Skip to main content

जालावरील चौसष्ट कला--

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर उपयोगी पडणाऱ्या चौसष्ट कला- भारतीय संस्कृतीमधे चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. दुवा- http://balsanskar.com/marathi/lekh/45.html ह्यामधल्या अनेक आजच्या युगात कामी येत असल्या, तरी खास जालसंस्कृतीमधे उपयोगी अशा कोणत्या कला आहेत असा विचार मनात आला. मिपावर अनेक सृजनशील सभासद आहेत. ६४च काय, शंभर देखील कलांची यादी नक्कीच होउ शकेल. डिसक्लेमर-१- जालावर म्हणजे मिपावर असा आत्मकेंद्री अर्थ घेउ नये. डिसक्लेमर-२ शेवटच्या वाक्याचा गर्भितार्थ शंभर प्रतिक्रीया असा नाही. यादीची सुरवात मी करतो.

भरलं वांगं (बेक्ड)

लेखक गणपा यांनी रविवार, 26/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वांग्याच नाव काढल्यावर बरेच जण तोंड वाकड करतात. माझ तस एक शेपूची भाजी सोडली तर बाकी कुणाशी वाकड नाहीये. त्यामुळे जे काही ताटात येत त्याला उदार मनाने उदरात जगा देतो. सध्या मस्त वांग्याचा सिझन आहे. तशी इकडे जवळ जवळ वर्षभर वांगी मिळतात. पण ही असली मोठ्ठी वांगी इथे ठरावीक सिझन मध्येच येतात. नेहमी सारख वांग्याच भरत किंवा काप करुन तळण्या पेक्षा या वेळी काही तरी नवा प्रयोग करावासा वाटला. सद्ध्या बेकिंगच खुळ डोक्यात बसलय. आजची पाककृती ही त्याचीच परिणीती आहे. :) तर मग आपला बहुमुल्य वेळ न दवडता लगेच पाककृती कडे वळतो.

शोध - एका हरवलेल्या प्रश्नाचा

लेखक रन्गराव यांनी रविवार, 26/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नितीननं तारवटलेल्या डोळ्यानी घड्याळाकडं बघितल. सकाळचे सहा वाजून गेले होते. प्रोग्रॅमचे रिझल्ट परत एकदा तपासले, खूष झाला, दोन नाइटऑउटस सार्थकी लागल्या होत्या. असाइनमेंट सबमिट केली. मनातल्या मनात विचार केला. थोडी झोप घेवूयात आता, बाकीच्या विषयांचा सबमिशनही येइल एक दोन दिवसात. असा विचार करून लॅबमधून बाहेर पडू लागला तोच कॅलेंडरवर नजर गेली. आज तारीख २६ जानेवारी २००१. लगेच लक्षात आला अजून दिड एक तासानी झेंडावदन असेल. प्लॅन बदलला. हॉस्टेलवर गेला. छान आंघोळ केली. थोडा वेळ टीव्ही रूममध्ये काढला.

मिपाचा शिर्षक फळा आणि एक वि नो द !

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 25/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपाच्या ' नवे लेखन ' वर क्लिक केले , सर्व लेखांची शिर्षके वाचली आणि जरा गम्मतच झाली . ती अशी .. अभिनंदन !! - हे कस शक्य आहे ? दोन पेग मारुन.... -- नवर्‍याच्या त्रासदायक सवयी नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी --- मिपाकरांच्या त्रासदायक सवयी डॉ. बिनायक सेन -- .. C.P.M. स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती....... --- शक्यता नाकारता येत नाही. फ्रोह वाईनाख्टन!!! ---जर्मन आख्यान भाग ५ इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ? --- सवय इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत? ---माझे छळवादी. चीनचे मनसे.

अ ख्रिसमस मिरॅकल

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 25/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सुजीत, मनिषा आणि अर्णवला बाय करून अनंतराव घरात आले. बाहेरच्या बर्फाळ हवेतून घराच्या हीटर लावून उबदार ठेवलेल्या पोटात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. किचनमध्ये जाऊन त्यांनी हॉट चॉकोलेट ओतून घेतले आणि पुढच्या खोलीत येऊन गुबगुबीत सोफ्यावर अलगद बसले. दोन दिवस एवढ्या मोठ्या बंगल्यात आता एकट्यानेच राहायचं या विचाराने त्यांच्या मनावर गरम दुधावर साय जमा होते तसा एक उदासवाणा तवंग जमा झाला. त्यांना वत्सलाबाईंची आठवण झाली. तशी ती इतरवेळीही दिवसातून पन्नासवेळा होतच असे. वत्सलाबाई जाऊन आता वर्ष होत आलं असलं तरी इकडे आल्यापासून त्यांची आठवण खूपच यायला लागली होती.

अभिनंदन !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 25/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!

हे कसे शक्य आहे?

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 25/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?
संदर्भ - http://misalpav.com/node/15996 माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.