नमस्कार मंडळी,
आज बर्याच दिवसांनी तुमच्या सेवेसी परत हजर होतोय. :)
नाताळ तोंडावर आलाय. अमेरिका युरोप सारख दणक्यात नसल तरी इथेही नाताळाची हवा जोर धरु लागलीये.
नविन वर्षाच्या पार्ट्यांचे आत्तापासुनच मनसुबे रचले जाताय. नाच गाणी खाणं आणि पिणं नुसता जल्लोश असणारे एका आठवड्या नंतर.
टारुने एका धाग्यात बार्बेक्युसाठी काय पदार्थ करता येतील अस विचारल होत. तेव्हा पासुन डोक्यात चिकन विंग्स् फडफडत होते.
अनायसे काही मित्र जमायचेहोते काल, तर म्हटल करुन पाहु. जमलेच बरे तर तुम्हाला नव वर्षाच्या स्वागतासाठी अजुन एका पदार्थाची सोबत.
तसे हे विंग्स् वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात.