला आहे. कलकत्त्यात राहाणारे इंग्रज फोटोग्राफर जॉनस्टन आणि हॉटमनकडून 1850 मध्येच हे छायाचित्र काढण्यात आले होते आणि अहमदाबादचे रहिवासी चित्रकार अमित अंबालाल यांच्या संग्रहात उपलब्ध आहे असेही तो म्हणतो.

नाताळची चाहूल!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 17/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख - नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते.दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात.दिव्यांच्या रोषणाईने करड्या,ढगाळ संध्याकाळी थोड्या रंगीत होतात,त्यात 'जान' आल्यासारखी वाटते.पोस्टातून भेटकार्डे, भेटपाकिटे पाठवण्यासाठी गर्दी होते.नाताळचे खास बाजार मैदानात,चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात.हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते.मेणबत्त्यांचे असंख्य प्रकार,चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, रेनडियरची वीजेवर लुकलुकणारी गाडी,दिव्

मध्यरात्र..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 17/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्री कधीतरी येते जाग कशी कुणास ठाऊक ...? मी बघत बसतो खिडकीतून डोळे किलकिले करून माझ्या खिडकीतून दिसणारे आभाळ नि खिडकीतून दिसणारे हे पारिजातकाचे झाड मध्यरात्री कधी जाग आली की झाडावर ओठंगलेला चंद्र दिसतो माझ्या सुरक्षित अंतरावरून हे दृश्य सुंदर मस्त दिसतेय !! चीडीचीप्प रात्र नि हे जीवघेणे झाड ध्यान लावून बसलेले.... बायको मस्त गाढ झोपलेली नि मी असा बेचैन मी उठतो नि किचन मध्ये जातो सकाळी काहीच नसणारे झुरळे आता मस्त फिरत असतात अन्न-कण शोध मोहिमेवर .... कोठे लपतात नि कोठून येतात अचानक कुणास ठाऊक.. ?
काव्यरस

पुन्हा तुझीच वाट पहात आहे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 16/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
तू उशीरा येण्याची आता सख्या सवय झाली आहे तरी ही टेबलावर जेवण अन दारावर डोळे ठेवून मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती नव्यानेच लिहिलेले काही क्षण मन पटलावर पुन्हा एकदा थैमान घालू लागले.. अन विचारांच्या वादळात अनेक अनुत्तरीत प्रश्न पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर अस्त व्यस्त पणे धडकू लागले का रे सख्या असा करतोस ?

माझा बी एक इनोद.

लेखक नरेशकुमार यांनी गुरुवार, 16/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आता याला इनोद म्हण्या ऐवजी हा एक लयी दुष्ट/वाईट प्रकार हाय, जो मी माझ्या एका परम मित्राच्या बाबतीत नेहमी करतो. मी हापिसात एकदम कोपर्यात बसतो. त्यामुळ माझे मोनिटर कोणाला दिसत नाय. माझ्या पुढे माझा एक मित्र बसतो(आम्ही सगळे त्याला लाडाने 'केत्या' बोलतो). त्याचा मोनिटर मला आणि आजूबाजूच्या तीन-चार जणांना दिसतो. पन त्याच्या लीड ला दिसत नाय. इतर येळेला नाही, पण मुद्दामून तो जेव्हा काही अरजन्ट काम करत असेल त्या वेळेस मी त्याला उगाचच एक आरोळी ठोकतो. "ए केत्या, फोरवर्ड कर रे." (जणु काय तो काम सोडुन टाईम पास करतोय) वाईट चिडून तो माझ्याकडे बघतो.

युगलगीतः मला वाजतीया थंडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः मला वाजतीया थंडी तो: ए, मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल अग मला वाजतीया थंडी ||धृ|| ती: आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: गारगार वारं सुटलया मरनाचं हुडहुडी भरलीया माझ्या अंगात असला गारठा नाय पाहिला जल्मात कधी अग मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||१|| आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: कराकरा दात माझं वाजतया हातावर हात माझं चोळतोया जवळ ये, अशी दवडू नको संधी अग मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||२|| आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: अशी ग तू काय करते
काव्यरस